Saturday, December 02, 2006

Dirty Is Politics

It is now a known fact that the violence that erupted after Kanpur incidence is a case of dirty politics. Common people do not need CBI or court to prove this fact. They know already. That is the reason that after riots, aam aadami asks - 'Which elections are in the offing now?'

Read this news appeared in sakaal.

"...महाराष्ट्रातील अभूतपूर्व व व्यापक दंगली या मुख्यतः दलित समाजाच्या नेतृत्वासाठी चाललेल्या चढाओढीतून तसेच दलितांमधील नाराज व अस्वस्थ घटकांकडून झाल्याची शक्‍यता केंद्राच्या पातळीवर मानली जाते. पालिका निवडणुका व खैरलांजी प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवरच हे प्रकार घडले असून, कानपूरची घटना निमित्तमात्र ठरली, अशीही शक्‍यता येथील गोटातून व्यक्त होते आहे. राज्यातील रिपब्लिकन नेतृत्वाबद्दल दलितांमधील तरुणांची प्रचंड नाराजी हाही एक प्रमुख घटक यामागे असल्याची माहिती मिळते. रिपब्लिकन नेतृत्वातील भांडणे आणि राजकारणातील पदे विशिष्ट व मोजक्‍याच मंडळींच्या पदरात पडण्याचा सततचा प्रकार यातून विशेषतः तरुणवर्ग नाराज झाला आणि त्यातूनच ही हिंसक प्रतिक्रिया उमटल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. अन्यथा उत्तर प्रदेशातील घटनेची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटण्याचे कारण दिसत नाही. त्यातही खुद्द उत्तर प्रदेशात किंवा अगदी कानपूरमध्येही संबंधित घटनेनंतर अशी दंगल किंवा हिंसाचार झालेला नाही. त्यामुळे दंगलींमागे स्थानिक कारणे व घटकच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..."


Another point that has been mentioned in the report above is the Leadership in the deprived classes. Though due to the reservation policies, education and jobs are within reach of these classes, the 'Development' is not percolating down. For the benefits of development to reach throughout these sections, a strong leadership which has emerged from within is a prerequisite. And it is not happening. What we find today is a direction-less and fractured Dalit movement which is paralyzed by selfish and dwarf leaders.

4 comments:

Anonymous said...

Dr. Babasaheb Ambedkar was not only a great man of his time but at least for a few centuries to come. He had not only thought for his time but for a few centuries in advance. One of his conviction had been 'education' He believed in only education can bring about changes in life of the down trodden. He did believe that change of faith would give feelings of equality to 'Dalits' However the so called 'non-dalits' proved his thinking wrong.

So called his followers are more worried about his statue than his philosophy. This is just the safeguarding vote bank. They should be asked to give account of efforts they made for spreading education. They should be asked to give account of training they gave to their fellow down trodden. They have nothing in their credit so they are safeguarding statue or I would say their vote bank. I think vote bank is more correct.

All political parties and so called leaders of upper caste are happy that the down trodden is not educated. They have no interest in demolishing the walls of casteism. They don't feel it is shame on them to bear name of a caste in Independent Bharat.

All these so called leaders have no reason to be in power unless they demolish castes.

Anonymous said...

नुकत्याच घडलेल्या दंगलींना दलित विरुद्ध सवर्ण असा रंग जरी देण्यात येत असला तरी या सर्व प्रकारास फक्त आणि फक्त राजकारणच जबाबदार आहे. हा लढा एका समाजाने दुसऱ्या समाजा विरुद्ध नव्हता तर काही राजकारणी लोकांनी जाणिवपुर्वक राबवलेली योजनाच होती. उत्तर प्रदेशातील निवडणुका, महाराष्ट्र सरकारला (किंवा महाराष्ट्रालाच) बदनाम करण्याची योजना , राज्याची आर्थिक प्रगती सहन न झाल्याने करण्यात आलेला बनाव, यापैकी कुठलेही कारण या मागे असु शकते. वृत्तवाहीन्यांचा अत्यंत बेजाबदारपणा या प्रकरणाला चालना देणाराच ठरला, आणि अर्थात या वाहिन्यासुद्धा 'आशीर्वादा'वरच चालत असल्यामुळे त्या नामानिराळ्या होतील. भरडला गेला तो फक्त सामान्य माणुस...

Unknown said...

