Wednesday, June 13, 2007

मराठीला पर्याय इंग्रजी?

मायमराठीची काळजी वाहण्याचे नाट्यप्रयोग मराठी साहित्य संमेलनापासून ते सरकारपर्यंत होत असले, तरी प्रत्यक्षात मात्र मराठीचे अंथरूण-पांघरूण इंग्रजी ओढून घेताना दिसते आहे. इंग्रजी शिकण्याला कोणाचाच विरोध असता कामा नये. कारण ती जगाची आणि ज्ञानाची भाषा बनली आहे. इंग्रजीशी गट्टी करून तसे काही साध्य होणार नाही. तसे करणे हेसुद्धा कोडगेपणाचे ठरेल. प्रश्‍न आहे तो इंग्रजीशी मैत्री करायची, की मराठीची सारी जागाच तिला देऊन टाकायची? या प्रश्‍नाचे उत्तर कोणी गांभीर्याने शोधत नाही, म्हणून तर पेचप्रसंग निर्माण होतात. त्यातून टोकाच्या भूमिका तयार होतात. मराठीच्या नावाने गळे काढण्यापासून ते तिच्यासाठी वरवरचे का असेना, पण आंदोलन करण्यापर्यंत अनेक प्रयोग विशिष्ट ऋतूत होतात. ऋतू संपले, की प्रयोगाचा तिसरा अंक संपायला लागतो. असाच एक प्रयोग सुरू झालाय आणि तो म्हणजे मराठीची काळजी वाहतच, पण बंद पडणाऱ्या मराठी शाळांची जागा इंग्रजी शाळांसाठी देण्याचा. खुद्द शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनीच त्याचा उच्चार केला असल्याने त्याकडे थोडेसे गांभीर्याने पाहायला हवे. राज्यात मराठी शाळांना गळती लागली आहे. त्यातही सरकारी शाळांची गळती मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नाही, हा समज वाढू लागला आहे. विविध सोयीसुविधा असूनही तेथे जाण्यास मुले तयार नसतात. शिक्षकांच्या उपस्थितीपासून ते त्यांच्याकडून मिळत असलेल्या ज्ञानापर्यंत, गुणवत्तेपर्यंत वेगवेगळे प्रवाह आहेत. सरकारी शाळा वाईटच असतात, असे गृहीत धरण्याचे काहीच कारण नाही; पण दुर्दैवाने ते गृहीत धरले जात आहे. सरकारी दवाखान्यात गुण येत नाही, अशी जी एक सार्वत्रिक तक्रार करण्यात येते तशी ती सरकारी शाळांबाबतही होऊ लागली आहे.

6 comments:

Dr. Rajshekhar Karlekar said...

as given in the article Marathi schools are important. There is no need of protecting Marathi medium schools but it is important that we must educate the parents about the scientific importance of the primary education in "Matribhasha" The media must take proactive steps in the parent education by providing worldwide scientific data available.
Dr.Rajshekhar Karlekar
http://bodynmindblog.blogspot.com

Unknown said...

parents should know one thing that
laungage and intellegency are not interdependent.
English is nessasry to reach at the world , but every student must be clear with its basic knowledge, which is easily possible by using "Matribhasha"in its primary educatioin.

Nitin Khairnar

Unknown said...

We should be proud of our Matrubhasha. Education and knowledge are related to language which we are well aware of. Understanding and interpretation of any subject is very easy in our own matrubhasha as compare to English. However Marathi is more harder than english to learn. Parents and Education Minister should promote Marathi Medium School instead of English

Unknown said...

Although it has become imperative to learn/know English,especially after the advent/incursion of computers in daily life,it is still essential & ideal to know the mother tongue very well.In fact,many parents still prefer to send their wards to Marathi medium schools due to better standard of imparting knowledge.
Why the M'tra govt.has started unnecessarily interfering in all spheres of education is not understood.The quality of anything the govt runs,be they schools or hospitals,is mostly well below the mark,but the new school of thought to replace Marathi schools by English medium ones has to have some ulterior pecuniary motive of some "शोक्षणसम्राट"
Marathi is our matrubhasha & leave it alone!!!!!

Anonymous said...

laungage and intelegency are different things. See that number of students selected in IAS in regional laungaues are more than english medium student.

Ultimatly cleaver pupils shines irrespective of laungages

Anonymous said...

मनुष्याला जगण्याकरता अन्न लागते. पण फक्त अन्नच पुरेशे नाही. संपन्न जीवन जगण्यास संस्कृती अत्यंत आवश्यक आहे. संस्कृती जोपासण्याकरता मातृभाषेत प्राविण्य आवश्यक आहे.
येथे या बद्दल थोडे वाचण्यास मिळाले

दुसरा मुद्दा ज्ञान आत्मसात करण्याचा. त्याकरता मातृभाषेला पर्याय नाही. मातृभाषेत समजणे सोपे जाते.

तिसरा मुद्दा फक्त इंग्रजीत असणारे ज्ञान किती लोकाना आवश्यक आहे? ९० % लोकाना मातृभाषेत उपलब्ध असणारे ज्ञान पुरेसे आहे.

चौथा मुद्दा फक्त वर्गात कानावर पडणारी भाषा किती विद्यार्थी आत्मसात करु शकतील?

पांचवा मुद्दा गेल्या १०० किंवा जास्त वर्षात मराठी माध्यमात शिक्षण घेऊन कित्येकानी अटकेपार झेंडा लावलाच ना?

साहवा मुद्दा जगातील सर्वच पुढारलेल्या राष्ट्रात इंग्रजीमधुन शिक्षण दिले जाते काय?

सातवा मुद्दा इंग्रजी ही भाषा म्हणून शिकुन उच्च शिक्षण घेता येणे श्क्य का नाही.

माझ्या मते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मातृभाषेतच द्यावे. उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे. त्याच बरोबर जमेल तसे इंग्रजीतील ज्ञान मराठीत आणावे. सध्या किती तरी साईटवर हे काम चालू आहे.