Tuesday, March 27, 2007

'चार' पंतप्रधानांमार्फत सरकारचा कारभार - वेंकय्या नायडु




"केंद्रातील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे (यूपीए) सरकार दिशाहीन असून, या सरकारचा कारभार केवळ एका पंतप्रधानांकडून चालत नाही, तर चार पंतप्रधान हा कारभार चालवतात, अशी बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी केली आहे. .......
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीनिमित्त वाराणसी येथे आठ जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. नायडू यांनी यूपीए सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली.

सोनिया गांधी या सरकारच्या सर्वशक्तिमान पंतप्रधान असून, रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव हे अप्रत्यक्ष पद्धतीने सरकारचा कारभार चालवीत आहेत. साम्यवादी पक्षही अप्रत्यक्षपणे पंतप्रधानपदाची सूत्रे हाकीत असून, खरे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना मात्र कारभारात नगण्य स्थान आहे, अशी टीका नायडू यांनी केली."
तुम्हाला काय वाटते?

3 comments:

Suresh said...

यात काही वावगे नाही. NDA चा कारभार याच प़माणे चालला होता. वाज्ञपयीचा फक्‍त मुखवटा होता . वाज्ञपयीना धड चालता येत होते , स्‍मरणशक्‍ती कमी झालेली होती, झोप आवरत नसे, दृष्‍टी कमज्ञोर झालेली, सही करण्‍यापूतींच लिहीण्‍याची ताकद राहिलेली होती. सवं कारभार इत र्‍यांच्‍या मदतीने चाललेला होता. दूरदशॅशन वर वाज्ञपयीची परावलंबिता जनतेला स्‍पष्‍ट दिसलेली आहे.

Unknown said...

श्री.सुरेश यांच्या मताशी मी मुळीच सहमत नाही कारण श्री.वाजपयी वयामुळे व गुडघ्याच्या त्रासामुळे जरी शरीराने थोडे कमकुवत असले तरी मनाने अतिशय खंबीर होते व राष्ट्राची धुरा NDA समर्थपणे पेलवत होते.शिवाय ते एक अत्यंत उत्कृष्ट वक्ते व उत्तुंग व्यक्तिमत्व होते.सर्वच पंतप्रधान आपल्या सरकारचा कारभार त्यांच्या मंत्री सहका-यांच्या मदतीनेच चालवितात.
आपले सध्याचे पंतप्रधान तर एक अतिशय हुषार,सर्वात नावाजलेले,निष्णात व अनुभवी world famous economist आहेत हे सर्वांना स्त्रुत आहे.मुद्दा असा की एका विशिष्ट व विचित्र परिस्थितीत त्यांना पंतप्रधान व्हायचे निमंत्रण मिळाले व त्यांनी ते मोठ्या मनाने स्वीकारल्यानंतरपण त्यांच्या व देशाच्या दुर्देवाने त्यांच्यावर कायमचा अंकुश ठेवला गेला असल्यामुळे त्यांचा प्रभाव अपेक्षेपेक्षा फ़ारच कमी पडतांना दिसत आहे.आपल्या देशात ४ पंतप्रधान आहेत या वेंकय्या नायडूंच्या मताशी मी पुर्णपणे सहमत नाही,पण २ दिसतात व अनुभवायलापण येतात यात अतिशयोक्ती वा शंका नाही!
श्री.मनमोहनसिंहांच्या डोक्यावर सतत 'टांगती तलवार' असते व काही बिघडले तर अपयशाचे खापर त्यांच्याच डोक्यावर फ़ुटते,पण कुठल्याही चांगल्या गोष्टीचे श्रेयमात्र कोंग्रेसच्या रणनितीप्रमाणे सर्व प्यादे श्रीमती सोनिया गांधीनाच देतात व ते घ्यायला त्या सदैव सरसावतात हे कित्येकदा स्पष्ट झालेले आहे!
श्री.लालू प्रसादांना अनन्यसाधारण महत्व द्यावेच लागते कारण त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कुबड्या काढून घेतल्या तर सरकार सहज कोसळू शकते!आजचे राजकारण काहीहि करून राज्यकर्त्या पक्षांनी व व्यक्तींनी कायम खुर्चीला चिकटून राहण्याच्या एकमेव हेतुनेच केले जाते यात नवे काहीच नाही!
काही असो,आपल्या लोकशाहीत जात,धर्म यासारख्या अनेक निकषांवर अनेक पक्षांचेच सरकार आपल्या घटनेतील त्रुटींमुळे यापुढेपण यायची शक्यताच जास्त आहे व ते कसेबसे टिकवून धरण्यासाठी अशी तारेवरची कसरत चालुच राहणार हे त्रिवार सत्य आहे!

Anonymous said...

सोनिया गांधीनी congress president ची धूरा संभाळल्यानंतर congressची परिस्थिति खूपच सुधारली होती.३ वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत नसतांना सुद्धा इतर अनेक पक्षांच्या मदतीने त्यानी सरकारची स्थापना केली व श्री.मनमोहनसिंहाना पंतप्रधान केले.सुरुवातीच्या काळात दिवस चांगले गेले,पण फ़ार घाईच्या उदारीकरणाच्या व globalisation च्या धोरणामूळे फ़क्त शेअर बझारच फ़ोफ़ावला व त्याबरोबरच सामान्य माणसासाठी प्रचंड महागाई वाढली.SEZ साठी गरीब शेतक-यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात हडप करण्यांत आल्या व बेजमीन व बेघर झालेल्या कित्येक शेतक-यांनी आत्महत्या केल्या.
येवढे हौउनसुध्हा प्रधानमंत्री यांना काही फ़रक पडला नाही कारण फ़क्त सोनिया गांधीनाच सर्व गोष्टींवर बोलायचा वा निर्णय घ्यायचा अधिकार आहे!इतके हुषार असूनहि पंतप्रधान त्यांच्या हातातले बाहुलेच आहेत.
श्री.वेंकय्या नायडूंच्या मताशी बरेचसे लोक सहमत असणार की देशांत कमीतकमी ४ नाही तरी २ पंतप्रधान कार्यरत आहेत.पण यामुळे व सध्याच्या धोरणामुळे देशाची अधोगतीच होत आहे!मतांसाठी
जातीवर अवलंबुन राहणारे सध्याचे राजकारण तर या देशाला फ़ार महाग पडणार आहे!so-called जातीय NDA या आजच्या खोट्या धर्मनिरपेक्ष UPA govt पेक्षा कधीहि चांगले राज्य करत होते व ३ वर्षांपूर्वी सर्वच खुप स्वस्त होते याबद्दल शंकाच नाही!