Dirty is Politics

जसे सुंदर कमळ कोमेजले,
व म्हाता-या धनुश्याचे बाण चुकले,
तसे नवे घड्याळ सरसावले,
व अशोकचक्राचे 'हात' धरले,

कै.बाळासाहेब भारदे म्हणायचे,
भारतात कम्युनिस्ट काढतात मोर्चा,
सोशालिस्ट करतात खूप चर्चा,
भारतीय जनता पक्ष करतात पूजाअर्चा,
कौंग्रेसजनांना सदैव हव्यात फ़क्त खुर्च्या,

एकेकाळचे खरे स्वातंत्रसैनिक लोपले,
दैनंदीन कटकटींनी दमून देशवासी झोपले,
आजचे स्वार्थी व मतलबी पुढारी हपापले,
म्हणू लागले देशी मालाची होळी करा,
सुंदर व टिकाऊ परदेशी मालच खरा,
आपल्या भारतीय रुपयाला किंमत नाही,
परदेशी अमेरिकन डॊलरला तोड नाही,

कोंग्रेसला हवा फ़क्त स्वपक्षविकास,
करजोरांवर सुबत्तेचा करतात आभास,
मध्यमवर्गीय/सवर्णांचा झपाट्याने होतोय -हास
रंजलेल्या गांजलेल्या गरिबांना नाही निवास,
श्रीमंत राहतात बंगल्यात झकास,
शेअरमार्केट निर्देशकांचा उत्तरेकडे प्रवास,
गोरगरीबांच्या पोटांत नाही एक घास,
छोटे कर्जबाजारी शेतकरी लावतात गळफ़ास,
सगळीकडे आम माणसाचे चेहेरे भकास,
असा आहे सगळाच काही विरोधाभास,

प्रधानमंत्री म्हणतात अल्पसंख्यकांचे लांगुलचालन करा,
अर्थमंत्री म्हणतात म्हाता-यांचे पेन्शन बन्द करा,
मवाळ गृहमंत्री म्हणतात दहशतवाद्यांचा छ्ळ न करा,
कृषीमंत्रीच म्हणतात अन्नधान्य आयात करा,
कुटुंबनियोजनमंत्रीच म्हणतात आणखी मुले पैदा करा,
अतिशहाणे रेल्वेमंत्री म्हणतात मला प्रधानमंत्री करा,

अपरिचीत खैरलांजीचे हत्याग्रस्त कुटुंब झाले अमर,
सुडभावनेने त्यांच्या जातबंधूंनी कसली कमर,
घटना लिहिणारे महान कै.डॊ.आंबेडकर होते अहिंसावादी दलित,
त्यांच्या धर्मांध अनुयायांनी आज घेतले हातांत कोलित,
क्षुल्लक कारणांवर सुटले समोर दिसेल ते जाळीत,
कारण त्यांना माहिती की आपले सरकार आहे मुळमुळीत,
निवडणुकांची काळजी लागलेले पुढारी झाले गर्भगळीत,
अनेक पार्ट्यांचे सरकारच आहे सदा डळमळीत,
त्यामुळे बेडर पोलिसखाते सुध्दा झाले भयभीत,

दूरदर्शनवाहिन्यांना द्यायच्या असतात सनसनाटी बातम्या,
त्यांना वाटते त्यामुळे शांत होईल वर गेलेल्यांचा आत्मा,

धूर्त देशभक्त कॊंग्रेसअध्यक्षांची त्यागमुर्ती,
करणार काय या जन्मी आपली स्वप्नपूर्ती?
हारवर्डशिक्षित खासदाराचा त्यांच्यावरचा तस्करीचा गंभीर आरोप,
बहुतेक व्यवस्थीत चिरीमिरी खाल्यावर शांत झाला त्याचा कोप,
त्यांचे चाहते,त्यांचे पक्षकर्ते नित्य चाटतात त्यांच्या पायदळीची धुळ,
ब्रिटिशांपासून परदेशी राज्यकर्त्यांच्या वागणुकीचे आहे त्यांना खूळ,
OBC आरक्षणासाठी थकलेल्या अर्जुनसिंगांच्या खांद्यावरून मारला बाण,
अल्पसंख्यकांच्या हितासाठी मोइलींच्या खांद्यावरून करणार शरसंधान,
सर्व अल्पसंख्यकांना सदैव घालत असते कै.नरसिंहरावांची युरियाखते,
धर्मनिरपेक्षतेच्या नांवाखाली हवीत कायमची त्यांची बहुमुल्य मतें,

कोणीहि पुढारी म्हणत नाहित घाला अमर्याद लोकसंख्येला आळा,
त्यांना हव्या असतात जास्तीतजास्त मतदारांच्या फ़ुलमाळा,
खाऊनपिऊन मस्त आहेत माननीय मंत्री,खासदार व आमदार,
सत्कारसमारंभात मिरवत त्यांना हवे असतात तुरे व फ़ुलांचे हार,
कितीहि क्षोभली तरी त्यांना माहित हे जनतेचे फ़ुसके बार,
अशक्यप्राय आहे त्यांना दाखवणे बाहेर जायचे दार,

पक्षांतरबंदीच्या कायद्यास ठेंगा करतात आयाराम,गयाराम,
सोईस्करपणे पक्ष सोडण्याच्या सवयीवर आहेत ते ठाम,
सर्वांनांच हवा देशाच्या नांवाखाली स्वतःच्या पिढ्यांचा विकास,
स्वर्गातून बघताहेत अचंबित नेहरु,पटेल,आंबेडकर व गांधी मोहनदास,
वाटतं त्यांना आपल्याला सुचली नाही धरायची यांच्यासारखी स्वविकासाची कास?

