Tuesday, December 12, 2006

Resurgence of Marathi Cinema

Thanks to the new multiplex culture, government backing, new breed of movie makers and a renewed patronage-the Marathi Cinema is set to take off again. A news in Sakaal says that Marathi movies attained a number of 50 this year. Read this news -

"... काही वर्षांपूर्वीपर्यंत एका वर्षांमध्ये मराठी चित्रपट निर्मितीचा दुहेरी आकडाही जेमतेम गाठला जायचा. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये त्यात बराच फरक पडला असून, चित्रपटनिर्मितीच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये सरकारच्या अनुदान योजनेचा लाभही अनेक चित्रनिर्मात्यांना मिळाला असून, तब्बल १० कोटी रुपयांचे वाटप या माध्यमातून झाले आहे."


Tell us how many of the Marathi movies released this year have you seen? Which of these you liked the most?

Some of these movies were -
'आम्ही असू लाडके', 'मातीच्या चुली', 'शेवरी', 'दिवसेंदिवस', 'बघ, हात दाखवून', 'शुभमंगल सावधान', 'थांग', 'नाना मामा', 'मातीमाय', 'आनंदाचं झाडं', 'लपूनछपून', 'रेस्टॉरंट', 'माझा नवरा, तुझी बायको'

3 comments:

Unknown said...

Resurgence of Marathi Cinema!

अलिकडच्या काळांत नवीन आलेल्या चित्रपटांपैकी 'श्वास' हा एक अत्यंत हृदयस्पर्शी मराठी चित्रपट,'विश्वास' हा अंधश्रद्धा व त्याचे दुष्परिणाम या विषयावरचा चित्रपट,'पैलतीर' हा म्हाता-या आई वडिलांना canada ला स्वार्थासाठी बोलवून घेऊन त्यांची पूर्ण आबाळ करणा-या क्रूर दांपत्याच्या तावडीतून सोडवून आपल्या घरी त्यांची शुश्रुषा करणा-या अपरिचीत मराठी जोडप्याच्या हृदय़ हेलावणा-या कथेवर रचलेला चित्रपट,'डोंबिवली फ़ास्ट' हा आजच्या राजकारणावरील वस्तुस्थितीला अनुसरून काढलेला खूर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट, 'तू तिथे मी' हा वानप्रस्थाश्रमी परिस्थितीमुळे वेगळेवेगळ्या गावी राहणा-या वृद्ध दुखीः नवराबायकोवरचा चित्रपट व 'सातच्या आत घरात' हा आजकाळच्या तरुण पिढीच्या स्वैर वागण्यामुळे होणा-या धोक्यांबद्दल जागृती निर्माण करणारा चित्रपट हे मला अत्यंत आवडले.'अनाहत' हा अमोल पालेकरांचा चित्रपट तांत्रिकद्रुष्ट्या चांगला असूनहि विषय रुचला नाहीं.
यापूर्वी मध्यम काळात धांगडधिंगा, नाचणे गाणे यांची रेलचेल असलेले चित्रपट एका ठराविक वर्गालाच कदाचित पसंत पडायचे. हल्लीचे तांत्रिकद्रुष्ट्या अतिशय दर्जेदार,सर्वसामान्य माणसाला येणा-या परिचीत अनुभवांवर काढलेल्या कथानकांवरचे, कमी बजेटचे,पण रंगीत चित्रपट अतिशय लोकप्रिय होत आहेत ही मराठी सिनेमाच्या व मराठी प्रेक्षकांच्या दृष्टीने अत्यंत चांगली व स्वागतार्ह गोष्ट आहे.अशीच मराठी सिनेमाची घोड्दौड चालू रहावी व त्याला पूर्वीचे सुवर्णदिवस कायमचे यावेत अशी शुभेच्छा! नवीन मराठी दिग्दर्शक व कलाकारांचे व या अतिलोकप्रिय मनोरंजनाच्या विषयावर ब्लोगवाचकांचे अभिप्राय व मते नोंदविण्याबद्दल इ-सकाळचेहि अभिनंदन!
सुभाष भाटे

Anonymous said...

"नितळ" हा मराठी सिनेमा कोणी produce केला?
हा कॊठे पहायला मिळेल?

Unknown said...

Last Year i have seen "kaydyach Bola". Picture is too good. Pan asa changala marathi picture 10 madhye ekhada asato. Mhanun mouth publicity nantar bhagayala jato..