Friday, December 05, 2008

"हायकमांड'च्या तालावर...महाराष्ट्र वाऱ्यावर

मुंबईवरील अभूतपूर्व दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या महाराष्ट्राला सध्या नेतृत्वच नसल्याची अवस्था आहे. हल्ला झाल्यापासून म्हणजे २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सुरू असलेला राजकारण्यांचा घोळ आज (शुक्रवार) तब्बल दहा दिवस होत आले, तरी कायम आहे.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलेला राजीनामा राज्यपाल जमीर यांनी गुरुवारी स्विकारला आहे. त्यापूर्वी, सोमवारी (एक डिसेंबर) उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला.

हल्ल्यानंतर पोलीस तपास, गुप्तचर यंत्रणा यांच्यात समन्वयासाठी, नागरीकांना दिलासा देण्यासाठी, सुरक्षिततेची हमी देण्यासाठी राज्याला सक्षम नेतृत्वाची तीव्र गरज आहे. नेमक्‍या अशा परिस्थितीत राजकारणाने डोके वर काढल्यामुळे या सर्वांचा विसर पडून फक्त नेतेपदासाठी चढाओढ सुरू असल्याचे विकृत दृष्य महाराष्ट्रात दिसत आहे.

आर. आर. पाटील राष्ट्रवादीचे नेते. त्यांच्या राजीनाम्यानंतर तातडीने राज्याचा गृहमंत्री निश्‍चित झाला असता, तर पोलीस यंत्रणेला नेतृत्व मिळाले असते. तथापि, तोही गेले चार दिवस झालेला नाही. तीच अवस्था देशमुख यांच्या कॉंग्रेस पक्षाची. "काढत नाहीत, म्हणून जात नाहीत...', अशी देशमुख यांची अवस्था संपली ती बुधवारी रात्री. त्यावेळी कॉंग्रेसने त्यांना पायउतार होण्याचा आदेश दिला. तो त्यांनी शिस्तबद्धपणे पाळलाही.

या दोन्ही नेत्यांनंतर राज्याची जबाबदारी कोणावर द्यायची, हा विचार राजकीय पक्षांनी जितक्‍या तातडीने करण्याची अपेक्षा नागरीकांना होती, तितक्‍या तातडीने तो झालेला नाही, हे आता स्पष्ट होत आहे. दोन्ही कॉंग्रेसमध्ये नेतृत्वासाठी चढाओढ, लॉबिंग सुरू आहे.

निवडणुकांच्या तोंडावर किंवा एरव्ही राज्यातील परिस्थिती सामान्य असताना असे राजकारण पाहण्याचा महाराष्ट्राला अनुभव आहे. यावेळी तशी परिस्थिती नाही. मुंबईवर झालेला हल्ला परतवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च शक्तीला, लष्कराला साठ तास लागले. दहा दहशतवाद्यांसमोर भारतीय हतबल आहेत, असा संकेत त्यातून जात होता. राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), मुंबई पोलीस, मुंबईचे अग्नीशामक दल आणि सामान्य मुंबईकराने विलक्षण सामर्थ्य दाखवून हा संकेत फोल ठरविला. मात्र, त्यातून राजकारण्यांनी धडा घेतला आहे, असे चित्र दिसलेले नाही. अन्यथा, नेतृत्वहीन महाराष्ट्र जगासमोर आला नसता. दोन्ही कॉंग्रेसने निर्णय "हायकमांड'वर सोपविलेले आहेत. आमदारांची मते, मंत्र्यांचा कल, दिल्लीतील "संपर्क' आदी खास राजकीय निकषांवर महाराष्ट्राचे नवे नेतृत्व निवडले जात असताना नागरीकांची अस्वस्थता दुर्लक्षित राहिल्याचे सरळसरळ जाणवते आहे.

तुम्हाला काही म्हणायचेय या राजकारणावर? इथं तुमचं मत जरूर व्यक्त करा.

20 comments:

Anonymous said...

Bhujbal saheb was involved in Telgi scam. Have he got cleancheat from CBI ?? Really memory of Indian public is very very short.

Anonymous said...

