Tuesday, September 02, 2008

खासगी व शासकीय इमारतींमध्ये धुम्रपानाला आता बंदी

शासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या इमारतींमध्ये येत्या दोन ऑक्‍टोबरपासून धुम्रपानावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.बंदीचे उल्लंघन करणाऱ्या संस्था, कंपन्या आणि व्यक्तींना शिक्षा करण्याची तरतूदही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

काही खासगी कार्यालयांमध्ये स्वतःचे "स्मोकिंग झोन' असतात. त्याबद्दल विचारले असता, यापुढे कोणत्याही इमारतीमध्ये "स्मोकिंग झोन' ठेवण्यावरही बंदी घालण्यात येईल.सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि अशासकीय संस्थांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. इमारतींच्या बाहेर किंवा रस्त्यावरच धुम्रपानाला परवानगी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? यामुळे धुम्रपानाला आळा बसेल का? या बाबतच्या प्रतिक्रिया नोंदवा पुणे प्रतिंबिंब आणि सकाळ ब्लॉग वर.

3 comments:

Anonymous said...

Dhumrapanala kitpat ala basel he sangta yet nahi pan passive smoking cha tras bakichya lokana sahan karayla lagnar nahi. Asach niyam sarva sarvajanik thikani karne avashyak ahe.

Unknown said...

Mantralayane ghetlelya nirnayache swagat aahe.. Pan ek chhoti shi shanka watate ki kiti khajgi company ha niyam 100% paltil.. agar building madhe smoking la badhi asel tar lok rastyawar yeon pitil..sarvajanik pradushanache kay?? kiti bhar padel tyat....rastyawarun 1000 manase jaat yet asatat.. tyanchya passive smoking che kay??

Unknown said...

हा निर्णय चांगला असला तरी या विषयावरच्या प्रतिक्रियात लिहिल्याप्रमाणे धुम्रपानाची सवय असणारे आता रस्त्यांवर,गेटजवळ फ़ुंकणार व त्या वलयातून त्यांचे धुम्रपान न करणारे नागरिक वा सहकर्मचारी passively धूर ओढणार!

अर्थात आपल्या देशात या निर्णयाचे पालन कितपत होते ते आपल्याला माहितच आहे.
नियम मोडण्याकरताच असतात ना?

"धुम्रपान धोक्याच्या ताकिदीला व गुटकाबंदीला चटक लागलेल्या जनतेने केले बाद I
सुस्त सरकारपण मग म्हणाले आम्ही कशाला धरू गुटकाबंदीच्या अंमलबजावणीचा नाद II

शाळांजवळ दिसते झगझगाटात केलेल्या विदेशी मद्यांच्या हिडिस जाहिरातींची रोषणाई I
ते पाहून तंबाखु्विक्रेत्यांनी झुगारून दिली सरकारची शाळांजवळ तंबाखु्विक्री वा जाहिरातींची मनाई I
सरकारला एकच काळजी गुटक्यावरच्या बंदीमुळे बुडलेल्या कराची कशी करणार नुकसानभरपाई ?
चटक लागलेले महाभाग म्हणाले आमच्या प्रकृतीची काळजी करायला आहे आमची भार्या वा आई II
गुटक्याचे भुरके व सिगरेटचे झुरके घेणारे शौकीन म्हणाले हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे I
दोन्हीचे उत्पादक,विक्रेते व जाहिरातदार म्हणाले यावरची बंदी आमच्या पोटापाण्यावर आघात आहेII

पुण्यातल्या बहुतांशी दुचाकीस्वारांनी सक्तीचा आदेश झुकारून नापसंद केले बोजड हेलेमेट I
पाठीवरच्या दप्तरांच्या वा लपटोपच्या बोज्यांनी दमलेल्या मागच्या स्वारानीपण केले ते चेकमेट II

अतिपातळ प्लास्टिक वा कागदाच्या पिशव्या वजनाखाली एकामागून एक फ़ाटायला लागल्या I
त्यामानाने मजबूत महागड्या कापडी पिशव्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाउ लागल्या II
पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी प्लास्टिक पिशवीवरील बंदी सर्व जनतेला तत्वतः मान्य झाली I
तरी बंदीच्या अंमलबजावणीवर सरकारच ठाम नाही म्हणून सोइस्करपणे पुन्हा दिसू लागली II

सरकारच वारंवार शिथिल करते रात्री १० ते स.६ पर्यंत ध्वनिक्षेपक वा फटाके वाजविण्यावरची बंदी I
म्हणून रात्रभर जोरात गाणी वा लाखांचा फ़टाका कोट लावत धूंद कार्यकर्ते साजरी करतात त्यांची सणासुदी II

घाईच्या प्रेशरमुळे वा रक्तदाबामुळे वाहनचालकांच्या लक्षात येत नाही रुग्णालये व शाळांजवळची प्रेशर हॉर्नवरची बंदी I
कर्णकर्कश्य गोंगाटामुळे बहिरे झालेले बिचारे वाहतुक नियंत्रक मामा तर कशी घालणार हातकडी ?
सरकार व पोलिसचे बहुतेक सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आहे पुणेकर व इतर शहरवासीयांचा हातखंडा I
सदा झोपलेले सरकार व अति अपूरे पोलिसखाते म्हणून पडत नाही कोणाला अटक करा्यच्या फ़ंदाII

एकुण काय,स्वेच्छेने व समजुतीने केलेले सगळेच नियमभंग पडतात सरकार,पोलिस व आम जनतेच्या पथ्यावर I
जरी नाहक बळी पडतात कांही दुचाकीस्वार,शाळकरी व रुग्ण आपल्या धकाधकीच्या जीवन/पर्यावरणाच्या पथांवर II"