Tuesday, October 23, 2007

सेलिब्रिटीजच्या मुलांचे निर्णयस्वातंत्र्य...

टॉलीवूडचा सुपरस्टार चिरंजीवी याच्या "राजकीय मंचावरील' पदार्पणाच्या वाटेतील काटे टोकदार बनू लागले आहेत! त्याची मुलगी श्रीजा हिने आपला पती श्रीश भारद्वाज याच्यासह थेट दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत पोलिस संरक्षणाची मागणी केली। ......

दुसरीकडे गेले अनेक महिने आपल्या उपद्‌व्यापांनी त्याला हैराण करणारा त्याचा भाऊ पवन कल्याण याने आजच येथील ज्युबिली हिल्स पोलिस ठाणे गाठून आपले रिव्हॉल्व्हर जमा करीत गांधीगिरीचे प्रदर्शन केले। "आमच्या जिवाला धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे,' अशी विनंती या नवपरिणीत दाम्पत्याने केली व दिल्ली हायकोर्टाने ती लगोलग उचलून धरत तसे आदेशही दिले। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २९ ऑक्‍टोबरला होणार आहे। ...

त्याच वेळेस इकडे हैदराबादमध्ये वेगळेच नाट्य घडत होते। काही महिन्यांपूर्वीच आपल्या "लीलां'नी चिरंजीवीला अडचणीत आणणारा त्याचा भाऊ पवन कल्याण अचानक ज्युबिली हिल्स पोलिस ठाण्यात अवतीर्ण झाला. पवनने आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर पोलिस ठाण्यात जमा केले. "" माझ्यापासून तिला व तिच्या पतीला काहीही धोका नाही, हे जगाला दाखवून देण्यासाठीच मी रिव्हॉल्व्हर पोलिसांत जमा करीत आहे,'' असा फिल्मी स्टाइल "संवाद' पत्रकारांशी साधत कल्याण निघून गेला.

सेलिब्रिटजच्या मुलांना निर्णयस्वातंत्र्य किती अवघड असते, हा मुद्दा यानिमित्तानं पुन्हा एकदा प्रकाशात आला...

No comments: