बराक ओबामा का जिंकले?
अवघ्या दोन वर्षांपूर्वी बराक हुसेन ओबामा कोणाला माहिती होते?... फारसे कोणालाच नव्हते. अमेरिकेच्या राजकीय नकाशावर उदय होण्याइतपतही इलिनॉसच्या या सिनेटरचे राजकारणात स्थान नव्हते.
मग ते जिंकले कसे? चतुर आणि शिस्तबद्ध प्रचार, पैशाचा प्रचंड वापर आणि अनुकूल राजकीय वातावरण हे तीन मुद्दे ओबामांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले, असे जागतिक प्रसारमाध्यमांनी विश्लेषण केले आहे.
उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत ओबामांनी हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या दिग्गजाला मागे टाकले, तेथेच ते अर्धी लढाई जिंकले. उरलेली लढाई त्यांनी पैशाच्या जोरावर जिंकली. प्राथमिक फेऱ्यांतच ओबामांना वाढता प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. दात्यांची संख्या जशी वाढत गेली, तसा त्यांनी प्रचारासाठी सरकारी पैसा नाकारला. त्यामुळे पैशाच्या वापराचे बंधनही त्यांच्यावर उरले नाही. त्यांच्या प्रचार मोहिमेला पैसा देणाऱ्यांची मोठी फळी उभी राहिली. "फेसबुक'चे संस्थापक ख्रिस ह्यूज यांनी ओबामांना इंटरनेट निधी प्रणाली तयार करून दिली. त्याद्वारा ३० लाख लोकांनी त्यांना पैसा उभा करून दिला. त्यातूनच ओबामा हे विरोधी जॉन मॅकगेन यांच्यापेक्षा चौपट खर्च करू शकले.
दूरचित्रवाणीचा ओबामांनी आपल्या प्रचारात मॅकगेन यांच्यापेक्षा सफाईने वापर करून घेतला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ओबामांनी मॅकगेन यांना प्रत्येक आघाडीवर मागे टाकले. रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यातही ओबामांनी मॅकगेन यांची दमछाक केली. व्हिडिओ गेमच्या सीडींमध्येही ओबामांनी जाहिराती दिल्या.
"व्होट फॉर चेंज' (बदलासाठी मतदान करा) हे ओबामांचे आवाहन अमेरिकेतील तरुणाईला भावले आणि त्यांनी ओबामांना भरभरून मतदान केले, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. "एक घर, एक कार आणि एक कुटुंब' या प्रतिमेमुळे ओबामांना ज्येष्ठांची पसंती मिळाली.
आपल्याला काय वाटते, कशाच्या जोरावर ओबामा निवडणूक जिंकले असतील...चतुर आणि शिस्तबद्ध प्रचारामुळे की अनुकुल वातावरणामुळे? आपण ओबामाच्या जिंकण्याने समाधानी आहात का? भारतीयांची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, असे वाटते?
बराक ओबामा यांचा स्लाईड शो
6 comments:
OBAMA is BLACK, HIS FATHER IS A MUSLIM.
MOST OF THE BLACKS FROM their PARENTS, IN AMERICA ARE FROM SOMALIA, KENYA, SUDAN, NIGERIA, UGANDA, MOSTLY AFRICN COUNTRIES.
THESE ARE ALL MUSLIM COUNTRIES.
USING THE RACIAL CARD, AND THE RELIGIOUS CARD, ADDED TO IT DEMOCRATIC (ANTI-BUSH, ANTI-WAR) PEOPLE FROM INDIA, USA and MIDDLE-EASTERN COUNTRIES GAVE A WIN TO OBAMA.
OBAMA IS THE PRESIDENT ELECT - WHAT MATTER IS THAT THE ROAD AHEAD AND THE PROMISES MADE BY OBAMA ARE VERY VERY DIFFICULT TO ACHIEVE.
I think Barack Obama won because of his well run campaign. I agree that race was a factor, a big factor. But that was not the only factor in fact that was not the main factor. The disciplined campaign he and his campaign manager David Plouffe had was extraordinary. Even very experienced political pundits, who have seen lots of campaigns, agree that this was the best campaign run ever. In 21 month hard fought campaign Obama just made one or two gaffes. He used his grass root organization to raise the tremendous amount of money which no democrat was able to do in recent history.
It was not easy especially in primaries against Hillary Clinton with Bill Clinton, the most popular democratic president supporting her. But Obama used new concepts, raised money through internet and focused on caucuses and it paid off. He also excited young voters, and they volunteered for him. In the main election he campaigned not only in blue states but all over America (most of the time presidential candidates only campaign in swing states and the states that have history of voting for their party). As a result he won traditional red states like Indiana, Virginia, and North Carolina. He also won swing states like Florida, Ohio and Pennsylvania. All in all it was very well run campaign because of which he won the election.
If governments work in interest of people, they can continue. If opposition is constructive and people believe in Change, they vote for the opposition. What is important here (and India and Indians should watch it closely) is that the proposed Changes by Obama are not hampering the Indo-US relations which thrived in the Bush Regime in last 2-3 years.
All the other reasons and discussions on the same are useless at this point. I wish you take a poll on what Indian Businesses & Government & Policy Makers / Think Tank should do now, what steps need to be taken to internationally, politically and by all means possible, corner Mr. Obama if he really tries to ensure that outsourcing will be stopped or makes a brouhaha on issues like Kashmir and pats Pakistan or China or last but not least reverses commitment on the Nuclear Deal.
The Indian think tank knows that whenever there was a change in the US Administrations in the past, the new admin there went on popular Anti-India sentiment for at least 2-3 years. Guys, the coming 2-3 years would be tough for us all.
And like someone said, its useless now to find out reasons for how and why Obama won. He won. Period. We have to make ample plans to check him out. If we cant take a poll on futuristic matters, we should look into domestic issues !
ओबामा जिंकले कसे?या विषयावर प्रतिक्रिया मागवून भारतातील सध्याच्या परिस्थितीकडून ब्लॉगवाचकांचे कशासाठी लक्ष विचलित करण्यात येत आहे? अमेरिकेत अध्यक्षपदाच्या शर्यतीत फ़क्त दोन मुख्य पक्ष असल्यामुळे जो कोण जिंकतो तो स्वबळावर व स्वतःच्या कर्तबगारीनेच जिंकतो व त्यानंतर "The buck stops here" याप्रमाणे उत्तरदायित्व अनेक पटीने वाढते व त्याचा स्विकार केला जातो!
आपल्याकडे सर्व बाबतीत दूस-याच्या खांद्यावरून बंदुक मारण्याच्या वाईट प्रथेमुळे/सवयीमुळे वाईट गोष्टींची जबाबदारी घेणे टाळण्यात येते व फ़क्त चांगल्या गोष्टींचे श्रेय लाटण्यासाठी नेते पुढे सरसावतात!
कॉंग्रेस पक्षाचे उदाहरणे घ्या,गेल्या कित्येक महिन्यात राज्यांच्या निवडणुकांत पराभव झाल्यावर पक्षाध्यक्षा अद्रुश्य व मौनव्रतात व खालच्या पातळीच्या राज्यातल्या छोट्यामोठ्या पदाधिका-यांवर खापर फ़ोडले जाते! एक नेता नाही की जो याबाबत हाय कमांडला जाब विचारू शकतो! मग ही कुठली लोकशाही झाली?
पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढवायची वेळ आली की मुरली देवरा तोफ़ेच्या तोंडी व कमी करण्याची वेळ आली की फ़क्त पक्षाध्यक्षा मोठ्या गाजावाजाने ते जाहिर करणार!!!
कृड तेलाची प्रत्येक बरलची किंमत १४५ डॉलरवरून फ़क्त ६० डॉलरइतकी कमी झाली तरी वाढविलेल्या किंमतीत एक रुपयासुद्धा कपात नाही कारण संधिसाधू सरकार निवडणुका जाहिर झाल्यावरच पक्षाध्यक्षांच्या तोंडी ही कपात जाहिर करणार!
Administered price mechanism म्हणजे काय ते अमेरिकेकडून शिका! वाढवायची गरज असेल तर सरळ त्वरित वाढवतात व जगातील किंमत जर कमी होत गेली तर ताबडतोब कमी करत रहातात!
त्याउलट आपल्याकडे! प्रत्येक निर्णय मतपेटीकडे लक्ष ठेवूनच घेतला जाणार!
दोन वर्षांपूर्वी ओबामा कुणाला माहित होते कां नाही हा मुद्दा या घटकेला नगण्ण आहे व एकदा ते जिंकल्यावर त्यांच्यावर प्रचंड जबाबदारी पडली आहे.ती ते कशी निभावणार ते आगामी काळच दर्शविल!
"व्होट फॉर चेंज' (बदलासाठी मतदान करा)हीमात्र आपल्याकडे काळाची नितांत गरज आहे यात शंकाच नाही, कारण केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशाची वाट लागत आहे व जेव्हा बहुतांशी राज्यात बिगरकॉंग्रेस सरकारे निवडून आली आहेत तेव्हा या केंद्र सरकारने राज्य करण्याचा हक्कच गमावला आहे!
बरीच वर्षे अज्ञातवासात असलेल्या कॉंग्रेस पक्षाध्यक्षांना कशीबशी एकदा संधी मिळाली होती, तरी त्यानंतर सर्व आघाड्यावर पिछेहाटच होत गेली व आता देश on the brink of disaster उभा आहे! दहशतवाद्यांचे फ़ोफ़ावले आहे,महागाई आकाशाला भिडली आहे!
तर उगाच सकाळने या विषयावर विचारमंथन थांबवावे, कारण अमेरिकेत रहाणा-या बहुतांशी मुळ भारतीय मतदारानी ओबामानाच मते दिली आहेत!
This is very unfortunate that we lost these start performer.We need to raise the issue how come these star people killed in one night,is any suspecious?
vikas and ashish groups
Hum sab aapko baut yad karenge.
Jay Hind.
We Salute you.........
Post a Comment