Tuesday, August 26, 2008

पुण्यात रिंग रोड, "मेट्रो'ला मान्यता

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीबाहेरून जाणारा १६० किलोमीटर लांबीचा "रिंग रोड' खासगीकरणाच्या माध्यमातून उभा करण्याचा आणि मेट्रो रेल्वेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला यासाठी सुमारे दोन हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पायाभूत समितीपुढे येत्या पंधरा दिवसांत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास विभागीय आयुक्तांना सांगण्यात आले. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.

मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल का? तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला कळवा.

4 comments:

captsubh said...

मेट्रो रेल्वेची पुण्याला कित्येक वर्षांपासून गरज होती व हा प्रकल्प कोलकता व नवी दिल्ली यांच्यानंतर अतिशय उशिरा कां होइना, आता पुण्यासाठी राबवायचा विचार चालू आहे हे समजून आनंद झाला.

पण याचे मार्ग कुठून कुठे जाणार त्यावरपण त्याचे फ़ायदे अवलंबून असणार.नुसता एका दिशेने जाणारा मार्ग फ़क्त जवळच्या टापूसच फ़ायदेशीर ठरतो,पण लंडनसारखे crisscross जाळे उभारले तरच त्याचा खरा फ़ायदा सबंध शहराला होउ शकतो!अर्थात त्यामुळे आणखी किंमती वाढणार!

हा विचारसुद्धा मनात आल्यावाचून रहावत नाही की ब्रिटिशानी आणखी ४०-५० वर्षे राज्य केले असते तर देशातल्या प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे केव्हाच आल्या असत्या!

दूस-या महायुद्धाच्या आधीपासून लंडनसारख्या ठिकाणी शहराखाली निरनिराळ्या पातळ्यांवर मेट्रो गाड्या अविरत धावत आहेत,तसेच मोस्को,वाशिंग्टन वगैरे आणखी कित्येक शहरात त्या धावत आहेत.

मेट्रो रेल्वेचा प्रकल्प राबविताना जमिनीखालून बोगदे खणणे हे महत्वाचे कारण रस्त्याच्या वा आसपासच्या जमिनीतून खोल खड्डॆ खणून त्यात बांधकाम करणे अतिशय जिकिरीचे,कष्टाचे व खर्चाचे ठरते व जवळच्या इमारतींसह आसपासचा टापू प्रचंड उद्धस्त होतो व शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होते, जे मी स्वतः कोलकत्याला कांही वर्षे पाहिले आहे.शिवाय कोलकत्याला अशा प्रकल्पासाठी खणलेल्या कांही किलोमिटर लांबरूंद खड्ड्या[चरा]मध्ये पावसाळ्यामध्ये साठलेल्या लाखो लिटर पाणी काढण्यासाठी हजारो पंप बसवून प्रचण्ड खर्च आला होता,तसेच या मोठ्या चराच्या दोन्ही बाजुंना असलेल्या कित्येक इमारतींना मोठे तडे गेले होते!प्रकल्प पूर्ण झाल्यावर बोगद्याचे छत वरून बुजवल्यावर पुन्हा रस्ते,पदपथ वगैरे बांधण्यासाठी विनाकारण प्रचंड खर्च झाला होता जो संपूर्ण टाळण्यासारखा होता!

हे टाळण्यासाठी मशिनरीच्या साहाय्याने खोलवर बोगदे खणले की वरचा भाग अबाधित रहातो व फ़क्त नियोजित स्टेशनांच्या जागी जमिनीपासून खालीवर जाण्याकरता खणावे लागते.
तसेच या बांधकामाच्या काळात गैरसोय पूर्ण टाळली जाते!

आजच या प्रकल्पाची किंमत एवढी आहे तर हा तत्परतेने राबवून पूर्ण केला तरच ती आटोक्यात राहिल,नाहीतर cost escalation च्या नांवाखाली किंमती वाढवित राहून राज्यकर्त्ये आपल्या तुमड्या भरत रहायची शक्यता नाकारता येणार नाहीं!