पूर्वजन्मीच्या पुढा-यांचे पुतळे आजच्यांना वाटतात खुजे,
म्हणून २०-२५ फ़ुट उंचीचे करतात स्वतःचे कट-आउट उभे,
सर्वांमते आजच्या पुढा-यांचे राजकारण झाले फ़ार गलिच्छ,
आर.के.लक्ष्मणांच्यामते म्हणून घालतात सदैव कपडे पांढरेस्वच्छ,

भारतीय प्रशासकीय सेवा(IAS)अधिकारी मुकाट्याने सहन करतात मंत्र्यांची शिरजोरी,
पोटापाण्यासाठी प्रामाणिक असले तरी स्विकारावी लागते लाचारी,
व चांगल्या पदांसाठी वा बदली टाळण्यासाठी ओढावीच लागते 'री',
निर्ढावलेल्या पुढा-यांचा भ्रष्ताचार लपवताना होते कधीकधी त्यांची भंबेरी,
त्यातले अप्रामाणिक तर निर्लज्जपणे भरत असतात आपलीपण तिजोरी,

संसदेवर हल्ला करताना अफ़झलला नाही खुपले,
त्याचे क्रुत्य नाही देशवासीयांना रुचले,
अफ़झलच्या कुटुंबात नाहित आणी कुणी कर्तीसवरती,
म्हणून देशाध्यक्षांची थबकली छोटी दयावान मुर्ती,
अफ़झलच्या फ़ाशीबाबत त्यांना नाही स्फ़ुर्ती,
फ़ाशीशिक्षा माफ़ करण्याची करावी कां पूण्यकृती?

पण हिंदुस्तानच्या देशप्रेमींना कोण विचारतो,
मतदानाची वेळ आली की बहुतांश मतदारराजा झोपतो,
चालूद्या असेच,देश आपलाच आहे,नशीब आपलेच आहे,
अमर्याद मनुष्यसंपत्ती(?)(लोकसंख्या!) आपलीच आहे,
वै-याची रात्रपण फ़ार दूर नाही आहे,
महासत्ता आपल्यालाच घाईघाईने व्हायचे आहे,

कॊंग्रेस पक्ष स्वतःला म्हणवतो धर्मनिरपेक्ष,
सत्तेसाठी "हाता" त धरतो प्रत्येक पक्ष अपक्ष,
पस्चिमी शेजा-याच्या वारंवार हल्ल्यांबाबत बिल्कुल नाही दक्ष,
पडणार शेजा-याच्या व देशांतर्गत लाडावलेल्यांच्या कारस्थानांना भक्ष,

साने गुरुजी,वीर सावरकर,लोकमान्य टिळकांचे नशीब चांगले,
खडतर जन व देशसेवेनंतर वेळेवर ते स्वर्गवासी झाले,
त्यांची शिकवण,त्यांचा त्याग,त्यांचे देशप्रेम आज कालबाह्य़ झाले,

महात्मा गांधी ब्रिटिशांना म्हणाले 'भारत सोडा',
कांही संधीसाधु पुढारी आणख्या आरक्षणासाठी खुणावतात 'भारत मोडा',

हे सर्व टाळायला खरी गरज आहे एका प्रामाणिक व निष्ठूर हुकुमशहाची,
पण तसे होण्याची मनोवृत्ती वा कुवत नाही आपल्या स्थलसेनेच्या सेनांनींची,

म्हणूनच प्रिय देशबंधूनो खुप पुढचा विचार करा,
जात आरक्षणसंधी नसलेल्या पूढ्च्या पिढीसाठी परदेशच बरा.

सुभाष भाटे

Anonymous said...

Congratulations Capt Bhate for giving a true picture of 'India Today' I didn't like the concluding line though. Armed forces should not be involved in this. No dictatorship. What we need is a 'YOGI', selfless, religious, intelligent, leader with foresight for at least 100 years. A person who believes in 'Bharat' as religion, 'Constitution of Bharat' as rules of religion, 'Laws of Bharat' as laws of religion, 'Laws as Science' as the only divine laws, Independence to every person for worship. A person who can tell people the truth and not offer impossible promises. A person strong enough to tell people to work hard and be disciplined. People in Bharat would surely call that person the God but he should be 'Yogi' like KRISHNA or Shivaji.