Wednesday, December 17, 2008

मुंबई हल्ल्याच्या चर्चेला राजकीय वळण

मुंबईतील अतिरेक्‍यांच्या हल्ल्याच्या गंभीर विषयावरील चर्चेला अखेर राजकीय वळण लागले आणि विधानसभेत एकजूट दाखविण्याच्या निश्‍चयाला तडा गेला.

सरकारमध्ये तीन वर्षे मंत्रिपदावर राहिलेल्या नारायण राणे यांनी राज्य सरकारचे आणि त्यांचे राजकीय स्पर्धक विलासराव देशमुख यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी मुस्लिम समाजाला टिकेचे लक्ष्य करीत शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी हा मुस्लिम दहशतवाद नाही, तर अतिरेक्‍यांचा जिहादी हल्ला आहे, अशा वेगळ्या भाषेत भाजपची सर्वसावेशक "सेक्‍युलर' भूमिका मांडत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण काढून हेमंत करकरे यांच्यावर झालेल्या टीकेचा उल्लेख करीत भाजप-शिवसेनेच्य वर्मावर घाव घालण्याची संधी सोडली नाही. त्यावरुन सभागृहात बरीच खडाजंगी झाली.

विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणातील बराच वेळ हल्ल्याची घटना कशी घडली, आपण कुठे-कुठे फिरलो आणि मुस्लिमांवर टीका करण्यातच खर्ची घातला. एका बाजूला अतिरेक्‍यांच्या विरोधात पोलिस कसे जिवाची बाजी लाऊन लढले असे ते सांगत होते आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांत कसा सावळा-गोंघळ सुरु आहे, याचेही ते वर्णन करीत होते. त्यांच्या भाषणात त्यांनी मुस्लिम समाजाला टीकेचे लक्ष्य केले. मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्या हकालपट्टीची मागणी त्यातूनच पुढे आली.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मात्र सुरुवातीलाच मुस्लिम समाजाच्या देशभक्तीबद्दल संशय घेण्याचे कारण नाही, हा मुुस्लिम दहशतवादी नाही तर जिहादी आतंकवाद आहे, असा सूर लावत शिवसेनेवार कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिस दलातील कमजोरपणा व राजकीय हस्तक्षेपावर जोरदार हल्ला चढविला. पोलिस दलात टोळीयुद्ध सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयावर जर या राजकारण्याचं एकमत होत नसेल, तर त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं. त्यामुळं किमान त्यांना देशाविषयी नसलेली आस्था तरी चव्हाट्यावर येणार नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये रंगलेलं राजीनामा नाट्य संपूर्ण देशवासियांनी पाहिलं. किंबहुना या राजकीय डावपेचात हल्ल्याचा विषय कुठल्या कुठे विरला, अन्‌ त्याचीच पुनरावृत्ती नागपूर अधिवेशाच्या वेळी आली. अगदी ठरवूनही या नेत्यांमध्ये एकवाक्‍यता होऊ शकली नाही. विषय कोणताही असो, नेत्यांना आपल्या खुर्चीचंच पडलेलं असतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

16 comments:

Anonymous said...

ekada mottha pudhari mela pahije--by terror attak.thats sufficient to eliminate terrorism

Anonymous said...

Khalistan walyani Indira Gandhi na marale. LTTE ne Rajiv Gandhi na. He sarva zalyavar thodeefar action ghetalee gelee. Correction mhanun Sheekh PM zale, Tarihi ajahee tyanche sampurna uchchatan zale ahe ase nahich..

Pan Muslim Terrorist che uchchatan karane ka shakya hot nahi ahe ? Ajun kon mele pahije mhanaje tyasathi ?

Anonymous said...

ataa faar ushir zaala aahe. ataa human rights aale, secular (sickuar, anti-hindu) mediawale aale, z-security madhya rahoon aapli chor-labaad politicians aale, paan garib manus aple ek vote ghevon kai karel ho?

asankhya bangladeshi va paki, bhaaya, UP wale aale. aata, fakt "Kalaki" avartar born hoyil!

Anonymous said...

Our central govt does not have the guts to hang the parliament attack mastermind already sentenced to death,is always soft on terrorists of one religion & this state government,very harsh & hard on the majority religion's handful fellows undergoing an enquiry!
हे स्वतःची कातडी वाचविण्यासाठी झेड सिक्युरिटी व स्पेशल कमांडोंची दले वाढवतील,मोठीमोठी भाषणे देतील,तरीहि चूकून त्यांच्यातल्या एखाद्या मंत्र्याला दहशतवाद्यांनी कधी मारले इतर मंत्रीजण त्याने देशासाठी केवढे मोठे बलीदान दिले हे दाखवून देतांना सुसरीचे [खोटे] अश्रू गाळतील!
पण राज्याच्या नांवाने कुठलिही कृती करतांनासुद्धा भ्रष्टाचारमात्र चालूच ठेवतील,मग ती शस्त्र वा चिलखत खरेदी असो, कारण यांना कुणीच रोकू शकत नाही!

