Showing posts with label petrol. Show all posts
Showing posts with label petrol. Show all posts

Sunday, December 21, 2008

पेट्रोल पंपावर पायाभूत सुविधा हव्यात...

पुण्यातील पेट्रोलपंपचालक ग्राहकांना काही पायाभूत सु विधापासून वंचित ठेवत असून, विनाशुल्क हवा, स्वच्छ शौचालय, विश्रामकक्ष आदी गोष्टी उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरल्या आहेत, अशी प्रतिक्रिया ई- सकाळचे वाचक राघवेंद्र पवार यांनी व्यक्त केली.

ई- सकाळकडे आपले मत मांडताना ते म्हणाले, ''भेसळयुक्त पेट्रोलविक्री करणाऱ्या पेट्रोलपंपांची पुण्यातील संख्या मोठी आहे. कात्रज घाट, चांदणी चौक, पिंरघुटच्या अलिकडील पेट्रोलपंपावर ही परिस्थिती अ धिकच गंभीर असून, येथील पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत न बोललेलेच बरे. 99 टक्के पेट्रोल पंपांवर पेट्रोलचोरी केली जाते. ग्राहका ंच्या मागणीपेक्षा कमी पेट्रोल भरून ही चोरी केली जाते. रक्कम मात्र पूर्ण आकारली जाते. बऱ्याच पेट्रोलपंपावर साठवणूक केली जाते. मात्र, पट्रोलपुरवठा कंपन्या कवेळ बघ्याची भूमिका घेतात. वास्तविक पाहता पेट्रोल कंपन्यांनी जनजागृतीच्या दृष्टीने पंपाची संपर्क, पत्त्यासह नावे जाहीर केले पाहिजे. आणि त्यांनी केलेल्या परीक्षणात आढळून आलेल्या बाबी प्रसिद्ध केल्या पाहिजेत. पंपाच्या ठिकाणी हवा मोफत असल्याचे फलक आहेत की नाही, याची पाहणी केली पाहिजे. पेट्रोल वाटप मशीनच्या मापकाची तपासणी केली पाहिजे. तसेच, पेट्रोल शुद्धतेची चाचणी केली पाहिजे. त्याबरोबर पंपाच्या ठिकाणी शौचालय आणि विश्रामकक्ष आहे किंवा नाही, हेदेखील पाहिले पाहिजे.

आपल्याला याविषयी काय वाटते...श्री. पवार यांच्याप्रमाणेच आपल्यालाही असे काही अनुभव आले आहेत का, किंवा काही गोष्टींचे आपणही निरीक्षण केले असेल. तर आम्हाला नक्की कळवा.

Sunday, June 08, 2008

भारतातील "स्वस्त' पेट्रोलमुळे जगातील भाव भडकले

अमेरिकेकडून पुन्हा लक्ष्यः दरवाढ "पुरेशी' नसल्याचा दावा

भारतीयांचा वाढलेला आहार आणि वाढलेली तेलाची प्रचंड भूक यांना लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेला आता भारत आणि चीनमध्ये पेट्रोलियम पदार्थांवर दिले जाणारे अनुदान खटकू लागले आहे. या अनुदानामुळेच या दोन देशांमध्ये पेट्रोलियम पदार्थ "स्वस्त' मिळतात आणि त्यामुळे मागणी वाढून जागतिक किमती गगनाला भिडत आहेत, असा दावा अमेरिकेचे ऊर्जा मंत्री सॅम बोडमन यांनी केला आहे. भारताने नुकतीच केलेली दरवाढ "पुरेशी' नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.जगातील पन्नास टक्के इंधन या अकरा देशांतच वापरले जाते आणि त्यांनाच मोठी झळ बसली आहे.

गेल्या काही महिन्यांत भारत आणि चीनला लक्ष्य करण्याची अमेरिकेची ही तिसरी वेळ आहे. भारतीयांचा आहार "सुधारल्या'ने अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे, असा जावईशोध अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोन्डोलिझा राइस यांनी केला होता. त्यास जॉर्ज बुश यांनीही दुजोरा दिला होता. त्यानंतर भारत आणि चीनकडून मागणी वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत, असे प्रतिपादन "व्हाइट हाउस'ने केले होते.

अशाप्रकारे कोणत्याही स्थितीला भारत जबाबदार असल्याचे अमेरिकेकडून बोलले जात आहे. भारताला लक्ष्य करण्याची त्यांचा हा कट निंदणीय आहे.

Friday, February 15, 2008

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागलेगेले

काही महिने सातत्याने होणार होणार म्हणून टाळण्यात आलेली पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा गुरुवारी झालीच. या निर्णयानुसार पेट्रोल लिटरमागे दोन रुपयांनी, तर डिझेल एक रुपयाने महागणार आहे. दरम्यान, या निर्णयाला डावे पक्ष व भाजपने अपेक्षेप्रमाणे विरोध केला असून, भाजपने या दरवाढीविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 45 रुपये 52 पैसे, तर डिझेलचा दर 31 रुपये 48 पैसे राहणार आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीचा मुद्दा गेले अनेक महिने सरकारच्या अजेंड्यावर होता. मात्र, डाव्यांचा विरोध तसेच कर्नाटक, राजस्थानसह अनेक राज्यांत तोंडावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या निर्णयाची घोषणा सातत्याने लांबणीवर टाकली जात होती.पेट्रोलियम दरवाढीची तीव्र प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटली आहे. ही दरवाढ म्हणजे जनतेचा विश्‍वासघात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 2004 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलचे दर लिटरमागे 30 रुपये 25 पैसे व डिझेलचे दर 20 रुपये 49 पैसे होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात तब्बल 50 टक्‍क्‍यांनी दर वाढले आहेत. केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा हा पुरावा असल्याची टीका पक्षाने केली आहे.

पेट्रोलियम पदार्थांच्या किंवा जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरांत वाढ करण्याऐवजी श्रीमंतांवर करवाढ लागू करण्यासारखे उपाय लागू करावेत, असे सरकारला सुचविण्यात येत आहे. ही सूचना काही अंशी योग्यच आहे, असे म्हणायला हवे