Thursday, September 04, 2008

परभणीजवळ सशस्त्र दरोडेखोरांचा तीन महिलांवर अत्याचार

काटेवाडी, काठोड्यापाठोपाठ परभणीमध्ये शेतवस्तीमध्ये धुमाकूळ घालून महिलांवर अत्याचार करण्याची ही तिसरी घटना आहे. अशा दरोडेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे. अन्यथा महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच जाईल, यात शंका नाही. आपल्याला काय वाटते?
परभानीमध्ये दरोडेखोरांनी केलेला अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारा वाटतो....विस्तृत वृत्त वाचून आपल्याला व्यक्त व्हावेसे वाटेल. तर मग आम्हाला नक्की लिहा.

शहरापासून सहा किलोमीटरवरील पारवा शिवारात शेतातील एका आखाड्यावर आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी मंगळवारी रात्री (ता. दोन) सुमारे दीड तास प्रचंड धुमाकूळ घालत तीन महिलांवर अत्याचार केले. लहान मुले, पुरुष व महिलांनाही बेदम मारहाण करून दागिने, वस्तूही पळविल्या.

या संदर्भात पोलिसांनी एक पुरुष, एक मुलगा आणि चार महिलांना ताब्यात घेतले आहे. परभणी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील मानवत रस्त्यावरील पारवा शिवारात दत्तात्रय कदम यांच्या शेतात दोन खोल्यांचा आखाडा आहे. आखाड्यासमोर असलेल्या हॉटेल दीपाली या ढाब्यावर साडेबारापर्यंत वर्दळ होती. ढाबा बंद झाल्यानंतर पहारेकरी सुवर्णसिंग जीवनसिंग टाक समोर बाज टाकून बसला होता. रात्री दीडच्या सुमारास ढाब्याच्या मागच्या बाजूस शेतातून कुजबूज ऐकू आली. त्याने फेरफटका मारला तेव्हा शेतात कोणी तरी लपले आहे, हे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेचच आरडाओरड केली. शेतातून एक व्यक्ती वेगाने बाहेर आली. त्याने टाक याच्याशी झटापट केली. टाक याने काठीने त्या व्यक्तीच्या खांद्यावर जोरात प्रहार केला. तेव्हा त्याच्यावर शेतातून दगडफेक सुरू झाली. गांभीर्य ओळखून टाक रस्त्याकडे पळाला. त्याने समोरील आखाड्याकडे धाव घेतली, तेव्हा दरोडेखोरही रस्ता ओलांडून आखाड्यापर्यंत पोचले; परंतु पहारेकरी सापडला नाही. त्यानंतर या सशस्त्र दरोडेखोरांनी पान ११ वरर्‌ ी आखाड्यावर झोपलेल्या एकाच्या कुटुंबीयांना मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे लोक आश्रयासाठी खोल्यांमध्ये गेले व त्यांनी दार लावून घेतले. दरोडेखोरांनी या खोल्यांवर हल्ला करून तीन पुरुष व सर्व लहान मुलांना मारहाण करत एका खोलीत डांबून टाकले, तर महिलांना दुसऱ्या खोलीत नेले. दारूच्या नशेत असलेल्या या दरोडेखोरांनी त्या खोलीतून एकेका महिलेस मारहाण करत व फरपटत आणून कापसाच्या शेतात त्यांच्यावर अत्याचार केला. त्यातील एका महिलेवर पाच दरोडेखोरांनी बलात्कार केला. त्यानंतर या दरोडेखोरांनी त्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मणी, डोरले व कानातले ओढून घेतले व ते पारव्याकडे पसार झाले. दरोडेखोर गेल्याबरोबर या लोकांनी मोबाईलवरून शेताचे मालक व ग्रामीण पोलिसांना तत्काळ माहिती दिली.

पोलिस निरीक्षक विजय सोळंके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावले. पोलिसांनी भल्या पहाटे दीपाली ढाब्यापासून पुढे पारवा शिवारात रेल्वे जंक्‍शनपर्यंत दरोडेखोरांचा मागोवा घेतला. तेव्हा काही महिला आणि पुरुष लोहमार्गाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा ताफा पाहिल्याबरोबर हे सर्व जण शेतात जाऊन लपले. पोलिसांनी या शेतास वेढा घातला आणि शेतातून चार महिला, एक मुलगा व पुरुषास पकडून बाहेर आणले. अंधाराचा फायदा घेऊन अन्य काही दरोडेखोर तेथून पसार झाले.

