Monday, April 14, 2008

राज्यात 20 मे पासून गुटखा बंद

गोळा झाला 8 टन कचरा महाराष्ट्रात 20 मेपासून गुटखा बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने पुन्हा घेतला आहे.

केंद्र सरकारने गुटखा बंद करण्याबाबत पाच फेब्रुवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने गुटखाबंदीचा निर्णय घेतल्याची माहिती अन्न व औषधी द्रव्ये राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी दिली आहे.

गुटखाबंदीबाबतची अधिसूचना राज्य सरकार काढणार असून त्यानुसार 20 मेपासून गुटख्याची निर्मिती, साठा आणि वितरणही बेकायदा ठरेल, असे श्री. सिद्दिकी यांनी सांगितले. यापूर्वीही राज्य सरकारने गुटखाबंदी केली होती. पण, मुंबई उच्च न्यायालयाने त्या अधिसूचनेस स्थगिती दिली होती. या वेळी सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन राज्य सरकार नवीन अधिसूचना काढणार असल्याचे श्री. सिद्दिकी यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीची बंदीची अधिसूचना काढूनही तिची नीट अंमलबजावणी झाली नाही. निदान आता तरी राज्य सरकारने आपल्या निर्णयाची नीट अंमलबजावणी करायला हवी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरी यांची टीका स्वाभाविक असली, तरी ती रास्तही आहे. राज्य ससरकारने यापूर्वी दोन वेळा अशाप्रकारची गुटखा बंदी आणली होती. मात्र, योग्य अंमलबजावणीअभावी बंदीला स्थगिती मिळाली. आता तरी त्याची अंमलबजावणी व्हावी. अन्यथा जनतेला तो केवळ फार्स वाटू शकतो. आपल्यालाही असेच वाटते का? तर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा...

6 comments:

Anonymous said...

Along with gutkha government should ban smoking which more harmful for human life

ashishbadwe.blogspot.com said...

मिस वैशाली शासनाने घेतलेला निर्णय अतिषय योग्य आहे. गुटका बंदी ही काळाची गरजच होती. आता हा फार्स ठरणार नाही अशी अपेक्षा करू या - आशिष बडवे, पांढरकवडा
www.dainikyavatmalnews.com
www.vidarbhanews.blogspot.com
www.newsindia.blogspot.com
contact- 9403455960
Email - ashish_badwe@yahoo.co.in

captsubh said...

घेतांना अमृततुल्य चहाचा घुटका,
तोंडात टाकावा 'गोवा' छाप गुटखा,
जरी तो असला घसा प्रकृतीचा मटका,
मजा येते त्याचा मारतांना चविष्ट भुरका,
सरकार काय करणार व्यसनींची सुटका?
जेव्हा त्यांचे पोलिस देत नाहीत फ़टका!
आजवर झाल्या कां उत्पादकांना अटका?
जरी सरकार दाखवते कधीतरी राग लटका!

तसेच "फ़ार्स" झालेल्या ब्लोगच्या या विषयावर प्रतिक्रिया मागवूनहि कांही फ़रक पडणार नाही!
मनोवृत्ती व सरकारच बदलायची वेळ आलेली आहे!

Anonymous said...

govt always make good decisions but it is not implemented properly it happens always.

for 2 3 months they will ban and after this, it will start again

the one mentality should be changed

these gutakha companies will launch new product as pan masala and they will sell it, which will be same as gutakha only

Anonymous said...

Government wants tax money. They get this from advocating tabaccoo, Maawa, Guthaka, Breveries, wine, cigerrette, Beedis. That means the government wants to earn money playing with the health of common man.

Government is involved in corruption to give licences to wine shops, guthaka manufacturers, country daaru manufacturers, when elections are near and they need funds for campaining.

Then, from common man's tax money, they donate corrupt government hospitals and inefficient staff at these government hospitals!

It is the government that is to blame which cannot stop these deadly items to common man in INDIA.

Who is the Government?
WE who vote for them!

Who suffers?
We

Who can make a change?
We, by voting the educated, able, just and acts as per its voters requirements!

Jai Bhavani!

vijay said...

daru ,ciggaratte ,etc he pn band krayche ani parat chalu karayche paise khaun ani asha batmya chapayachya ... he pidhyan pidhya kaarat ani ekat aloy rahudya asech .. americe che anukaran kartona apan..mag..?