Sunday, December 07, 2008

सरकार नावाची यंत्रणा खरंच आहे?

गेले दोन दिवस महाराष्ट्राने जी परिस्थिती अनुभवली त्याचे वर्णन "निर्नायकी' या एकाच शब्दांत करता येईल. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश वेठीला धरणाऱ्या, दोनशे लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी हल्ल्यानंतरही दोन दिवस महाराष्ट्रासारख्या प्रगत (म्हणायचे की नाही?) राज्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हते. ही गोष्ट शरमेची तर आहेच पण सर्वसामान्य लोकांप्रती सरकार किती जागरुक आहे, हे दाखवायला देखील पुरेशी आहे.

ज्यावेळी महाराष्ट्राला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती, त्याच काळात स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेण्याचा, शह-काटशहाचे राजकारण करण्यात प्रत्येकजण गुंतला होता. नेतृत्व निवडीवरून जो काही गोंधळ कॉंग्रेस पक्षाने मांडला होता, त्याला तोड नव्हती. २६ तास चर्चेचे गुऱ्हाळ मांडूनही आपण राज्याला नेतृत्व देऊ शकत नाही, यातच कॉंग्रेसचे या प्रश्‍नाप्रती नसलेले गांभीर्य लक्षात येते. या प्रश्‍नाचे परीक्षण कॉंग्रेसने लोकांसाठी नाही, तर निदान स्वतःसाठी (आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून) केले असते, खूप झाले असते.

आर.आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या आधी (मग ते काही तास का असेना) उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे करून राष्ट्रवादीने थोडातरी सूज्ञपणा दाखवला.

एवढ्या गोंधळानंतर तरी सर्व आलबेल होणे लोकांना अपेक्षित असले तरी "सत्ताकारणात' असे होतच नाही. म्हणूनच अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होताच नारायण राणे यांनी पक्षावर आणि पक्षनेतृत्वावर टीकेची तोफ डागून पक्षामधील लोकशाहीची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली.

खरं तर ही वेळ कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला कुरवाळत बसण्याची नव्हती. राज्यात कोणत्या परिस्थितीत नेतृत्व बदल केला जात आहे, याची जाणीव राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवी होती. मात्र कोणत्याही कारणाने होत असलेला नेतृत्वबदल हा प्रत्येकालाच सत्तेची पोळी भाजायला सोयीचा वाटला. आणि सर्वचजण खुर्चीसाठी पुढे सरसावले होते. मग राणेंनी तरी विवेक का बाळगावा?

वास्तविक अतिशय नामुष्कीजनकरीत्या आघाडी सरकारला नेतृत्वबदल करायला लागला होता. अशावेळी किमान सर्वांनी नवीन नेत्याला पाठिंबा देत लोकांच्या मनात विश्‍वासार्हता निर्माण करत दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या मुंबईला सावरणे आवश्‍यक होते. त्याचबरोबर सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देणे, भविष्यकाळात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा होता. पण, लोकांना पहायला मिळाली ती नेत्यांची संकुचित मनोवृत्ती आणि सत्तालालसा. त्यामुळे रुढार्थाने जरी आता महाराष्ट्राला नेतृत्व मिळाले असले,तरी महाराष्ट्रातली "निर्नायकी' संपली असे अजून तरी म्हणता येणार नाही. आणि हा निर्नायकी महाराष्ट्र सतत धुमसत राहील, हे सांगायला वेगळ्या भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही.

आपल्याला काय वाटते? नक्की लिहा...

11 comments:

आशा जोगळेकर said...

आपण असेंच आहोंत प्रसंग काय वेळ कोणती ते भान न ठेवणारे । माझ्या झुळुक ब्लॉगवर ह्या संबंधीची एक कविता टाकलीय वाचावीशी वाटली तर प्रतिक्रिया आवडेल.

Unknown said...

सरकार ही काय चीज आहे ते आपण कित्येक महिने अनुभवतोच आहे.संधीसाधू नारायण राणे यांनी तब्बल अडीच तीन वर्षे वाट बघितल्याव्रर त्यांचा जेव्हा भ्रमनिरास झाला, तेव्हा त्यांनी असा थयथयाट केला जसे त्यांना सरकारमध्ये कांहीच आलबेल नव्हते हे दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच समजले! म्हणून त्यांच्या प्रामाणिक[??] नितिमत्तेस ते न पटल्यामुळे त्यानी सर्वोच्च कॉंग्रेस नेतृत्वावर शरसंधान केले व आपल्या खिशातल्या[?] २५-३० आमदारांसकट बाहेर पडून सरकार पाडण्याची धमकी दिली.
त्यानंतर एक दिवसांतच त्यांनी घुमजाव करून त्यांची आगपाखड फ़क्त सोनियांच्या स्वीय सहाय्यकाबद्दल होती असे स्पष्टीकरण दिले व त्यांची सरकार पाडण्याची धमकी हा एक फ़ुसका बार होता हे सर्वांच्या लक्षात आले.
एकंदरीत आपण किती खालच्या दर्जाच्या राज्यकर्त्यांच्या हातातले बाहुले बनलो आहोत त्याचे घृणास्पद दर्शन घदले या गेल्या आठवड्याच्या नेतेनिवडीच्या निमित्ताने! राणे म्हणतात सर्व कॉंग्रेस देश विकायला निघाले आहे,विलासरावांनी खुप माया जमविली आहे,पण भ्रष्टाचाराची प्रकरणे स्वतःवर पण शेकू सकतात अशी उपरती झाल्यामुळे त्यांनी शेपुट त्वरितपणे पायात घातली व महाराष्ट्राच्या लाडक्या जनतेला अशा संकटकाळी सुरक्षित ठेवण्याच्या उदात्त इराद्याने सरकार पाडणार नाही अशी ग्वाही दिली!
वा ! काय जनतेचा पुळका आला या स्वार्थी नेत्याला !
कॉंग्रेस पक्षाने तर अशा कठिण काळीसुद्धा आपण किती मतलबी, खालच्या दर्जाचे व फ़क्त गांधी घराण्याचे मिंधे आहोत त्याचे जाहिर प्रदर्शन केले!
विलासराव,नारायण राणे इत्यादिंची अनेक बिंगे गेली कांही वर्षे या पक्षाने गुलदस्त्यात लपवून ठेवून लोकांचा विश्वासघात केला व भ्रष्टाचारास खतपाणी घालणे चालू ठेवले !
या सर्व घटनांवरून येथिल जनतेने धडा शिकून कॉंग्रेस/NCP ला कायमचे तडीपार करण्याची वेळ आली आहे ! तोपर्यंत दम धरूया ! काळ आलेला आहे,पण वेळ यायची आहे !

