Tuesday, November 20, 2007

भारतातील एडस्‌बाधितांची संख्या फुगवून दाखविल्याची कबुली

वॉशिंग्टन - एडस्‌बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रासंघाने नव्या अहवालात जाहीर केले आहे. एडस्‌बाधितांची संख्या चार कोटी नव्हे, तर 3.3 कोटी असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतातील रुग्णांच्या संख्या पूर्वीच्या गृहितकात अधिक धरली गेली होती. नव्या पद्धतीने पाहणी केल्यानंतर ही संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आकडेवारी बदलली असल्याचे अहवालात म्हटले आहे. "आधीची आकडेवारी फुगवून दाखविली गेली होती,' असे संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केले आहे. "आकडेवारी अचानक घटण्याचे एकमेव कारण म्हणजे भारतातील एडस्‌बाधितांची संख्या जास्त असल्याचे गृहित धरले गेले होते. आता, सुधारीत पाहणीनंतर ही संख्या कमी असल्याचे दिसले आहे,' असे अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या यापूर्वीच्या अहवालात भारतातील एडस्‌बाधितांची संख्या 57 लाख गृहित धरली होती. ती प्रत्यक्षात 25 लाख असल्याचे स्पष्ट झाले आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचा हा घोळ सहज विसरण्याइतका किरकोळ आहे का...? भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर, आर्थिक गुंतवणुकीवर याचा काहीच परिणाम आजपर्यंत झाला नसेल...?

No comments: