Tuesday, December 09, 2008

चव्हाण मंत्रिमंडळाचा शपथविधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

त्यात २६ कॅबिनेट व १३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. जुन्या मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या सतीश चतुर्वेदी व प्रा. वसंत पुरके या दोन कॅबिनेट मंत्र्यांना आणि बाबा सिद्दीकी व रणजित कांबळे या राज्यमंत्र्यांना; तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख अशा एकूण पाच मंत्र्यांना वगळण्यात आले. दहा मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला असून, त्यात आठ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल एस. सी. जमीर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; तसेच कॅबिनेट व राज्यमंत्र्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर आधी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व नंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी, तर छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाली; परंतु कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी ठरत नव्हती, त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची निवड होऊनही शपथविधी लांबणीवर पडला होता. आज त्याला मुहूर्त मिळाला व नवे सरकार अस्तित्वात आले.

या नव्या मंत्रिमंडळाबाबत आपण समाधानी आहात काय? समाधानाचा मुद्दा काही काळ बाजूला ठेवला, तरी या मंत्रिमंडळाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरेल का? दहशतवाद हा या सरकारसमोरील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असेल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच सांगितले. पण, ही प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करायची, हेदेखील आत्ताच ठरवून घेतले पाहिजे. तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा...

5 comments:

abhijeet said...

is ther any change in fram of mind ?of this pepol..(SO CALLED MANTRIMANDAL).NO use of changing ministers...(in other word" repairment").

Anonymous said...

What was the need of all cabinet sworning-in? Was it a resignation of whole Congress govt? It was just a matter of CM and deputy CM replacement and was internal matter of concerned parties.

Btw it won't change matters at all. Vilasrao and RR were scapegoats as per Congress tradition made in an attempt of salvaging image of the party.

Anonymous said...

To above comment,

When a CM resigns, whole cabinet automatically stands to have resigned. That was the reason for change in other ministers.

- SA

Anonymous said...

1]Old stale & stinking wine in new bottles,which will only leave a bad taste in the mouth in coming months!
2]Spoiled Ministerial aspirants fought tooth & nail for spoils of office,while Maharashtra burns!
3]Sycophancy of the highest order, while moral degradation of the lowest order!
4]Loser casts an evil eye,while the devil in him takes to the streets!
5]Former failed Energy Minister rewarded the Finance portfolio!
6]Finally fickle people get the weak govt they deserve!

Anonymous said...

हे नवे नेते एकाच माळेचे मणी नव्हेत, तर चोर आहेत.त्यांच्यापेक्षा मोठे देशद्रोही दूसरे कोणी नसतील.
जनतेला वेठीस धरून,जनतेच्या पैशाने मौजमजा करणारे हे महागुंड झेड सिक्युरिटीच्या कवचात किंवा कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहून स्वतःचे संरक्षण करतात,पण त्यांच्या "आम आदमी"च्या संरक्षणाला यांच्या सतत दिमतीला असणारे पोलिस धावून येत नाहीत.
तीन वर्षे सत्ता उपभोगून गैरमार्गाने प्रचंड पैसे गोळा करणारे राणे यांच्या आत्ता लक्षात आले की "कॉंग्रेस पक्षात सारा खेळ होतो तो फक्त पैशाचा".
यांची इच्छापूर्ती झाली नाही म्हणून आता कॉंग्रेस पक्षाचे पितळ उघडे पाडायला निघाले,पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसविले गेले असते तर स्वतःच्या पैसे खायच्या कुरणांची व्याप्ती यांनी अनेकपट वाढवली असती!
अर्थात नव्या मंत्रीमंडळातील सडलेले महाभाग पुढच्या ९-१० महिन्यात वाममार्गाने स्वतःच्या विकासाच्या संधीचे सोने करणार हे निस्चितच आहे!
महाराष्ट्राची व सर्वसाधारण मराठी माणसाची मात्र कीव येते खरोखरीच!