Saturday, December 13, 2008

नारायण राणेंनी स्वगृही परतावे - समर्थकांचा कल

नारायण राणे यांनी आपली आगामी राजकीय वाटचाल नागपूर अधिवेशनानंतर घोषित करण्याचे स्पष्ट केले आहे; परंतु त्यांनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावे, असा विचार त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होऊ लागला आहे.
गेल्या साडेतीन वर्षांत कॉंग्रेसमधील घुसमटीतून मोकळे झालेले कार्यकर्ते आणि समर्थक नव्या पक्षासाठी फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे राणेंच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राणेंवर कॉंग्रेसने केवळ निलंबनाचा बडगा उगारला आहे. कॉंग्रेसमधून निलंबनाचा कालावधी ठरविलेला नाही. राणेंनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही; परंतु पक्षश्रेष्ठींसह ते सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत आहेत. कॉंग्रेसमधील आपणास एकही पद नको. हा पक्ष केवळ दलालांचा आहे. तेथे प्रामाणिक माणूस चालत नाही. पक्ष संपविणाऱ्या माणसांना तेथे मान-सन्मान नाही, अशी टीका राणेंनी केली आहे. त्यामुळे राणे आता कॉंग्रेसमध्ये फार काळ थांबणार नाहीत, या शक्‍यतेला बळकटी मिळत आहे. अधिवेशनानंतर आपली भूमिका जाहीर करताना ते कॉंग्रेसला स्वतःहून सोडचिठ्ठी देतील, असे चित्र कालच्या सभेनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे राणे आपली राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने ठेवतील, या बाबत उत्सुकता आहे. काल येथे झालेल्या मेळाव्यानंतर जवळच्या समर्थकांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत राणेंनी प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेतले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांनुसार पूर्ववैमनस्य विसरून शिवसेनेत परतावे. कॉंग्रेसने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असल्यास स्वगृही परतणे हितकारक ठरेल, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे. काही कार्यकर्त्यांनी मात्र नवा पक्ष काढून आपली ताकद आजमावायला काय हरकत आहे, असे मत मांडल्याचे समजते.

आपल्यालाही राणेंनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावे, असेच वाटते का? की त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून आपले सामर्थ्य दाखवून द्यावे...

15 comments:

Anonymous said...

सत्ता आणि पदासाठी नारायण राणे यांनी जे अकांड तांडव केले ते एका जेष्ठ राजकारण्याला
न शोभणारे होते. मुंबई वरील हल्ल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली होती तेव्हा अशी बेलगाम
वक्तव्ये करून त्यांनी आपल्याच पायावर धोन्डा मारुन घेतलाय.
आता कार्यकर्ते कितीही म्हणत असले तरी सेना पुन्हा त्यांना पक्षात परत घेईल अशी सुतराम
शक्यता नाही.त्यामुळे त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा पर्यायच आहे.स्वतंत्र पक्ष वगैरे त्यांच्या वकुबात
आहे असे वाटत नाही.

Anonymous said...

It's my opinion that, Mr. Narayan Rane's nature is different & it's suit for Shivsena, not for congress, so his decision to return in Shivsena will be best- Prof. Talule S S

Anonymous said...

YES!
NARAYAN RANE SHOULD RE-JOIN SHIVSENA AND BRING BACK BJP-SHIVSENA TO POWER, THIS TIME.
R.D.PADALKAR.

Sanjay Bhujbal said...

I think the situation in current days is better for SHIVSHENA -BJP and not for

congress.
If RANE returns in Shivsena the Shivsena-BJP will be more stronger and only in that

case we can see SHIVSHENA -BJP as a ruling party in Maharashtra Assembly.
And also congress should take care that Rane should not join the Shivsena so that

Congress-NCP can take advantage and due to dividing of votes Congress-NCP will

again won Maharashtra Assembly.
The BAD situation will come if Rane will eastablish a new political party and make alliance with MNS(Raj -Thakare), Janasurajya Party and other small parties.
In that condition Maharashtra assembly will be in triangular mode and Raj-Rane might be a kingmaker.
So to give stability Rane , Even Raj should return in Shivshena.

Yogesh said...

Rane should join MNS and go hands in hands with Raj as MNS is original Shivsena, the current shivsena is cat wearing tigers mask.

Anonymous said...

