Thursday, July 26, 2007

तिरुवल्लूवर ते संत तुकाराम ः एक उत्कट प्रवास...

""विकासाच्या प्रक्रियेत समाजातील दुर्बल घटकांना समान संधी देण्याची गरज असून, आर्थिक प्रगतीत प्रत्येक राज्याने सहभागी झाले पाहिजे,'' असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज केले.
""भ्रूणहत्या, कुपोषण संपुष्टात आणून बालहक्काच्या संरक्षणासाठी मी सातत्याने कार्य करीन,'' असे अभिवचनही त्यांनी दिले.

आपल्या कारकिर्दीत डॉ. कलाम यांनी लहान मुले आणि युवक यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करताना २०२० मध्ये देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखविले होते. त्याचप्रमाणे श्रीमती पाटील यांनी आपल्या पहिल्याच अधिकृत भाषणामध्ये स्वतःचा "अजेंडा'ही स्पष्ट केला. "रंजले, गांजले' यांना आपले प्राधान्य असेल, असेच जणू काही त्यांना सुचवायचे असावे. त्यासाठी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचाही आवर्जून उल्लेख केला.

""भारतीय संस्कृती पुरातन असली, तरी देश मात्र तरुण आहे व धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या छत्राखाली वेगाने वाटचाल करीत आहे. विकासासाठी सुरक्षा व शांततेची गरज आहे आणि त्यामुळेच जातीयवाद, जातिसंस्था, दहशतवाद व फुटिरतावाद यांचा सामना करण्यास एकजुटीने उभे राहावे लागेल,'' असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती पाटील यांनी आपल्या भाषणात परकीयांशी लढा देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महाल व राणी चेन्नम्मा यांचा गौरवपूर्व उल्लेख करून, स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद व सरोजिनी नायडू यांची कामगिरी विसरता येणार नाही, असे सांगितले.

आता नवा "अजेंडा'...
- भ्रूणहत्या, कुपोषण संपुष्टात आणून बालहक्क रक्षणासाठी कार्य करणार
- रंजल्या-गांजल्यांच्या भल्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन
- गरिबी निवारणाचे प्रयत्न आजही तितकेच महत्त्वाचे
- जातीयवाद, दहशतवाद, फुटिरतावादाविरुद्ध एकजुटीने उभे राहावे लागेल

तुकोबांच्या "जें का रंजलें गांजलें। त्यासि म्हणे जो आपुलें, तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।' याच उक्तीनुसार नागरिकांच्या भल्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन.
- राष्ट्रपती प्रतिभा पाटील

17 comments:

Amruta said...

No political party is seriously thinking to eradicate vulgarity from movies.
Its a surprise that our New President being a woman didn't say anything about portrayal of women in movies,television and other media.
Character building is a part of nation building work, why such important issue is ignored?
Mind pollution which is spread through media is the most harmful of all pollutions.

माधव बामणे said...

अमृताचे म्हणणे बरोबर आहे. परंतु, कायदे करुन जर एखाद्या गोष्टीवर समाधानकारक उपाय निघत असेल तर सर्वच तिढे सुतले असते. सिनेमातील किंवा कोठल्याही पडद्यावरील अश्लीलता कायदे करुन संपविता येण्यासरखी नाही. बघणाऱ्यानी ठरवले तर ते प्रत्य़क्षात येऊ शकते. लोकानी मोर्चे काढले तर त्या वर शास्वत समाधान काढता येईल.

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपले विचार मांडले. परंतु, राष्ट्रपतीना असे काय अधिकार आहेत की त्या एक तरी गोष्ट अंमलात आणू शकतील. राष्ट्रपती म्हणतात तो सल्ला असतो. त्यावर अंमल करणे बंधनकारक नसते. राष्ट्रपती फक्त मंत्रीमंडळ जे ठरवते त्याला अंमलात आणण्याकरता नोकरषाना आदेश देतात. जर मंत्रीमंडळ राष्ट्रपतींच्या विचारात सहभागी नसेल तर राष्ट्रपतींच्या विचारांची अंमलबजावणी होणारच नाही.

