Thursday, May 15, 2008

कुत्र्याचे नाव शाहरुख असे असल्याने वाद

चित्रपट अभिनेता आमीर खान याच्या पाचगणी येथील बंगल्यातील कुत्र्याचे नाव शाहरुख असे असल्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र अमीरने हा कुत्रा आपला नसल्याचे सांगत या प्रकरणापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला आहे.

"गझनी' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी जखमी झाल्याने अमीर सध्या पाचगणी येथील निवासस्थानी विश्रांती घेत असून, हा कुत्रा त्या बंगल्याची व्यवस्था पाहणाऱ्या व्यक्तीचा असल्याचे आमीरने सांगितले. या बंगल्यातील कुत्र्याचे नाव शाहरुख असल्यामुळेच आमीरने बंगला खरेदी केल्याचा आरोप काही जणांनी केला आहे.

कुत्र्याचे नाव, हा तसा नेहमीचाच वादाचा विषय...मध्यंतरी मंदिरा बेदीही अशाच वादात सापडली होती. आता हा वाद असतो, की प्रसिद्धीचं वलय, हे नक्की सांगता येणार नाही. पण, यामागे काहीतरी नक्कीच शिजत असणार....

No comments: