Thursday, November 15, 2007

श्रीमंतांकडून गरिबांच्या चौपट प्रदूषण

देशातील एकूण कार्बन उत्सर्जनात श्रीमंत वर्गाचा वाटा गरिबांच्या तुलनेत साडेचार पटीने जास्त आहे. "ग्रीनपीस' या पर्यावरणवादी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ........
चार महानगरांतील सात उत्पन्न गटांतील ८१९ घरांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
श्रीमंतांकडून होणारा गाड्यांचा वाढता वापर, अत्याधुनिक उपकरणांसाठी लागणारी वाढीव वीज यामुळे त्यांच्याकडून कर्बोत्सर्जन जास्त होते. कर्बोत्सर्जनाची मुख्य कारणे कमी दर्जाच्या कोळशाद्वारे केली जाणारी वीजनिर्मिती, अपुरी आणि अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अतिजलद रेल्वे ही आहेत. "विकासाच्या तुलनेतच प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी वाटली जावी, अशी भूमिका भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. तशीच देशांतर्गत प्रदूषणाबाबतही घ्यावी. जो उत्पन्न गट जास्त प्रदूषण करतो, त्याच्यावर प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी जास्त प्रमाणात असायला हवी,' अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे. "इंडोनेशियातील बाली येथे महिनाभरानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय बदल परिषदेचे अधिवेशन भरणार आहे; मात्र अजूनही भारत आपल्या विकासात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याबाबत फारसा गंभीर नाही,' असा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे.
"ग्रीनपीस'चे कार्यकारी संचालक जी. अनंतपद्मनाभन म्हणाले, ""एकीकडे सरकार दरडोई कार्बन उत्सर्जनाकडे लक्ष वेधू पाहत आहे. दुसरीकडे दीड कोटी भारतीय निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात कार्बन उत्सर्जन करीत आहेत. भारताचे दरडोई कर्बोत्सर्जन कमी दिसते; कारण गरिबांची संख्या व प्रमाण मोठे असून, त्यांचे कर्बोत्सर्जनाचे प्रमाण नगण्य आहे.''

काय म्हणतो अहवाल? श्रीमंत वर्गात कोण? - दरमहा ३० हजार रुपये वा त्यापुढे उत्पन्न असणारे गरीब कोण? - तीन हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणारे श्रीमंतांचे दरडोई कर्बोत्सर्जन - १४९४ किलो गरिबांचे दरडोई कर्बोत्सर्जन - ३३५ किलो आठ हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे १४ टक्के लोक देशाच्या एकूण कर्बोत्सर्जनाच्या २४ टक्के कर्बोत्सजन करतात.

1 comment:

JAGDISH KALEBERE said...

स्वताची गाड़ी वापरायला लागने ही तर निष्क्रिय सरकार ने लादलेली गोष्ट आहे. लोक खाजगी वहां का वापरतात हे पाहून त्यावर उपाय करावा. चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सरकार ने द्यावी जी भले कार च्या खर्चात असेल पण केव्हांही, कुठेही आनी कधीही उपलब्ध असेल तसेच कार सारखी आरामदायी असेल.
कोण जबाबदार याच्या पेक्षा का याचा विचार करावा लागेल
तसेच एकीकडे हा श्रीमंत समाज देशाला प्रगति कड़े नेत आहे. त्याच बरोबर गरीब हा त्याला लागानारी सेवा पुरवून देशच्या उन्नतित मदत करत आहे . आनी हे सर्व करताना विजनिर्मिति सारख्या पूरक गोष्टी करण्यात कामगार आनी मालक या दोघांचा ही समान सहभाग आहे . तेंव्हा या दोघात दोषी फ़क्त श्रीमंत कसा ?

जगदीश कालेबेरे