डौ. कलामानी हे बरोबर ऒळखले व त्यानी आपले विचार मुलामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला व त्या मध्ये त्याना यषी आले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यानीही असाच मार्ग अनुसरावा.

Anonymous said...

नव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पहिल्या भाषणात "जातीयवाद, दहशतवाद, फुटिरतावादाविरुद्ध एकजुटीने उभे राहावे लागेल" वगैरेवगैरे उच्च विचार व्यक्त केले आहेत.तसेच मी rubber stamp राष्ट्रपती नसेन हे विधान त्यांनी केले आहे.
अफ़झल गुरूच्या फ़ाशीच्या शिक्षेबद्दल त्या किती लवकर निर्णय घेतात यावरूनच दहशतवादाविरूद्ध त्या खरच लढू इच्छितात का पक्षाच्या अध्यक्षांच्या इशा-यावर मान डोलावणार हे लवकरच स्पष्ट होइल.
आधी दुस-यांनी तयार केलेली भाषणे देणे सर्वात सोपे,पण त्याप्रमाणे वागणे सर्वात कठीण!!!संसदहल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबांचे व इतर देशप्रेमी लोकांचे पण लक्ष आहे!

माधव बामणे said...

राष्ट्रपतीना कितपत अधिकार आहेत? जास्तीत जास्त सही करता आलेला कागद पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. तो कागद परत जसाच्या तसा आला तर सही करावीच लागते. राष्ट्रपतीनी आपले विचार मांड्ले. अंमलबजावणी करणे मंत्रीमंडळाच्या मर्जीवर आहे.

Anonymous said...

Aapalya deshache vaishishtya aahe jevadhe ranjalya gajalyan sathee karal tevadhe aapale ranjale ganjale mage ranget tayarach asatat.
Dusaryankadoon madat genyachee savay jat nahee toparyant sagalya netyanna ranjalya ganjalyachee seva karayachee sandhee milanar .

माधव बामणे said...

Anonymous, तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे. 'रंजले गांजले' रांगेत उभा असणारच. परंतु, 'रंजले गांजले' नसतील तर गाजर कोणाला दाखवणार? म्हणून 'रंजले गांजले' ना सक्षम करण्याऎवजी 'रंजले गांजले' ठेवणे आवश्यक आहे. त्यातूनच मत पेढी तयार होते.

कोणत्याही पक्षाकडून काम करुन घ्यायचे असेल तर स्वत:ची मतपेढी बनवा हाच संदेश राजकीय पक्षाक्डून येत आहे. परवाच मी दै. सकाळच्या 'बाचकांच्या पत्रव्यवहार' मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यानी मत पेढी बनवावी असे पत्र वाचले. काही पाहिजे असेल तर मतपेढी बनवा हाच संदेश सगळीकडून मिळत आहे.

Anonymous said...

ज्या व्यक्तीने प्रतिभा महिला सहकारी बंक महिलांकडून पैसे गोळा करून चालू केली,त्यानंतर अफ़रातफ़र करून असंख्य स्त्रियांचे पैसे बुडविले तिला तिच्या बलवत्तर नशिबाने राष्ट्रपती बनविले म्हणून ती आता तुकोबांच्या ’रंजल्या गांजल्यांचा व उद्धार’ करायला तयार होत आहे.
इतके दिवस ज्या व्यक्तीच्या तोंडातला एक शब्द ऐकू आला नाही तिला फ़ुटलेली वाचा आता प्रसारमाध्यमांच्या सौजन्याने आकाशवाणी झाल्यासारखी पसरत चालली आहे.
कोणीहि व्यक्तीने मोठ्या पदावर चढल्यावर स्वतःचे उत्तरदयित्व व स्वतःची लायकी पहिल्यांदा सिद्ध करून दाखवावी व मगच इतरांना धडे शिकवावे!
हल्लीच्या काळांत इतका भाव वाढला आहे की फ़ुकट भाव खायची संधि कोण दवडणार?
केवळ या मराठी आहेत म्हणून मी हुरळून जाउ शकत नाही!आगामी काळात त्यांचे कर्त्रुत्वच दाखवेल.पण तोपर्यंत त्यांनी ताबडतोब जळगावच्या महिलांचे लुबाडलेले पैसे पहिले परत करावेत व अफ़अलच्या फ़ाशीबाबत त्वरीत निर्णय घ्यावा अशी आशा करतो!

