Wednesday, March 21, 2007

Is This Hypocracy? Or Just Politics?

पवारांशी असलेल्या जुन्या मैत्रीचा दाखला देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापुढे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला। याआधीच आम्ही एकत्र आलो असतो, तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे घडले असते व पवार पंतप्रधानही होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली...
शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा महापौर झाल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्‍न विचारला होता. त्यावर बोलताना बाळासाहेब म्हणाले, की शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करण्याला आपला विरोध नाही. याआधीही पवारांकडे याबाबत विचारणा केली होती. पवारांपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता; मात्र त्या वेळी त्यांनी आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. पवार हा उमदा माणूस आहे; मात्र ते कधी काय डावपेच खेळतील हे सांगता येत नसल्याचेही ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीशी युतीबाबत भाजपला विश्‍वासात घेतले होते का, असे त्यांना विचारले असता आपण सगळ्याच गोष्टी भाजपला विचारून करीत नाही, असा टोला त्यांनी लगावला..

4 comments:

Anonymous said...

I think this is purely hypcracy

Anonymous said...

शिवसेना हा धर्मवादी पक्ष आहे. जेंव्हा स्थापन झाला तेंव्हा तो महाराष्ट्रवादी होता. मुंबई मध्ये उत्तर भारतीयांचे वर्चस्व वाढल्यावर या पक्षाने हिंदुत्त्वाची कुबडी स्वीकारली. तरी पण शिवसेनेमुळे केंद्र सरकावर दबाव आहेच. त्या मुळे मराठी लोकाना केंद्र सरकार सहजासहजी डावलू शकत नाही. महाराष्ट्राच्या हिताकरता शिवसेना टिकली पहिजे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याचा जोर महाराष्ट्रातच आहे. शिवसेनेचे कांही मुद्दे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पटले तरी स्वीकारता येणार नाहीत. तरी पण राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेची मदत जरुर घ्यावी.

बाळासाहेब ठाकरे यानी एक मोठी चूक केली. शिवसेनेच्या कांही सुभेदाराना राजकारण्यासारखे वागवले नाही व त्यातील कांही पक्ष सोडून गेले. त्यानी सर्व सुभेदाराना विभाग वाटून दिले असते तर प्रत्येकाला आपले कर्तृत्त्व सिद्ध करुन दाखवता आले असते व त्यातुन त्यांचा वारस निवडता आला असता. असे झाले असते तर शिवसेनेला महाराष्ट्रात पर्याय राहिला नसता.
बाळासाहेबांच्या या चुकीचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने करुन घेणे आवश्यक आहे

Suresh said...

बाळासाहेब ठाकरे व शरद पवार हे दोघेहि ज्ञण मुरलेले राज्ञकारणी आहेत. आपल्‍यसारख्‍या सामान्‍यानी त्‍यांच्‍याबद्‍दल बोलणे अवघड आहे.

Unknown said...

It is said'politics makes strange bed fellows',so the key politicians have been friends as well as foes depending on circumstances,but the great Maratha warrior Shri.Sharad Pawar as well as the great shivsamrat Shri.Balasaheb Thakre have each carved great niches in Maharashtra politics, while towering over it as individual colossuses.
If they do come together,Maharashtra will definitely stand to gain & its voice will carry far & wide.
त्यामुळे ते दोघे एकत्र आले तर फ़ायदाच होइल.नाहीतरी congress चे पक्षश्रेष्ठी दिल्लीहुनच महाराष्ट्रावर कायम काबू ठेवतात व इथल्या नेत्यांना ठराविक पातळी पलिकडे वर जाउ देत नाहीत व आता स्थानिक पातळीवरच या राज्याचा विकास झाला पाहिजे जो शरद पवार व बाळासाहेबच करु शकतात.
सुभाष भाटे