Anonymous said...

I personally welcome this new mode of transportation, but is Pune capable of handling this Ringroad or Metro system? Why are our government or so called "Witty and wise" puneites do not not pay attention to the fact that Pune needs a big Cleanup before any new mode of transportation is introduced. What is the point in having crowded and polluted roads to reach to these Metro or Ringroad stations? First, we need strong planning to resolve current traffic situation, widening roads and removing road encroachments. Why can't we have connecting flyovers like Mumbai to make ease in free flow of traffic. I strongly feel that Pune needs a WISE ,PRACTICAL and DECISIVE Leader.
People have changed Thane city, Nagpur why can't Pune?????

Amey Mankar's said...

good work done so far..but the project shd be completed asap and with best quality and without any corruption..then only projects like this will be appreciated

Anonymous said...

Without appearing prejudiced,the much needed solution for Pune[and most other stinking,polluted,overcrowded cities gasping for breath] due to the blunders & corrupt nature of our rulers is to throw atomic bombs on them to raze them to the ground with all these politicians too & rebuild from scratch.
But that too will be a failure as we have no CONCEPT OF TOWN PLANNING,FAMILY PLANNING & are used to living in hellholes & the extreme greed of the remaining or next generation of politicians/administrators will be worse than their predecessors!

All announcements like Metro,ring road,new power plants,atomic energy etc etc cleverly timed on the eve of the elections!
What were all these diabolical political swines doing for the last so many years?

१]Where is the bloody new Chakan airport announced ages ago?On a plan or a model?
२]What happened after merger pf PMT withe Pimpri Chinchwad transport?
३]What happened after trifurcation of erstwhile MSEB? Load shedding incresed manyfold, while the power minister नुसता फ़ुगत चालला आहे!
४]मुख्यमंत्रीपदाचा एक दावेदार इंद्रायणी नदीतल्या राडारोड्याबद्दल गप्प!
५]शिक्षणसम्राट तर गब्बरसिंगच्यावर फ़ुगले आहेत कारण त्यांनी संगनमत करून "Fees" इतक्या प्रचंड फ़ुगवल्या आहेत!
६]भारती विद्यापीठाचे सर्वसर्वेशा जवळपासचे सर्व रस्ते आपल्या घशात गिळंकृत करत आहेत!
७]खासदाराने शहराच्यासाठी "खास" कांही न केल्यामुळेच त्याच्या घराजवळच्या इलाक्यात रोज प्रचंड traffic jams होत आहेत,तरी तो पुढच्या निवडणुकीत उभा रहायचे मनसुबे रचत आहे!
८]पालकमंत्रीतर अधाशासारखे उरली सुरली सर्व जमीन गिळंकृत करत आहे व "आम आदमीला" ठेन्गा दाखवत आहे! मांजरी फ़ार्म,चतुश्रुंगींजवळचे कित्येक एकर,मोडेल कोलनीतील वसतीगृहाची जमिन या सर्व हडप करण्यात आल्या आहेत! कुठुन येतात इतके कोटी रुपये?
महसुलमंत्र्याकडे डेक्कन जिमखान्यावरची डेक्कन सिनेमा व लकी रेस्टारंटची जागा विकत घेवून व्यापारी संकुल बांधायला इतके कोटी रुपये कुठून आले? यांच्यामागे आयकर विभाग कधीच कसा लागत नाही? यांचा नवीन संकुलाचा plan इतक्या त्वरेने कसा पास झाला? हिच का कै.लाल बहादूर शास्त्रींच्या कोंग्रेसची नवी संस्कृती? थोडीसुद्धा लाज,लज्जा,अबरु,भाड,भीड नाही?
कोंग्रेसच्या अध्यक्षा प्रथम खुर्चीत बसल्या तेव्हा वाटले होते व आशा होती की त्या कांहीतरी वेगळे करणार व भ्रष्टाचाराला रोकणार.पण झाले उलटेच व भ्रष्टाचार प्रचंड फ़ोफ़ावला व बोकाळला!
ज्या मुद्द्यावरून NCP अध्यक्षांनी नवा पक्ष काढला तो मुद्दा पूर्ण विसरून सत्तेच्या खुर्चीत तहहयात बसविण्याचे ठरविल्यापासून कोंग्रेसलाच समर्थन द्यायचे ठरविले?? अर्थात त्याचे फ़ायदे खुप होतच असतात जसे निकृष्ट गहु आयात प्रकरणात देशाचे कांही हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्यावरसुद्धा त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही,त्याउलट त्यांचा भाव आणखी वाढला!

