Saturday, June 09, 2007

To Have or Not To Have?

यंदाचा बारावीचा निकाल मागील वर्षीपेक्षा खूप वेगळा आहे. कारण यंदा गुणवत्ता यादी न लावण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि शिक्षण मंडळानं घेतला आहे. परंतु मंडळाने, विभागात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाखानिहाय पारितोषिकं जाहीर केली आहेत. त्यामुळे, एक प्रकारे विभागनिहाय गुणवत्ता यादीच जाहीर झाली आहे. एका बाजूला प्रत्यक्ष गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला शाखानिहाय पारितोषिकं जाहीर करायची आणि एक प्रकारे गुणवत्ता यादीच लावायची अशी सर्वत्र चर्चा आहे. ईसकाळच्या वाचकांनी मात्र आपल्या प्रतिक्रियांमधून "गुणवत्ता यादी हवीच" हा मुद्दा उचलून धरलेला आहे.
-----------------
ईसकाळकडे आलेल्या प्रतिक्रिया
गुणवान विद्यार्थ्यांचे कौतुक हवेच
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थांचे अभिनंदन. मला व्यक्तीश: असं वाटतं की प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व्हायलाच हवे. का नाही? त्यांनी यश मिळविण्यासाठी खूप परिश्रम घेतलेत? गुणवत्ता यादी ही हवीच. मंडळाचा गुणवत्ता यादी न लावण्याचा निर्णय अत्यंत कृत्रिम वाटतो. केवळ गुणवत्ता यादी न लावल्याने अपयश आलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट होणार नाही आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो लावणाऱ्या क्‍लासेसच्या जहिराती रोडावणार नाहीत असे मला वाटते. फर्ग्युसनच्या शिवानी देवलचा फोटो प्रत्येक क्‍लासच्या जहिरातीत झळकलेला तुम्ही पहालंच.
मात्र, गुणपत्रिकेवर आईचे नांव लावण्याचा मंडळाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
प्रमोद घारगे
पालवे बुद्रुक, तालुका- पारनेर जिल्हा अहमदनगर
निर्णय अत्यंत चुकीचा
गुणवत्ता यादीत न आलेले विद्यार्थी निराश होऊ नयेत म्हणून अशी यादीच न लावण्याचा मंडळाचा निर्णय अत्यंत चुकीचा वाटतो. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला गुणवत्ता यादीला तोंड द्यावेच लागते. सीईटी, ऑल इंडिया यादी. गुणवत्ता यादीला विरोध करणारी मंडळी खरं तर गुणवत्तेच्याच विरोधात असतात.
रवी सराफ
ही तर वैचारिक दिवाळखोरी
गुणवत्ता यादी न करण्याचा निर्णय ही वैचारिक दिवाळखोरी आहे! कोणत्याही प्रकारच्या गुणवत्तेचा जाहीर सन्मान आवश्‍यक असतो. आणि तो समाजाची गुणवत्ता वाढवायला मदत करणारा ठरतो. ईन्सेटिव्हज देण्याने जास्त विकास होतो हे जगजाहीर सत्य आहे. गुणवानांचा सत्कार म्हणजे त्या पातळीला न पोहोचलेल्यांचे खच्चीकरण अशी मंडळाची समजूत झालेली दिसते. ती अतिशय चुकीची आहे. गुणवत्ता यादी पुन्हा लागू करावी असे माझे मत आहे.
सौरभ भिडे, अमेरिका

What do you think?

9 comments:

Anonymous said...

I just cannot understand the language the post is written in. This is what I think.

Anonymous said...

I think the decision in foolish.

Anonymous said...

How did you read this post Anonymous? Does this need special font or software? On my computer it looks all greek and roman.

sakaal papers said...

Oh! It seems that some readers had trouble viewing this post. It was the UNICODE issue, we suppose. Here is the post in readable form.
Keep on posting your valuable comments.

Anonymous said...

गुणवत्ता यादी रद्द करण्याचा निर्णय अयोग्यच वाटतो. निकालानंतर स्पर्धेमुळे अथवा मानसिक ताण येऊन आत्महत्या किंवा तत्सम गोष्टींच्या बातम्या कानावर जरी येत असल्या तरी याचं मूळ हे त्या विद्यार्थ्याच्या अथवा दडपण आणणार्‍या त्याच्या पालकांच्या मानसिक जडणघडणीत आहे. त्याची शिक्षा गुणवत्ता यादी जाहीर न करुन हुशार विद्यार्थ्यांना देणे बरोबर नाही. खरंतर गुणवत्ता यादीमुळे प्रेरणा मिळून अधिकाधिक पुढे जाण्याची इच्छा निश्चितच निर्माण होते. त्यामुळे 'मेरिट लिस्ट' आणि त्यासोबतचं 'ग्लॅमर' हे समाजासाठी एक उत्तम टॉनिकच आहे.

Anonymous said...

gunavatta yadi jahir na karne he ayogya ahe !! atishay chukicha nirnay ! nikalanantar apayashi vidyarathi atmahatya kartat kiva depression madhe astat pun tyala karan palak ahet.palak vidyarthyanvar changle marks milavnyasathi kiva merit madhe yenyasathi satat pressure antat.teva palakani mulanchi manasik sthiti janun ghyavi.aplya mulachi gunavatta kiti ahe he janun tashi apeksha karavi ani mulanvar markancha kiva merit madhe yaycha bandhan thevu naye.
kuthlyahi kshetrat spardha aslich pahije.tyashivay pudhe janyachi,jinkanyachi bhavna manat jagrut honar nahi.

Unknown said...

To achieve Quality & perfection,considerable amount of efforts have to be put in.The system recognises the success achieved by few by merit lists & mark percentages & also motivates others to strive harder & emulate success.
By not publishing the merit lists & acknowledging the achievements,we will only turn out more mediocre & average students.
It is only competition which is recognised the world over,be it in studies,or jobs or sports.Darwin's theory of "survival of THE FITTEST" applies even today.The "below average" performing M'tra govt's retrograde decision not to publish merit lists is a foolish backward step to churn average/below average students!!!
In today's global competition,only THE BEST will stand the test of time.The earlier the govt rescinds this order,the better for M'tra!Enough of this constant worrying about the lower caste masses!
Subhash Bhate

Unknown said...

Totally agree with VJ...
Talented students gain lots of confidence and inspiration from merit list.
And yes,"survival of THE FITTEST" applies even today.

Anonymous said...

सर्वांचे म्हणणे गुणवत्ता यादी बनबुन जाहीर करावी असे आहे. प्रथम सांगा गुणवत्ता म्हणजे काय? गाईड तोंडपाठ करुन परीक्षेत पाने खरडणे?, खाजगी क्लासला जाऊन संभाव्य प्रश्नांची उत्तरे घोकून पांढ-यावर काळे करणे?, पैसे देऊन, प्रश्नपत्रिका मिळ्वुन मला येते दाखवणे? सध्याच्या परिक्षा पद्धतीत गुणवत्ता जोखण्याचे कोणते निकष आहेत? जर गुणवत्ता तपासलीच जात नसेल तर काय डोंबलाची गुणवत्ता यादी बनवणार! शासनाने स्वत:ची गुणवत्ता ऒळखून योग्य निर्णय घेतला आहे. त्याचे कौतुक करावयाचे सोडून का उगाच बोटे मोडता?