Friday, March 28, 2008

वंदना आणखी पाच दिवस अतिदक्षता विभागात

"बोअरवेल'मध्ये पडलेल्याआग्रा जिल्ह्यात उघड्या विंधन विहिरीत पडलेल्या तीन वर्षांच्या वंदनाला पाच दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे.

मंगळवारी सायंकाळी वडिलांशी खेळत असताना ती खोल विंधन विहिरीत पडली होती. ही विहीर 180 फूट खोल होती, मात्र वंदना 45 फूट खोलीवरच अडकून पडली होती. बचाव पथकाने या विहिरीस समांतर विहीर खोदली आणि भुयार खोदून वंदनाला बाहेर काढले. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय पथकाने वंदनाची तपासणी केली. सायंकाळी अंधारामुळे मदतकार्याचा वेग मंदावला होता. वंदना 24 तासांपेक्षा अधिक काळ विहिरीत होती, त्यामुळे तिचा श्‍वास कोंडण्याची शक्‍यता होती. त्यामुळे ऑक्‍सिजनच्या नळकांड्या विहिरीत सोडण्यात आल्या होत्या. सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत होती.

अखेर वंदनाला बाहेर काढण्यात जवानांना यश आले. मात्र, तिला उपचारांची गरज असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे.

सध्या वंदनाच्या प्रकृती स्थिर असली, तरी शासनाने अशा उघड्या विंधन विहिरींबाबत काहीतरी भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. प्रिंसचा अनुभव गाठीशी असतानाही त्यानंतर शासनाने त्याबाबत कोणतीही पावले उचलली नाही. किंबहुना, अशा अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात लष्कराची मोठी यंत्रणा खर्ची पडते. याचाही गांर्भीर्याने विचार व्हायला हवा. त्यामुळे आतातरी शासन जागे होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आपली मते ब्लॉगवर नक्‍की मांडा.

7 comments:

मोरपीस said...

यावर एक उपाय आहे, लहान मुलांकडे लक्श ठेवण्याचा व शासनानेही जागे होण्याचा

Anonymous said...

Indian people always look at goverment for all type of help. It is common sense that failed bore well, before abandoned must be filled with sand to avoid such type of mishap or mouth should be closed with solid sheet. For want of water we indians dig bore-well unauthorisely & abandoning the same after failure. Public awakening in this regard is required. People can not escape from their duty.

ASHISH BADWE said...

मिस वैशाली यावर शासन काय करणार कुठेकुठे लक्ष देणार त्यांना भ्रष्टाचारा पासुनच तर फुरसत मिळली पाहिजेना? पण तसं पाहिलं तर ती जबाबदारी आपलीही (सामान्य नागरिकांची) आहे असे मला वाटते. कुठे आजुबाजुला अशी उघली बोअरवेल दिसली तर प्रशासकीय यंत्रणेला आपण कळविले पाहिजे. - आशिष बडवे, लोकमान्य टिळक नगर पांढरकवडा जि. यवतमाळ
www.dainikyavatmalnews.com
www.vidarbhanews.blogspot.com
www.newsindiapress.blogspot.com
www.pressindia.wordpress.com
www.newsindia.sulekha.com

Email ashishbadwe@gmail.com
ashish_badwe@yahoo.co.in
Contact - 9403455960, 9890697205

Anonymous said...

This is absolute non-sense from the goverment and ignorance by the parents, poor kid, she does not even know what's going around with her when she was stuck in the hole for so long....parents plesae wake up and Govt. get out of your stupid idiotism and do something to protect the most valuable thing i.e. LIFE of general people.

J K SARAF said...

The persons such as bore contractor and owner of land responsible for keeping a failed bore open should be criminally prosecuted for the negligence causing threat to human life and a burden on Govt and Militery for rescue work. Unless such persons are not jailed, care would not be taken to comlete the job of closing open bore. We lack in discipline in every sector and no measures are taken against this. We do not have civic sense and do not take care if others suffer at our negligence for our behaviour. This culture has to be changed.

J K Saraf

Anonymous said...

Ignorance of bore contractor and owner of land, careless gonvernment and parents are responsible for such cases. How many children will be the victim of such borewells? We should be keen about the open borewells, parents should look after the kids to avoid such incidents.

Anonymous said...

Support Raj. Kill Northees.

'मराठी' जवानाला बिहारींची मारहाण

दादर-गुवाहाटी एक्स्प्रेसमधील प्रकार

- म. टा. वृत्तसेवा, नाशिक

' परप्रांतीयविरुद्ध मराठी' या वादाचा फटका एका मराठी जवानाला बसला असून देवळा तालुक्यातील मनोज दिनकर आहेर याला पाटणाजवळ बिहारी गुंडाकडून मारहाण झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात मनोज जखमी झाला असून त्यावर घरी उपचार सुरू आहेत.

अरुणाचल प्रदेशात आसाम रायफल तुकडीत असलेल्या मनोजच्या वडिलांचे पाच जानेवारीला निधन झाले. त्यामुळे अडीच महिन्यांची सुटी घेऊन तो घरी आला होता. 'सुटी संपवून १९ मार्चला मनोज दादर-गुवाहाटी एक्स्प्रेसने ड्यूटीवर परतण्यासाठी निघाला होता. पाटणा स्टेशन येण्यास दोन तास बाकी असतानाच काही बिहारी गुंडांनी 'तू महाराष्ट्रीयन आहेस का?' म्हणून विचारले. 'नाशिकचा' असल्याचे सांगितल्यानंतर त्या गुंडांनी लाठ्याकाठ्यांनी मनोजला बेदम मारहाण केली, त्याला धावत्या रेल्वेतून खाली फेकून देण्याचाही प्रयत्न केला. मनोजने प्रतिकार करताच गुंडांनी औषधाच्या फवाऱ्याने त्याला बेशुद्ध केले आणि ओळखपत्रासह खिशातील रोख रक्कम काढून घेतली.

शुद्धीवर आल्यानंतर सहप्रवाशांनी त्याला सावरले आणि गुंड रेल्वेची साखळी ओढून पळून गेल्याचे सांगितले. ओळखपत्राशिवाय लष्करात प्रवेश मिळणे शक्य नसल्याने मनोजने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. 'पाटणा रेल्वे स्टेशनात भेटलेल्या दोन महाराष्ट्रीय लष्करी जवानांकडून पैसे घेऊन घरी परतलो', अशी व्यथा मनोजने बोलून दाखवली.