९]दिल्लीदरबारात सदा झुकलेले निरनिराळे मंत्री महाराष्ट्रात श्वास घ्यायला आल्यावर गाजरे दाखवून जनतेला हिंदोळ्यावर झुलवत आहेत!

मेट्रो हवी होती हे कळायला इतकी वर्षे लागली? नुसती घोषणा झाली व पब्लिक खुष!
किती पैसे लागणारपेक्षा यांना खायला मिळणार किती हे महत्वाचे कारण ते यांच्या बापाचे नव्हेत, तर यांच्या लाडक्या "आम आदमीं" च्या खिशातूनच येणार! त्यासाठी अर्थमंत्री कंबर कसताहेत!

दहशतवाद संपवायला पाहिजे अशा घोषणा करणा-या केंद्रिय गृहमंत्र्यांनी आजपर्यंत कुठली ठोस कारवाई केली आहे?

पुण्यातील पाणीकपात २० नव्हे तर तब्बल ३६ टक्के किंवा जास्ती होत होती हे परवाच्याच सकाळमध्ये आले आहे!हे कसे झाले?

सत्र न्यायालयातील सरासरी ५०० केसेसमध्ये अपराध्यांना दोषी ठरविण्याची व शिक्षा देण्याचे प्रमाण आता फ़क्त ४०-५० केसेस आहे[फ़क्त १० टक्के] यावरून काय बोध घ्यायचा?

सामान्य माणसास महागाईमुळे,घर,शिक्षण,अन्न वा जेवण" सुद्धा परवडत नाही, तरी राजकारण्यांची व बिल्डरांची व शिक्षणसम्राटांची "चलती" अविरत चालू आहे!

सर्व गोष्टींस महागडी कर्जेमात्र उपलब्ध आहेत!
पण बहुतेक सहकारी पतसंस्थांचे हावरे व अप्रामाणिक संचालक स्वतःच्या तुमड्या भरत आहेत! कर्जबाजारी झालेली जनता EMI कसे भरायचे या विवंचनेत आहे!

फ़सवत रहा जन्मभर आम जनतेला व आरक्षणांमुळे विभागलेल्या जातीजमातींमुळे आधीच विचका झालेल्या महाराष्ट्रात/देशात आजच्या "सकाळ" मध्ये आलेल्या बातमीप्रमाणे "सोशल इंजिनियरींग" चा प्रयोग मायावतींच्या पावलावर पाउले ठेवून निवडणुकी जिंकण्यासाठी राबवा व आणखी वाट लावा!
नाहीतरी सकाळ पेपरचा उपयोग राज्यकर्त्या राजकारण्यांनाच सर्वात जास्त होतो आहे व
NCP मध्ये कोंग्रेस गांधी परिवाराच्या पावलावर पाउल ठेवून पवार "घराणेशाही" राबविली जातच आहे!
नव्या "साम" TV चा निवडणुकांच्या कालात ठराविक व्यक्तीना खुप उपयोग होणारच आहे,किंबहुना तो सुरू करण्यात पैसे मिळवणे याशिवाय हापण उद्देश निस्चितच असणार! काय दूरदृष्टी आहे!

आता वरच्या प्रतिक्रियेत मेट्रो वा रिंग रोडचा संबंध काय हा विचार येणारच वाचकांच्या मनात,पण अशा गोष्टी isolation च्या ऐवजी totality मध्ये बघितल्यास चित्र स्पष्ट होइल!