Thursday, September 25, 2008

वरवरची मलमपट्टी नको, शाश्‍वत विकास हवा...?

राष्ट्रकुल स्पर्धा अगदी तोंडावर आल्या आहेत. या स्पर्धेसाठी देशोदेशीतून येणाऱ्या खेळाडूंच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज होत आहे. वातावरण निर्मितीला चांगलाच जोर चढलाय. भित्तिचित्रे रंगविण्याबरोबरच, सुशोभीकरण, डांबरीकरण आणि इतर विकासकामांना वेग आला आहे. किंबहुना शहरातील कोणत्याही भागात गेल्यास विविध कामं सुरू असल्याचे चित्र दिसते.

आतापर्यंत खड्ड्यात शोधावा लागणारा रस्ता खड्डेविरहित झाला आहे. तर त्या रस्त्यांवर दुभाजकांचा पत्ता नव्हता तेथे दुभाजक उभारण्यात आले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचे चित्र रंगविण्यासाठी शहरातली एकही भिंत सोडलेली नाही. विकास आणि निसर्ग शहरात हातात हात घालून चालतात, असा भास निर्माण करण्यासाठी दुभाजकांवर शोभिवंत झाडे लावली जात आहेत. स्वच्छ आणि सुंदर पुणे या संज्ञेखाली रस्त्यांची सफाईही रोजची बाब झाली आहे. ठिकठिकाणी होर्डिंग उभारले जात आहे. "पीएमपीएलएम'ने ही कंबर कसली असून, सीवायजी या नवीन बस आपल्या ताफ्यात रुजू केल्या आहेत.

अशाप्रकारे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सर्व यंत्रणा अंग झटकून कामाला लागल्या आहेत. शहराचे चित्र पालटताना पाहून मनोमनी आनंद दाटून येतो. चला...राष्ट्रकुलच्या निमित्ताने का होईना, शहराचा विकास होतो आहे, हे काय कमी आहे? असेही वाटून जाते. पण, जरा निरीक्षण केल्यावर असे लक्षात येतेय, की ही काम उरका पाडल्याप्रमाण सुरू आहे. केवळ राष्ट्रकुल पुरता असेच सर्व कामांचे स्वरूप दिसतेय. रस्त्यावर केवळ डांबराचा थर चढवला जातोय. तर, रेडिमेड प्रकारातली झाडं आणून लावली जाताहेत. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं, केवळ राष्ट्रकुल पार पडेपर्यंतच शहरविकासाची मलमपट्टी केली जातेय. त्यामध्ये शाश्‍वत विचार अजिबात झालेला नाहीये.

पण, अशाप्रकारची वरवरची मलमपट्टी काय कामाची. शहराचा विकास दूरदृष्टी ठेवून झाला पाहिजे. 2010 साली तर पुन्हा राष्ट्रकुल होणार असेल, तर हा विकास त्या स्पर्धेपर्यंत टिकायला हवा. नाही का?

3 comments:

Anonymous said...

पुण्यात किंवा इतर शहरात विकासाच्या नांवाखाली अमाप पैसे खाणे व थोडे दिवसपण न टिकणारी निकृष्ट कामे करणे यात नाविन्य कांहीच नाही!

येथिल खासदार महानगरपालिकेतील सत्ता गेल्यानंतर इतर पक्षांच्यावर शिंतोडे फ़ेकत आहे,पण कित्येक वर्षे सत्ता उपभोगतांना शहराचा थोडाफ़ार विकास करतांना स्वतःच्या व पक्षाच्या तुमड्या भरण्यापेक्षा दुसरे कांहीच केले नाही!

त्यानंतर आलेले पालकमंत्री कित्येक जमिनी घेण्यात गुंग आहेत व जनतेच्या डोळ्यात धूळफ़ेक चालूच आहे! ज्या सत्ताधारी पक्षांना व पुढा-यांना स्वविकासाच्यापलिकडे दूसरे कांहीच दिसत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करता येणार?
पण निर्लज्जम सदासुखी!!!

निवडून आले की यांना भ्रष्टाचारासाठी रान मोकळे आहे असे समजून यांचे वर्तन असते! श्री.आर.आर.पाटील यांच्यासारखे साधे व स्वच्छ वर्तन असलेले एखादाच अपवाद!
बाकी बहुतेक संधिसाधू,अप्पलपोटे,स्वार्थी,मतलबी व कुठलेहि प्रामाणिकपणाचे व सचोटीचे तत्व नसलेलेच!

आता राष्ट्रकुल स्पर्धा होइपर्यंत खासदार व त्याचे चमचे व राज्यकर्ते स्वतःचा खुप उदोउदो करून घेणार,विकासाच्या नांवाखाली मलमपट्टी करतांना जेवढे जमेल तेवढे खिशात घालणार,सकाळ वर्तमानपत्र ठराविक लोकांना प्रचंड प्रसिद्धी देणार हे सर्वश्रुतच आहे! कुठल्याहि टिकाउ विकासाच्या अपेक्षा केल्यात तर तुमची उपेक्षाच होणार!!!
त्यापेक्षा थोडे दिवस कां होइना,जराशी झालेली सुधारणा उपभोगुया!

Anonymous said...

Panja aani Ghadyal chaya raajyat hey aasech chalnaar...

Fakta paise khaane...aani hyanchi dadagiri!!! aani aaytaa sakal aahech tyanchyach baatmya dyala...

Anonymous said...

Reve party , drug party money mangata hay.
And promote law of same sex marriage ,live in relationship. God knows how many live in relationship this politician have for that the money getting from this way.