Anonymous said...

but mr anonyms,indira rajiv were true politicians.i think mr patil saying about aaj ke dhongi leader

Anonymous said...

angrez hote,toh vo hi acchha hota

Anonymous said...

आपला भारत जागतिक महासत्ता होणार म्हणतात, परन्तु असले राजकीय नेते ज्याना जनतेच्या हिताशी काहीही देणे घेणे नाहीये ते असताना हे पुढच्या १०० वर्षात तरी शक्य होइल असे वाटत नाही. प्रत्येकाला स्वताची तुमडी भरण्यात फ़क्त स्वारस्य आहे. नेतेच भ्रष्ट तर सरकारी अधिकार्याँकडून काय वेगळी अपेक्षा करायची.इथे फ़क्त जनता भरडली जाते आहे.

Anonymous said...

Mr. Dsouza,

Who says Indira was a true leader and not politician ? She was also known as the only one who imposed emergency in India.

Rajiv did not have time to fill in his Mom's shoes. How can a kid become PM just because his mom and grandad were in politics ? And according to you become a True Leader ?

I remember AtalBihari commenting in 1989 as follows,
Mrs. Indira Gandhi ke Do Bete The... Ek Ne Desh Chalaneka sapana dekha tha, usane aeroplane chalaya, aur gadbad ho gayee. Dusara Pilot tha aur plane chalana chahata tha, usako family tradition rajaneeteene desh chalane kee gaddi par bitha diya. Usane desh ko tod diya...

Anonymous said...

Mr.D'souza,
Obviously Mr.Patil & other commentators are talking about today's selfish leaders & the pathetic state they have created in Indian politics.

Makarand MK said...

There are not only the politicians who are leading the country to a "corrupt future".
अती लोकशाही; त्यामुळे स्वैराचार वाढलेला; शिवाय "आपली हे चाललय ना, चालूदे" असं म्हणण्याची वृत्ती; आणि नको त्या गोष्टींचा पुळका आणणारी मानसिकता --- ही कारणं आहेत.
रस्त्यावर थुंकताना, बस, रेल्वेमध्ये विनातिकिट चढताना, एखाद्या office मध्ये लाच देताना, रस्ता, पाणी, वीज, वाहतूक, शिक्षण यांची प्रचंड दुरवस्था असताना, जोपर्यंत आपल्याला "चीड" येत नाही, तोपर्यंत आपण या गप्पांवर फक्त वेळ वाया घालवू..!

आणि त्या रागातून कृती करायला हवी..

Anonymous said...

भारताने या हल्ल्यावर तीव्र करवाई केलि फिजे असे माजे मत आहे.भारताला अमेरिका ब्रिटन इस्राइल यांचा पाठिंबा आहे. पाकिस्तान नुसते बोलते आणि वातावरण शांत जाल्यावर कोणतीही करवाई करत नाही हा आपला अनुभव आहे.अमेरिका ब्रिटन ई. देशांकडून दबाव असला तरी फार मोठी कारवाई करण्याची पाकिस्तानची तयारी दिसत नही.
त्यामुले भारत पाकव्याप्त कश्मीर मध्ये हल्ला करून तेथील दहशतवादी ठानी उध्वस्थ का करीत नाही?

Unknown said...

आपल्या पुढा-यांची,विशेषतहा राज्यकर्त्या केंद्रसरकार व राज्यसरकारमधील कॉंग्रेसमंत्र्यांची वक्तव्ये वाचून देशात परकीय किंवा आपल्याच देशातल्या अतिरेक्यांना प्रोत्साहन दिले जात आहे अशी दाट शंका येउ लागली आहे.

अल्पसंख्याक कल्याणमंत्र्यांनी एके काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांचे सिमेंट भ्रष्टाचार प्रकरण गाजले होते व तरीहि त्यांची सध्याच्या केंद्रसरकारने वर नमुद केलेल्या मंत्रीपदी नेमणुक केली.

मालेगाव हल्ल्यांचे विशिष्ट हेतूने उकरून काढलेले प्रकरण मुंबईहल्ल्यानंतर पडद्याआड जात आहे असे लक्षात ठेवून आता या मंत्र्याने कदाचित हाय कमांडच्या सल्ल्यानेच कै.करकरेंची हत्या हा विषय पुन्हा ऐरणीवर आणला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण सोयिस्करपणे एरवी कठोर कृती करणा-या कॉंग्रेस नेतृत्वाने यावेळी मात्र मवाळ भुमिका घेतली आहे व अल्पसंख्यकांच्या प्रतिक्रिया अजमावण्यात येत आहेत.