Suresh3211 said...

अडवानी- सुषमा स्‍वराज आणि मंडळीनी ही चिखलफेक करून झालेली आहे. सुप़ीम व हाय कोटाँने मा. प़तिभाताई वरील आरोप फेटाळले आहेत. आता तरी राष्‍ट़पति बाबत आरोप करणे शिष्‍टाचारास सोडून आहे व राज्‍य घटनेचा अपमान आहे.

Anonymous said...

I fully agree with anonymous's comments above

"बोले जैसा चाले,
त्याची वंदावी पाउले,
तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा."

प्रतिभाताई घोडा मैदानात उतरलेल्या आहेत.यापुढे त्यांच्या वक्तव्यात किती अर्थ आहे ते जवळचा काळच सांगेल!
"मी रबरी शिक्का नसणार आहे" असे त्यांचे पहिले वाक्य!बघुया त्यात तथ्य किती वा मनाच्या वृथा वल्गना किती आहेत ते!

Suresh3211 said...

"""Anonymous said...
I fully agree with anonymous's comments above"""

Anonymous and anonymous....I am confused...aren't they same or different???...Please clarify...

Suresh3211 said...

.....अफ़अलच्या फ़ाशीबाबत त्वरीत निर्णय घ्यावा अशी आशा करतो! .....
अफझल गुरू बाबत कोणतीहि कागदपञे मिळाली नाहीत- माजी राष्‍ट़पती कलाम- दै. सकाळ-पुणे- दि. २८ जुलै २००७
....
.....तिला तिच्या बलवत्तर नशिबाने राष्ट्रपती बनविले.....
अंधश्रद्‍धेवर अति विश्‍वास..प़तिभाताई ज्‍या क्षणी राष्‍ट़पती पदावर विराजमान झाल्‍या तेव्‍हाच त्‍याचे कञृत्‍व व लायकी सिध्‍ध केली व जगातील अनेक देशानी मान्‍य केले. परंतु भारतात अजूनहि ५००० वषेँ ज्ञुनाट विचारसरणीचे लोक आहेत. ते स्‍वत:ला स्‍वत:हून उच्‍च समजतात. अश्‍याना इतर कोणी उच्‍च पदास पोहचल्‍यास पोटदुखी होते.

ashok said...

the president does not have any power to bring about any change. he too wishes like many other people that things shd be great, india shd be a superpower etc etc. who does not wish all this ? so kalam also wishes. did kalam bring about any change in the system? he is on record , saying our system is good except it should be a two party system. ok . let him wish. he cannt change teh system. if the top man is powerless who has the power to chage for good, change in the desired dierection, as per his desire? noone but the people like you and me. we are the problem in india. whether india is good , bad , poor, corrrupt , anything , its due to us and not due to any kalam or pratibha.

Ganesh N. Kulkarni said...

'People get the kind of government they deserve' - so said some political thinker. If we are corrupt, then the 'government' will also be corrupt. Why do we expect that President will bring about some change in the system? The desired change can only be brought about by common people like you and me. And there is no need to make great sacrifices to make this change happen. Question is are we ready?

Suresh3211 said...

I didn’t receive Afzal clemency papers: Kalam

New Delhi, July 27
Former President APJ Abdul Kalam has answered critics over the delay in deciding on the mercy plea of Mohammed Afzal Guru, facing a death sentence for his role in the terror attack on Parliament, contending that he had not received any papers from the Government.

“Regarding Afzal Guru, I have not received any papers from the ministry concerned so far,” Kalam said, while responding to a question asked during an interview to India Today magazine on requests for clemency for persons facing the death penalty, including Guru, which had been pending with him. Kalam had sent Guru's mercy plea to the home ministry for its views. — PTI

माधव बामणे said...