Politicians in our country are disgusting. No way it should have taken so much time to elect CM, Deputy CM and Home Minister, especially when our State is in a fragile situation like this. I have been following the coverage of Mumbai attacks since last week, through ESakal. My observation - Each political party has been making every single attempt to get the most out of this situation, rather than securing our borders and comforting the people in our country (who elect these Governments). Our democracy is 60+ years old, but not mature enough. I hope this change sooner than later.

Mandar N. (Phoenix, Arizona)

archana said...

maharashtrala rajkarni Natyanchi nai tar khambeer loksewakashi Jaruri aahe.

Charudatta Mundale said...

phakta Baai and Batli maddhe ramlele aaplya netyan kadun ajun kay apeksha karaychi?

Anonymous said...

The sick ruling politicians both at the centre and M'tra state are disgusting,selfish,corrupt & birds of the same feather.This drama that is going on in sickening.
What has the congress president with very low knowledge of anything under the sun got to do with choosing a CM for M'tra.
NCP is no better despite comparatively greater experience & knowledge of it's president because they are all pigmy stool pigeons with very narrow minds.
या सगळ्यांना पुढच्या निवडणुकांत हरवून कायमचे घरी बसविले पाहिजे,पण त्यासाठी सर्व मतदारांनी मतदान केले पाहिजे.
राजस्थानमध्ये तसे झालेले दिसत आहे कारण पहिल्यांदाच ६८ टक्के मतदान झाले.
सर्व एकाहून एक चोर आहेत व त्यांच्यात कणखरपणा,नितीमत्ता,हिंमत यांचा पूर्ण अभाव आहे.
लाथा घाला या भेकडांना तसेच त्यांना डोलाविणा-या कॉंग्रेस पक्षाध्यक्षांना तरच हा अभागी देश वाचू शकेल!

niTin said...

Dont you think Shivsena & MNS is better than these politician, I request Thakray family join your hand for Maharashtra.
BJP has same culture no aggressive leader.

Therefore any bull shit corrupted leader dare to talk against Marathi & Maharashtrian people.

*** Wake UP Maharashtrian and Marathi people. ***

Jai Hind
Jai Maharashtra

Anonymous said...

Somebody please shoot them !

Anonymous said...

Maharashtrala garaj ahe kanakhar, kahmbir ani nirbhid netrutwachi. Ase fakt ekach nav ahe Raj Thackrey.

Anonymous said...

I'm VERY disgusted by the sight and news of what is happening in Maharashtra and at the center. Rulling politicians at Center and in the state are VERY corrupt, incapable and heartless. Almost 200 innocent people have died in these attacks. I had tears in my eyes while watching the coverage and these shameless Congress politicians are busy in grabbing the CM's post. What a tragedy for the country. Don't know whom to blame but I'm so disgusted with Sonia, Pawar, Manmohan and the rest of the Congress company. God bless Maharashtra and the country. These guys are so detached from the common citizens that they still don't get it. They are still playing the same political games after such a horrible tragedy when these games have sent the country to drains.

Only hope in these dark times is local and regional media. National media and Hindi/English news channels are also sold out. It is upto the local media now to stand up to this and expose corrupt politicians and please, please don't spare the Congress as well. We don't need dynastic rule. We need capable leaders who are elected by the people and for the people. We don't want appointed leaders like Manmohan and Rahul Gandhi.

captsubh said...

आजचाच अनुभव सांगतो.एका महत्वाच्या कामाकरता म्हात्रे पुलाजवळ जायचे होते सेनापती रोडने,पण राष्ट्रपती पुण्यात असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमासाठी नेहेमीपणे पोलिसांनी रस्ते अडविले होते व फ़क्त लाल दिव्यांच्या गाड्याना मार्ग काढायास ते मदत करत होते.न हलणा-या वाहतुकीत ४५ मिनिटांत फ़क्त १ कि.मी.प्रवास केल्यावर नाद सोडून "U" turn घेवून घरी परतलो.
परत येतांना असंख्य कोलेजचे तरूण तरूणी हातात दहशतवा्द व राजकीय नेत्यांविरूद्ध फ़लक घेवून शांततापूर्व सेनापती बापट रस्त्याने पायी चालले होते.

या वर्षी फ़ेब्रुवारीमध्ये कामाकरता मुंबईस जाण्यास पुणे रेल्वे स्थानकावर "शिवनेरी" बसमध्ये बसलो,पण माझ्या दुर्दैवाने त्या दिवशी आपले लाडके[?]पंतप्रधान पुण्यात असल्यामुळे बहुतेक सर्व मार्ग बंद होते व तब्बल २ तासात बस वेडीवाकडी वळणे व Diversion घेत जेमतेम ६-७ कि.मी.गेली होती.मुंबईजवळ बस आली तर तेथे पण कुणी नेता आला असल्यामुळे दादर एशियाड स्थानकावर पोचायला तब्बल साडेसहा तास लागले व जवळजवळ मध्यरात्र झाली होती!

राष्ट्रपती २-३ दिवसांपूर्वी जखमींना भेटायला २-३ दिवस मुंबईत होत्या तेव्हा याच कारणामुळे ट्रफ़िक जाममुळे माझ्या मित्राला असाच अतिशय वाईट अनुभव आला! आता असे नियमितपणे अनुभवास येत असल्यामुळे या सर्वच नेत्यांचा अतिशय राग येतो! हे समजतात काय स्वतःला?
पण त्यांना त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या लाडक्या "आम आदमी"ची बिलकुल फ़िकिर नाहीं.

तरूण व सर्व स्तरावरच्या आबालवृद्ध मंडळींच्या हे सर्व लक्षात येते आहे ही फ़ार चांगली गोष्ट आहे कारण या भिकार नेत्यांच्या खोट्या आश्वासनांवर व मोठाल्या फ़लकां/फ़्लेक्सबोर्डवरच्या हस-या थोबाडांवर जनतेने यापुढे तरी विश्वास ठेवला नाही व आवर्जून योग्य व्यक्तीस/पक्षास मतदान केले तरच या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा जनतेशी खेळ थांबेल!
वर एकाने लिहिले आहे की श्री.भुजबळ तेलगी scam मध्ये गुंतलेले होते तेच उद्या उपमुख्यमंत्री होणार आहेत!!! छानच असतात आपल्या बातम्या हल्ली!

Anonymous said...

NOTHING WILL CHANGE FOR PEOPLE THEY REMAINS UNSAFE EVERYTIME NO USE OF TODAYS POLITICIANS SINCE ELECTION IS COMING SOON SO THATY THEY ARE JUST SHOWING ATTENTION TOWARDS THESE MATTERS AFTER ELECTION EVERYONE FORGOTS THESE DAYS WHICH WE FACED

Anonymous said...

Kill these bastards. They are real monsters. They don't care about common peoples and their fillings. They only want satta.

Anonymous said...

Why in Pimpri Chinchwad they are planning to make BRT ? Since its developing very fast thaty ? Dont make condition like satara road of pimpri roads ...They are doing this only for money i think Every politician is for just only for earning money.

don said...

I think there is no change in Politicians mind as they always thinking about power & corruption. We don't want to change leader of Maharashtra, we want to change whole system of Maharashtra. I know this government is also remote government because all movements are move from Delhi High Command. I just hate this all system. I salute all soldiers. Jai Hind & Jai Maharastra.

Milind Warkhede said...

मला हेच समजत नही की मराठी नेत्यांना परिस्थिति कळत कशी नाही प्रत्येक जन पदासाठी चढा ओढ़ करतो आहे. आज लोकांच्या मनात राजकारण विषयी तीव्र संताप आहे अणि हे नेते दहशद वादासरख्या संवेदनशील विषयाचे राजकारण करीत आहे. कोणी म्हणतो मराठीच इतके मेले कोणी म्हणतो कमांडो नसते तर 'मुम्बैचा ताज' राहिला नसता काही नेते महाराष्ट्रा बाहेरून पैसे पाठवून राजकारण करताहेत हे बघून लोक काय विचार करत असतील? इथे निर्दोष मरातायेत अणि हे लोक स्वताची चपाती भाजून घेत आहेत.आशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येवून दह्शद वादा विरुद्ध लड़ा द्यायला हवा .ताज समोर लोकांच्या हातातली पोस्टर्स भघुन तरी ह्यांना अक्कल यायला हवी.निवडनुका डोल्या समोर ठेवून हे चली रचतात यात कही अर्थ नाही.११ महिन्यन्कारिता कोण मुख्या मंत्री होणार यासाठी एवढी खटाटोप ,आगपाखड तर ५ वर्ष साठी किती ? लाज वाटते यांची. काय साध्य होणार तुमचे राजीनामे देवून? आज दह्शदवाद समन्यानपासून 'ताज पर्यंत' पोह्चलाय तरी तुम्ही भांडत रहाल एका खुर्ची साठी .जे जनतेच्या मनात स्थान प्राप्त करू शकत नाही ते महाराष्ट्राचे नेतृत्व काय करणार. यामुले उगीचच महाराष्ट्राची प्रतिमा देशा समोर ,जगा समोर मलिन होत आहे आता तरी जागा लोकांनो रस्त्यावर या एकजुट व्हा लड़ा दया घरात बसून नुसता टी.वी बघत नका बसु.

