Tuesday, June 12, 2007

World Has Moved Ahead in Methods. Politics is Not.

दहावीच्या मराठी व भूगोल विषयांच्या पुस्तकातील चुकांबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी "बालभारती'च्या सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयात आज धुडगूस घातला. त्यांनी मंडळाचे संचालक डॉ. वसंत काळपांडे यांना शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न केला. कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला...
त्यांनी (
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी) पुस्तकाची छपाई पुन्हा करावी लागल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण, असे विचारत डॉ. काळपांडे यांच्या टेबलवरील फायली त्यांच्या दिशेने भिरकावल्या आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या प्रकाराने काळपांडे भांबावले. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सावरले व एका क्षणात "अँटीचेंबर'मध्ये नेले. तेथे कडी लावून त्यांना आत बसविण्यात आले. दरम्यान या सर्व प्रकाराला प्रतिकार करणाऱ्या कार्यालयातील महिलांच्या अंगावर धावून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. सुमारे पाच मिनिटे सुरू असलेल्या या गोंधळात डॉ. काळपांडे यांच्या टेबलावरील सर्व फायली व इतर कागदपत्रे अक्षरशः उधळून टाकण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सुरू झालेल्या या प्रकाराने सर्व कर्मचारी भांबावले होते. "मनसे'चे हे कार्यकर्ते त्यानंतरही बराच वेळ बसून होते. त्यानंतर पोलिस पोचले. डेक्कन पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयवंत देशमुख काही वेळाने आले. घडलेल्या प्रकाराबाबत देशमुख यांच्यासमोर आपली बाजू सांगून कार्यकर्ते निघून गेले.

3 comments:

Sameer said...

मुलांना पाठ्यपुस्तक म्हणून देण्यात येणा-या पुस्तकांमध्ये समितीवर असलेल्या कथीत "तज्ञ" लोकांकडून शुद्धलेखनाच्या चुका होवून पुस्तके परत छापावी लागली हे वाचुन हसावे की रडावे हेच समजत नाहीये! आपल्या कामाशी प्रामाणीक राहील्यास अश्या गोष्टी घडणार नाहीत.

Unknown said...

The way protesters used may not be good,but this so called 'TADNYA' must know that they must be more resposible and they are asnwerable to the peoples.

Whom is responsible for the extra expendeture which is due to their fault?

Anonymous said...

पुस्तके छापण्यात चुका झाल्या हे मान्य. या चुका करणा-याना शिक्षा झाली पाहिजे हे मान्य. चुका निदर्शनास आणून देणे हे ही मान्य. परंतु, चुका करणाराना शिक्षा करण्याचा अधिकार मनसेच्या पुत्राना आहे हे अजिबात मान्य नाही. त्याना अधिकार फक्त निदर्शने करण्यापुरताच. न्यायालयात जा व पुढील शिक्षा होतील याची काळजी घ्या. अरेरावी करणाराना आधी शिक्षा करा व नंतर तथा कथित ज्ञानी महाभागांची (पुस्तके छापण्यात चुका करणा-यांची) सेवा खंडित करा. पुन्हा चुका केल्यातर सेवेचे कसलेही फायदे न देता नोकरीतून काढून टाका. कोणावरही दया दाखवू नका.