6 comments:

NoManLand said...

When women will get freedom in India ?
Shall India has wait for another
Babasaheb Ambedkar to give freedom to Indian women ?
Due globalization Indian culture system broken at lower middle class & poor level, this result of it.

Anonymous said...

there is issue of freedom of women in India. every one knows that women are doing night shift jobs in cities like pune mumbai. you never know that weather if any woman was part of this shameful incident near parbhani. this is kalyug so let these things happen. cause even if police will find criminals, they may be set free on bail. there is no one who can survive our India.

Anonymous said...

There is no issue of freedom of women in India. every one knows that women are doing night shift jobs in cities like pune mumbai. you never know that weather if any woman was part of this shameful incident near parbhani. this is kalyug so let these things happen. cause even if police will find criminals, they may be set free on bail. there is no one who can save our India.

Innocent Warrior said...

Here are some concerns,

1) There is no fear of police in the cirminals. And police knew how to develope that.

2)We need to have police station at sufficient distance.

3) Patroling need to increase.

4) If possible give them the weapons to fight and cell phone to communicate.

5) punishment for such crime should be sufficient to create fear in the criminals.

Where there is will there is way.

Wake up government!!!!

Anant Kale said...

police kay zopa martata ka?
home minister la mahit ahe ka kay chalu ahe te? Are pradip Sharma var karvai karnyapeksha ya darodekhor any rape karnarya lokana golya gala....kay ahe ka police dept.ya thikani..........all shamless....
lokanchi ejjat kay evadi swasta ali ahe ka?.........very bad....police khate kay karat ahe ya thikani kay samjat nahi.........zoplele ahe ka?
karvai kara ,home dept.wat pahu naka.take action and secure to people.

Anonymous said...

Whenever criminals are caught almost red-handed at/near the scene of the heinous crimes including rape,they deserve to be ruthlessly eliminated immediately in stead of the typical procedure of FIR,temporary police custody & release on bail for the silly case to go on in courts for years.If at all,the criminal is found guilty,some minor punishment is awarded,while most perpetrators go scotfree.

On rare occasions,if death sentence is passed & even if confirmed by supreme court,it is NEVER IMPLEMENTED,thanks to our incompetent & scared home minister & rubber stamp president!

Police dept's corruption is another matter,which allows the criminals to escape!
A tough cop like Pradip Sharma is punished & sacked because he had to kill these criminals in encounters.

What a sad state of affairs in our country, where both the legal & security systems mostly allow criminals to operate with impunity day in & day out!

रोज सकाळी वर्तमानपत्र उघडा व बातम्या त्याच आशयाच्या/स्वरूपाच्या,फ़क्त ठिकाणे वेगळी!
सामान्य जनतेने गप्प बसून तमाशा बघत रहायचा व पुढारीपण अशा वेळी थोबाड बंद ठेवणार!

पत्रकार मागे लागलेच तर म्हणणार "The matter is SUB JUDICE,let the law take it's course!"
Of course,law is an ass" is taught even to lawyers!
आपल्या देशात झोपलेले प्रशासन शासन कोणाला करणार? "Public memory is short" या म्हणीप्रमाणे लवकरच जनता विसरणार सर्व प्रकरणे व मग पुढारी उघडणार फ़ुगलेली थोबाडे भाषणे/आश्वासने देण्याकरता!!!

आम्हाला मते द्या,म्हणजे सर्व गुन्हे माफ़!
देश आपलाच आहे,स्त्रिया आपल्याच आहेत कशाकरताहि,संपत्ती लुटायलाच आहे,पोलिस चिरीमिरी[हल्ली तिचे भाव खुप वाढले आहेत!]खायलाच आहेत,कोर्टे तारखावर तारखा पाडून केसेस २-४ तपे चालविण्याकरताच आहेत हे विसरू नका!
महासत्ता बनण्याचा काय छान मार्ग निवडला आहे!