Friday, June 08, 2007

Just Hypocrisy or a Welcome Trend?

शिवसेना-आयएमसीपीची मालेगाव पालिकेत युती

मुंबई, ता. ७ - मालेगाव महापालिकेत इंडियन मुस्लिम कॉंग्रेस पार्टीशी युती करण्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज हिरवा कंदील दाखविला...

मालेगावचा विकास या मुद्द्यावर शिवसेनेने आयएमसीपीशी युती करण्यास कुठलीही हरकत नसल्याचे मत शिवसेनाप्रमुखांनी व्यक्‍त केले. आयएमसीपी धार्मिक आहे; पण निहाल अहमद हे धर्मांध आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याबरोबर जाऊ नये, अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. १५ जूनला महापौरपदासाठी निवडणूक असून, सत्तेसाठी ३७ हे संख्याबळ आवश्‍यक आहे. आयएमसीपीच्या व शिवसेना मिळून ३३ संख्या होत असून, अजून सत्तास्थापनेसाठी चार नगरसेवकांची आवश्‍यकता आहे. आयएमसीपीने सत्तास्थापनेसाठी आवश्‍यक असलेल्या अन्य चार नगरसेवकांसंदर्भात तयारी करावी. शिवसेनेची कधीही सहकार्याची भूमिका असल्याचे कळविण्यात आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आयएमसीपीच्या मौलवींशी चर्चा झाल्या होत्या. आज हे मौलवी शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी "मातोश्री'वर आले होते. मात्र त्यांना येण्यास उशीर झाल्याने पुढच्या रणनीतीसंदर्भात त्यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा केली.

2 comments:

Anonymous said...

Hippocrat is not Shivsena, but the congress who used muslims for its own gains. I personally welcome this thing because, it shows that congress does not own muslims.

Anonymous said...

नावावरुन मला वाटते 'शिवसेना'म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सेना. बाळासाहेब ठाकरे हेच सांगतात. छत्रपतीना कोठल्याहि धर्माचे व जातीचे वावडे नव्हते. तेव्हा मुसलमान धर्मगुरुनी स्थापन केलेल्या आघाडीला खरे तर कॊंग्रेसने पाठींबा देऊन त्याना विकासात सहभागी करुन घ्यावयास पाहिजे होते. कॊंग्रेसने धर्मगुरुना धर्मनिर्पेक्षतता समजावण्याची सुवर्णसंधी घालवली. शिवसेना जर हे करत असेल तर त्यात अक्षेपार्ह काय? धर्मगुरुना विकासाचे महत्व पटले असेल तर ही संधी मानावी, संकट नव्हे.