Mihir said...
This comment has been removed by the author.
Mihir said...

raajkaran aani raajkarani yanchyabaddal kaahihi bolayache mhatale ki waaiT shabdach yetat. dusare kaahi yeuch shakat naahi. tyamule tyavar energy kharch karanya peksha ... khara mhanaje aata vel aaliye ki pratyekane sakriya raajkaranat utaranyachi.
1. Pimpri-Chinchwad la BRT karanar aahet, tyachi ammal-bajavani na karu denyachi. pratyekane swata:hun sahabhag gheun, morcha, andolane karayala pahijet. jar tarihi kam suru zale tar tithe kamachya jagevar jaaun 'aadhi amachya angavar hatyar chalava, magach rastyavar' ase thaam-pane sangayala pahije.
2. Holkar bridge vagaire bhagat navin rastya sathi zaade todanar aahet. tithehi apan jaaun 'aadhi amhala toda, mag zade toda' ase sangayala pahije.
3. Narayan Rane yanna CM chi khurchi milali nahi tar lagech tyanni 'chorachya ulatya bomba' marayala suruvaat keli. jyanchya taTalit khanar, tyachyach taTalit thunkaNaaryaa hya manasala (ki pashula) jivant rahanyachach adhikar naahi. ha kay lokankade baghanar, tyanna dheer denar !! Congress ne tyala changala dhaDa shikawala aahe ase mala watate. asalya manasa-barobar asech vagayala pahije. Apanahi tyala ajibaat sahanubhuti nahi dili pahije.
4. Bhujbal yanna Dy.CM kuthalya nikashaavar kele ? yache uttar kunihi dilele naahi. karan hya tathakathit netyaannaa ase watatach naahi ki te lokansathi aani lokanmule raaj-karanaat aahet.
5. ek vyakti itaka motha nirNay kasa gheu shakate. to nirNay tya eka vyaktipurata aahe ka ? to nirNay jar maharashtra sarakhya eka rajya-baddalacha asel tar to sagaLyaanni muLun ghyayala nako ka? ka aapan tyanchya haatatale baahule banalo aahot.

EkuN kay kunihi raajiname dile aani kunihi sattevar aale tar paristhiti tashich rahanar aahe.
aani yavar upay ekach. hya raaj-karaNyaanchya pratyek kruticha tyanna jaab vicharayala pahije. aani tyachyahi aadhi aapan apalyalach prashna vicharale pahijet ... ki mi deshasathi kay karato ? deshachya surakshitate-sathi kay karato ? hyaag blog var ajun eka thikani apalyalach doshi maanalele aahe. mala agadi paTale te mat. kharay apanach doshi aahot. apan nusata vichar karato pan 'aachaar' naahi, krutit aaNat naahi, niyam paaLat naahi, apali jabaab-daari samajat naahi. aata kruti karaNyaachi veL aahe. aani te kaam apanach swa-preranene kele paahije. kuthalyahi pakshachi madat na gheta. kaaran ekhadya party-chi madat ghetali tar parat ti party tyancha swarth baghaNaar !!

captsubh said...