P.S.श्रीमती आशा जोगळेकर,
आपली कविता वाचायची संधी देण्यासाठी तिची लिंक द्या.तरच अभिप्राय देउ शकू!

Anonymous said...

marathi lokanna shhapach aahe----ek mekachi tangadi odayachi

Anonymous said...

so non maharashtrian r taking chance

Anonymous said...

Corrupted minister need to get exposed. Need a inquiry for the Narayan Rane's purchase or acquiring of PRIME PROPERTY in PUNE.

Unknown said...

No single leader in a driving seat, or "Nirnayakee Avastha" as you call it, is a direct resultant of the "coalition politics in democracy" which are allowed to grow in this country, from better to worse.

For example, let us assume that if (I am saying IF, which is hypothetical but people can ponder at this idea well), India as a Country allows only 2 Major Political parties for MP elections. Same goes with States, which should allow only 2 parties for MLA election. Same goes at Municipal councils for Corporater's election.

Imagine what could happen. The other parties, which are not allowed to participate in elections, will have to either club with Those Recognized or else, keep away from elections.

Imagine what fantastic results can be achieved as "Any Opposition Group which has to oppose the one in Power" has to necessarily join the opposition only and if they resign, it would mean that they wont be in Politics.

So, whenever elections are over, there are NO COALITIONs. There are no Horse-Trading situations. Either a clear majority (51 & min) or else sit in opposition for 5 years. A TIE may be there rarely, but I am sure, solutions can be thought up for that.

So after elections, next stage is to elect a leader amongst themselves. They will, if they dont, they will fall and opposition will grab power by default.

Readers, this is a hypothetical but simplest looking solution for current politics.

Anyone stands up today and opens a new party in any region. This must not be tolerated and also banned my making new laws.

The problem is the current lawmakers will be so much against this idea, (knowing well that it will dig their political graves), they wont go for it.

So those who like this idea can put pressure on Government to try it at least at Panchayat level first....! Lets think of MPs and MLAs next...!

Unknown said...

I really liked the idea put forward by shri.Shrikant Atre.If this is implemented,most of the present day problems will be over.

Shri.Balasaheb Thakare had suggested 4 years ago in an interview that votes should be given to either of the parties with no name of any candidates & depending on results,paries were free to nominate whosoever they wished.This way,party could replace non performers,corrupt people.
Besides,no individuals will need to spend so much on campaigning.
I think this idea too is great.

Unknown said...

Yes Capt. Subhash,

That idea is also very good !

What is important at the moment, is to think out-of-box or radically-uncommon / different..! If we (I mean all of us) dont do that, the known options of Vote-For-Good-Men and Why-Dont-You-Vote are (I am afraid) not going to work. These are so worn-out and proven to be unrealistic by far that whosoever we vote for now, will end up doing same thing...! That is filling his or her own pockets...!

Anonymous said...

The Delhi assemply poll results are out and Congress has won. How on earth Congress can win when all of the country is against it? There is something seriously wrong with the democracy and polling system. Minorities and caste based politics are now playing fetal role. These results are unfair and can't be accepted by majority of people who wish anything good for India.

50% of population still does not come out for voting who really are non-congressi voters; and this fact means minorities control the result. Congress party workers bring 100% muslims for voting through their vehicles. When BJP brings Hindu's in similar way it is called communal. Shame.

Anonymous said...

ONLY 30% People VOTE. OUT OF THIS 30%, MUSLIM and CHRISTIAN CHUNKS VOTE ARE 50% and vote 100% FOR CONGRESS!

THE REMAINING 50% of 30% get divided between BJP, COngress, DAL, CPM, INDEPENDENT, SAMAJWADI, ETC.

SO, only 15% oF VOTES IS OUR DEMOCRACY!

EDUCATED AND GOOD PEOPLE DONT EVEN VOTE OR CARE TO VOTE!

THIS IS THE PICTURE OF DEMOCRACY IN INDIA!

abhijeet said...

wellcome!!! U.P.\BIHARI !!!!
plz take a chance .see how MARATHI MANUS are fighting with each other for power!!