Sunday, December 21, 2008

पेट्रोल पंपावर पायाभूत सुविधा हव्यात...

पुण्यातील पेट्रोलपंपचालक ग्राहकांना काही पायाभूत सु विधापासून वंचित ठेवत असून, विनाशुल्क हवा, स्वच्छ शौचालय, विश्रामकक्ष आदी गोष्टी उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरल्या आहेत, अशी प्रतिक्रिया ई- सकाळचे वाचक राघवेंद्र पवार यांनी व्यक्त केली.

ई- सकाळकडे आपले मत मांडताना ते म्हणाले, ''भेसळयुक्त पेट्रोलविक्री करणाऱ्या पेट्रोलपंपांची पुण्यातील संख्या मोठी आहे. कात्रज घाट, चांदणी चौक, पिंरघुटच्या अलिकडील पेट्रोलपंपावर ही परिस्थिती अ धिकच गंभीर असून, येथील पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत न बोललेलेच बरे. 99 टक्के पेट्रोल पंपांवर पेट्रोलचोरी केली जाते. ग्राहका ंच्या मागणीपेक्षा कमी पेट्रोल भरून ही चोरी केली जाते. रक्कम मात्र पूर्ण आकारली जाते. बऱ्याच पेट्रोलपंपावर साठवणूक केली जाते. मात्र, पट्रोलपुरवठा कंपन्या कवेळ बघ्याची भूमिका घेतात. वास्तविक पाहता पेट्रोल कंपन्यांनी जनजागृतीच्या दृष्टीने पंपाची संपर्क, पत्त्यासह नावे जाहीर केले पाहिजे. आणि त्यांनी केलेल्या परीक्षणात आढळून आलेल्या बाबी प्रसिद्ध केल्या पाहिजेत. पंपाच्या ठिकाणी हवा मोफत असल्याचे फलक आहेत की नाही, याची पाहणी केली पाहिजे. पेट्रोल वाटप मशीनच्या मापकाची तपासणी केली पाहिजे. तसेच, पेट्रोल शुद्धतेची चाचणी केली पाहिजे. त्याबरोबर पंपाच्या ठिकाणी शौचालय आणि विश्रामकक्ष आहे किंवा नाही, हेदेखील पाहिले पाहिजे.

आपल्याला याविषयी काय वाटते...श्री. पवार यांच्याप्रमाणेच आपल्यालाही असे काही अनुभव आले आहेत का, किंवा काही गोष्टींचे आपणही निरीक्षण केले असेल. तर आम्हाला नक्की कळवा.

5 comments:

Unknown said...

I think its a valid complaint as many pumps are forcefully selling only branded and costly petrol and diesel these days against the wishes of people. This high price harassment has to stop first. Also check on adulteration and 2T oil mixing by selling costly pouches against the more friendly pre-mixed is also a cheating source at many places. Asking customers for PUC and not ensuring zero in quick talk are some other tactics.
Companies wont / cant do anything as these people have unions and can hold the city for ransom by strikes and not selling. Its the police who have to show them lathi at times.

Unknown said...

To refresh memories of readers,many years ago,it had come in the newspapers that there was a very big scam in many petrol pumps,which were selling adulterated petrol & diesel.The extent of the scam in financial terms was mentioned to be of the order of Rs.35000/crores,with of course the pump dealers AND oil company executives being hand in glove & of course enjoying the police's & politician's blessings.

Off & on,in many parts of the country,tankers have been caught red handed in mixing/adulterating fuels including kerosin.We have NEVER heard of the action taken thereafter.As the number of vehicles AND prices of petroleum products have risen exponentially,the profit margins by these nefarious means too have gone up substantially.

Petrol pumps situated near exit points from cities including few mentioned by Shri.Raghavendra Pawar definitely sell adulterated petrol as my almost new car topped up at Ladkat pump near Katraj started giving engine trouble soon thereafter & this stopped only when the petrol was consumed.My mechanic advised me to avoid all such highway pumps, even though the fuel may be cheaper.

What we see/experience is only the tip of the iceberg.The oil companies and few DEALERS are also involved in a VERY BIG WAY in this racket,but the politicians and the police are NOT INTERESTED in stopping this as they too are the indirect beneficiaries.

As re: facilities like toilets etc at pumps,they are much desired & do exist,though not in a clean way at few highway pumps.

Unknown said...

ज्या देशात कित्येक कुंपणेच शेते खात आहेत तेथे पेट्रोलियम पदार्थांमधील भेसळ कोण थांबवू शकणार? भारत/हिंदुस्तान पेट्रोलियम वगैरे कंपन्यांचे उच्च पदाधिकारी व कर्मचारीच या भेसळप्रकरणात पूर्णपणे गुंतले असल्यामुळे बोक्यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

बर मंत्री मुरली देवरांना जाब विचारण्याची सोय नाही कारण ते हात झटकून मोकळे होणार! शेवटी "आम आदमी"लाच या सर्वाचा त्रास होतो किंवा भुर्दंड पडतो,पण त्याला कोण विचारतय या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशात?

पण पुण्याततरी कुलकर्णी पंपासारखे शुद्ध पेट्रोल व डिझेल विकणारे कांही पंप आहेत हे पण सत्य आहे!

Anonymous said...

पेट्रोलची चोरी हा पुण्यातला पेट्रोल पंपावरची नित्याचिच बाब आहे. तिथले कर्मचारी ही कधी ग्राहकांशी नीट बोलत नाहीत आणि ग्राहकाचे लक्ष्य नसताना पेट्रोलच्या मीटर मध्ये गड़बड़ करणे आणि फसवणे हा नेहमीचाच धंदा आहे. पंप चालकानी या मध्ये लक्ष्य घालून आपले कर्मचारी सेवा नीट देतात का याकडे लक्ष्य द्यावे ही माफक अपेक्षा आहे. विनाशुल्क हवा, स्वच्छ शौचालय, विश्रामकक्ष आदी गोष्टी तर स्वप्नवत आहेत.

Unknown said...

पेट्रोल पंपावर टॉयलेट ची सुविधा दिल्यास लोकांना अत्यावशक प्रसंगी खूप मदत होईल. परंतु पंपावरील लोक टॉयलेट वापरण्यास मनाई करतात.सदरचे टॉयलेट फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहे असे सांगतात.