इच्छामरणासाठी दाम्पत्याचा अर्ज
स्वपना आणि विश्वनाथ दास असे या दांपत्याचे नाव असून, ते उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विश्वनाथ हे स्थानिक फुटबॉल क्लबमध्ये प्रशिक्षक असून, स्वपना यांना मूत्रपिंडाचा विकार आहे. त्यांच्या मूत्रपिंडाचे रोपण करण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येणार आहे. आर्थिक मदतीसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांशी संपर्क साधला; परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या या दाम्पत्याने इच्छामरणास परवानगी द्यावी, असा अर्ज केला आहे. स्वपना यांनी प्रथम अर्ज केला होता; मात्र शेवटच्या प्रवासात त्यांना साथ द्यावी, यासाठी आपणही अर्ज केल्याचे विश्वनाथ यांनी सांगितले.
इच्छामरण देण्याचा कायदा आपल्या अद्याप लागू झाल्याचे ऐकिवात नाही...या कायद्यावरून जगभरात वाद सुरू असताना या दाम्पत्याने इच्छामरण मागून भारतीय न्यायव्यवस्थेला अडचणीत टाकले आहे.
पण, आपल्याकडे इच्छामरण असावे, असे आपल्याला वाटते का?