Basicaaly Narayan Rane is an absulute useless and a shame to polotics.Shiv Sena should just kick him out if he ever tries to re-enter.People of Maharashtra should see this reality and should never ever vote for such meaningless person.If I was PM,I would actually ban him from entering polotics again..

Anonymous said...

I am so amazed ( and sad too)to see people actually still considering Rane as politician and talking about options for him.
He is that kind of person who deserves to be thrown out of Maharashtra.

Anonymous said...

राणेंनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत नव्हे, तर स्वतःच्या कणकवलीच्या घरी वानप्रस्थापनात बसून स्वतःच्या पायावर कसा धोंडा मारून घेतला व पैशाच्या व सत्तेच्या लोभाने किती अफ़ाट फ़सवेगिरी केली व किती पिढ्यांची तरतुद केली त्याचा हिशोब करावा.
असे करताना स्वतःची मुलेपण वडिलांच्या पायावर पाय ठेवल्यामुळे कशी गुंडच बनली त्याचाहि विचार करावा!
काहीहि असो,त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे व लोकांनी त्यांना लाथा मारून हाकलायची प्रतिक्षा करू नये.त्यांचे समर्थकपण तितकेच संधीसाधू आहेत,त्यामुळे ते काय म्हणतात याकडे लक्ष देवू नये.
तसेच त्यांना शिवसेनेत पुन्हा प्रवेश मिळाला तर कित्येक लोक शिवसेनेला मते देणार नाहीत हे शिवसेनेने लक्षात घ्यावे! ही व्यक्ती अतिशय माजलेली,स्वार्थी,मतलबी व बिलकुल विश्वास ठेवू नये अशीच आहे व तिने वाममार्गाने अफ़ाट पैसे गोळा केलेले आहेत तर महाराष्ट्राच्या जनतेने हिच्यावर काडीमात्र विश्वास ठेवू नये.
या देशात असे दिसू लागले आहे की कुणीच प्रामाणिक नेता राहिलेला नाही!
श्री.रतन टाटा,श्री.नारायण मुर्ती या श्रेष्ठ व्यक्तींच्याकडे महाराष्ट्राला सोपवा व या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षांना उखडून टाका!
सगळे चोर आहेत जनतेला कायम फ़सवायला व राणे त्यातलेच आहेत.
या माणसाने SS त प्रवेश केला तर मी मतदानाला जाणार नाही जरी या पक्षाबद्दल मला आदर असला तरी!

Anonymous said...

Narayan Rane Should back to Shiv Sena without any condition along with his supporter. And try to bring the Shivsena-BJP in ruling of maharashtra. Because again if the NCP-cong. elected again then maharashtra has to suffer too much. Becuase the public has seen the politics of NCP and Cong.Worst for ever each minister is thinking to collect only money . So Either Rane has to support SS or apploize to Balasaheb and come back in SS. But not his aim should be the NCP-Cong. should not be as ruling part in maharashtra.

Unknown said...

Dear Shree Narayan Raneji,

Better think twice before taking any decision. You really need to bring back your earlier image in politics.Shivsena will be the best option for both you and Shivsena.These are my views.Regards

Unknown said...

I think Rane should join NCP and ruling goverment is Maratha (NCP) and not Pakistan (Congress). My last request to Mr.(Honourable after shivaji Maharaj and Sambhaji ) Sharad Pawar they should not go with congress if they are real maratha likewise us.All my brahmans friends will support to NCP.Please sir dont go with congress go with MNS. take Rane with u.Be the First Prime Minister from Maharashtra then Shivsena will support u sir.My Wishes for you sir. All the Best Jai Bhavani Jai Shivaji

Anonymous said...

नारायण राणेना जनतेच्या हिताशी काही देणे घेणे नाहीये. त्याना खरेच जनतेचे हित हवे असेल तर त्यानी घरी बसावे.मुख्यमंत्री पदासाठी ते कोणत्याही थराला जातील असे वाटते.

Anonymous said...

Narayan Ranela uddhavjini shivsenet gheu naye.... var eka mitrane mhantalyapramane tyani MNS havi aasel tar join karavi karan don gaddar ekach jagi baghayala nakkich maja yeil...aani satya baher nighel

Anonymous said...

He should join MNS because we want RAJ on any cost!

Anonymous said...

he should understand that he is over now. useless d... head.