एवढे हल्ले होउनहि जो देश संसदहल्ल्याबद्दल फ़ाशी शिक्षा झालेल्या अफ़झलला त्वरित सुळावर चढवू शकत नाही तो काय कठोर कारवाई करू शकणार दहशतवाद्यांच्या किंवा त्यांना मदत करणा-या शेजा-यांविरूद्ध???या सरकारची फ़क्त घोषणाबाजी चालू आहे सतत,कृती मात्र शून्य!

कुठल्याहि घोषणा किंवा चर्चा न करता मुंबई हल्ल्यानंतर ताबडतोब शेजा-याच्या माहित असलेल्या दहशतवादी प्रशिक्षणाच्या तळांवर सहज हल्ले करून त्यांना नेस्तनाबूत करायच्या ऐवजी महिनेन महिने आता निष्फ़ळ व निरर्थक चर्चामात्र चालू रहाणार कारण निवडणुकांसाठीमात्र मोर्चाबांधणी सुरू आहे!

कॉंग्रेसचा दिल्लीतील समर्थक/हस्तक प्रफ़ुल्ल बिडवाईचे लेख सकाळ छापतच रहाणार जरी त्यातील मजकुरांना वाचकांनी आक्षेप घेतले असले तरी! हीच आपली राजनिती आहे!

Anonymous said...

सर्व राजकारणी केवळ आपली तुम्बडी भरून घेण्यासाठीच या क्षेत्रात आलेले असतात. तुम्हाआम्हा सारखे मूर्ख दर पाच वर्षांनी यांना निवडून देतात.समाजसेवा, लोकसेवा, वगैरे सर्व भूलथापा आहेत. आपले रक्त सान्डलेल्या शूर शिपायांच्या चितेवर आपली राजकीय पोळी भाजणारे हे @@##$ पुढारी पाहिले की हल्ली संताप यायला लागलाय. कशासाठी आपण मतदान करतो? नाही केले तर चालेल. मी तरी आता नाही करणारे मतदान.

Pravin said...

तुमचे म्हणणे एकदम खरे आहे . कित्येक दिवसांपासून बिडवई हा लेखक अमेरिका.पाकिस्तान अथवा बांग्लादेशीचा आहे की काय अशी शंका त्यांचे लेख वाचून येते. अबू आज़मी किंवा एखादा पाकिस्तानधार्जिणा भारतीय लेखक सुध्दा असे लेख लिहिणार नही. ज्याना शक्य आहे त्यानी कृपया या माणसाला प्रत्यक्ष भेटून अथवा फ़ोन, ईमेल द्वारे त्याची चांगली निर्भत्सना करावी. त्याचा email id मिळाला तर या ब्लागवर कुणीतरी तो प्रसिध्द करावा. कॉंग्रेसचा दिल्लीतील समर्थक/हस्तक प्रफ़ुल्ल बिडवाईचे लेख सकाळ का छापतच रहाणार? ते कृपया सकल परिवारातील कोणी सांगेल काय? त्यापेक्षा उदय भास्कर या विशेषज्ञाचे लेख सकाळ का छापत नाही?

जयवंतराजे_भोसले said...

"ज्या देश्या मधे ज्या लायकीचे लोक राहतात त्या लोकांना त्याच लायकीचे सरकार मिलते "

Anonymous said...

श्री.जयंत सरकार यांचे म्हणणे पटण्यासारखे आहेत कारण आपलेच मतदारच द्विधा मनस्थितीत असतात व निवडून देणा-यात खालचा अशिक्षीत वर्गच जास्त आढळतो!
एकंदरीत परिस्थितीत कधीच फ़ारसा फ़रक होइल असे वाटत नाही कारण या देशाच्या ब-याचशा नागरिकांना गांधी घराण्याचा उदोउदो केल्याशिवाय श्वाससुद्धा घेता येत नाही व या दुर्दैवी मानसिकतमु्ळे एका परदेशातून येथे सून म्हणून आलेल्या व्यक्तीला इथल्या परदेशधार्जिण्या जनतेवर राज्य करता येते व तिच्या पक्षातले मान्यवरसुद्धा तिच्या पायावर सतत लोटांगणे घालत असतात!
पंतप्रधानांची असामान्य हुषारी व गुण यामुळेच अयोग्य कारणांसाठी वापरले जातात!
असो,आलिया भोगाशी असावे सादर!