ब-याच विचारमंथनानंतर एक शिकलेली, पण साधारण,सामान्य,अपरिचित,जाडजूड व झोपाळू व्यक्ती तिच्या गांधी घराण्याबद्दलच्या वडिलोपार्जित एकनिष्ठतेमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्यापासून विराजमान होणार आहे.एका अनुभवी,तडफ़दार,कणखर,प्रभावशाली,हिंमती,जनाधार असलेल्या अशा नेतृत्वाची निवड करण्यात येइल अशी अपेक्षा होती,पण जसे राष्ट्रपती निवडीसाठी अनेक वजनदार व्यक्तींना डावलून सध्याच्या विद्यमान स्त्रीव्यक्तीची निवड झाली तसेच याहि वेळा झालेले दिसत आहे.यावरून दाट संशयाला जागा आहे की अननुभवी पण गांधी परिवाराला एकनिष्ठ असलेल्या २-३ व्यक्तींच्या नांवांच्या चिठ्ठ्या पिशवीत बंद करायच्या व कांही दिवस गेल्यावर न बघता हात आत घालून ज्याला मुख्यमंत्रीपदाची Lottery लागेल त्या व्यक्तीला खुर्चीत बसवायचे येवढेच याला महत्व.

त्यानंतर ही व्यक्ती इतकी नतमस्तक होते गांधी परिवाराकडे की तिला सहजपणे कठपुतळीसारखे नाचविता येते! आधीचे मुख्यमंत्री व महसुलमंत्री यांच्यात इतके वितुष्ट होते की मुख्यमंत्री असूनहि ते महसुलमंत्र्यांना कुठलाहि जाब विचारू शकत नव्हते, त्याचा पूरेपूर फ़ायदा घेवून नारायणांनी स्वतःच्या व नातेवाईकांसाठी पुष्कळ नियमबाह्य कामे करून घेतली व प्रचंड नफ़ा कमावला!

अर्थात यात मुख्यमंत्रीपण मागे राहिले नव्हते! आता महसुलमंत्री आपली मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा पूर्ण करू न शकल्यामुळे मधूनमधून बंडखोरीच्या घोषणा करत रहाणार व ज्येष्ठतेच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना सहकार्य देणार नाहीत हे ओघाने आलेच. यात प्रचंड नुकसान होतच रहाणार राज्याचे व आम आदमीचे! जो महसुलमंत्री वनखात्याची जमीन नियमबाह्य रितीने एका प्रायव्हेट शिक्षणसंस्थेला बहाल करू शकतो,कार्ल्याजवळील इंद्रायणी नदीच्या पात्रात ३०००० ट्रक राडारोडा टाकणा-या दोन बिल्डरना अभय देवू शकतो इत्यादि इत्यादि, त्याच्याकडून दूसरी काय अपेक्षा करता येणार?

तसेच एका राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नाही कां बसविले तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या शिबू सोरेनना त्यांच्या अणुकराराच्यावेळच्या समर्थनामुळे?

असो,हा मुद्दा कालबाह्य झाला आहे व नितीमत्ता हा शब्दच विसरलेले कॉंग्रेस जुन्या परंपरेनेच चालले आहे, त्यावरून भारतातील जनतेचे भवितव्य उज्वल नक्कीच नाही,मग अतिभयंकर अतिरेकी हल्ले होवोत किंवा भुकंप होवोत!पुढच्या निवडणुकांत खुप विचार करूनच आवर्जून मतदान करण्याची वेळ मात्र निस्चितच आलेली आहे!

shripad said...

hich vel aahe marathi manasala jag honyachi.... aaj maharastrala RAJ sahebanchya netrutvachi nitant garaj aahe...maharastrane dakhavoon dile pahije ki maharastra babat mahatwache nirnay ghenyacha saravaswi adhikar phakt marathi manasala aahe..... jo itar rajya niyamit pane palat aala aahe!
jai Bhavani!
jai Shivaji!

Anonymous said...

MAHARASHTRA PEOPLE ARE USED ONLY TO PAY TAXES TO THE GOVETNMENT OF INDIA.

MAHARASHTRA PEOPLE PAY 35% OF THE TOTAL TAX TO THE COUNTRY.

CONGRESS HIGH COMMAND IS USING OUR TAXES FOR MISLEADING AND USING MAHARASHTRA.

PAY NO TAXES TO GOVETNMENT.

DEFEAT GOVERNMENT THAT ARE RULED BY HIGH COMMAND.

SAVE INDIA, SAVE YOUR MONEY.
RATHER GIVE TO POOR OR CHARITY, THEN THESE CORROUPT POLITICIANS.