श्री गणेश कुलकर्णी यांचे म्हणणे पूर्ण बरोबर नाही. लोकानी स्वत:मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. परंतु, भारतामध्ये लोकाना राजेशाही जास्त आवडते. जरी 'राजे' गेले तरी जनतेने नवीन राजे बनवले. जनतेला वाटते 'जसा राजा तथा प्रजा' तेंव्हा या नवीन राजावर जबाबदरी येते की, जनते पुढे आदर्श निर्माण करावेत. ही जबाबदारी राजकिय पुढारी पार पाडताना दिसत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, टिळक, आंबेडकर, गांधी वगैरे पुढा-यानी आदर्श निर्माण केले. त्यामुळे जनता सुधारली व स्वराज्य प्राप्त झाले. सध्याच्या पुढा-यानी आदर्श निर्माण केले तर जनता नक्कीच त्याना साथ देईल.

राष्ट्रपतीना घटनेने निरीक्षकाची भूमिका दिली आहे. राष्ट्रपती जे घडते ते घटनेनुसार आहे किंवा नाही हे पाहतात. त्या मध्ये त्याना न्यायपालिका, निवडणुक आयोग वगैरे मदत करतात. लोकानी निवडलेल्या शासनाने घेटलेला निर्णय घटनेचा भंग करत असेल तर ते राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून देतात. शेवटी राज्यकर्त्यांच्या निर्णय नोकरशाहीकडे अंमलबजावणी करता पाठवतात. त्या मुळे राष्ट्रपतीना प्रत्येक निर्णयाबद्दल दोष देता येणार नाही. राष्ट्रपतीनी चूक निदर्शनास आणून दिली नाही तरच त्याना दोष देता येईल. अफजलची फाईल राष्ट्रपतीक्डे पाठवलीच नसेल तर राष्ट्रपतीना दोष देता येणार नाही.

लोकानी प्रत्यक्षपणे निवडुन दिलेल्या आमदार, खासदार, मंत्रीमंडळ व मुख्यमंत्री, पंतप्रधान याना घटनेने सर्व आधिकार दिले आहेत. तेंव्हा वर मांडलेल्या सर्व बाबीबात लोकप्रतिनिधीना जबाबदार धरले पाहिजे.

अमृताकरता ऎक चांगली बातमी आहे. शासनाने सर्व प्रसारमाध्यमात दोन जहिरातीना बंदी घातली आहे.

captsubh said...

'People get the kind of government they deserve' या श्री.गणेश कुलकर्णी यांच्या मताशी जरी मी सहमत असलो तरी जनतेला हवा तसा बदल घडवून आणण्यास या देशात civil war च व्हायला लागेल व तशी आपली मनोधारणा नाही.
राष्ट्रपती या ख-या अर्थाने rubber stamp च असतात जरी त्यानी ते मान्य केले नाही तरी व जेथे सरकारलाच काही सुधारण्याची इच्छा नाही तेथे त्या काय करणार?
आधी सर्व रांगेत असलेल्या फ़ाशीशिक्षांबद्दल त्या काही करू शकतात का हे दिसेल का सर्व फ़ाइली कुठल्यातरी मंत्रालयात धूळ खात पडलेल्या आहेत त्या तिथेच पडू द्याव्यात अशी त्यांची पण मनस्थिती आहे हे नजिकचा काळच दाखवेल!

माधव बामणे said...

श्री सुभाष भाटे, भारत शांतता प्रिय देश आहे. येथे गृहयुद्ध होणार नाही. भारतातील नागरिक अजुनही सरंजामशाही मानतात. त्या मुळे 'राजा कालस्य कारणम्' हे येथे सत्य आहे. येथील नागरिकाना पुढारी लागतो. एकदा पुढाऱ्याने विश्वास संपादन केला की जनता तो सांगेल ते करते. भारतात क्रान्ती पाहिजे असेल तर ती चांगला पुढारी निर्माण झाल्याशिवाय शक्य नाही.

राष्ट्र्पतीना अधिकार नाहीत. जनतेच्या प्रतिनिधीना सर्व अधिकार आहेत व ते योग्यच आहे. श्रीमती प्रतिभा पाटील राष्ट्र्पती झाल्या म्हणून त्या वेगळे कांही क्रु शकतील अशी आपेक्षा बाळगणे निरर्थक आहे.