बीएनएचएस ः देशभरात 11 हजार गिधाडे
गिधाडेसंख्या घटत राहिल्यास भारतातील गिधाडे लवकरच नष्ट होण्याचा इशारा "बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) दिला आहे.
सरकारने उपाययोजना करूनही गिधाडे संपत चालली आहेत. दर वर्षी पन्नास टक्के या दराने गिधाडांच्या संख्येत घट होत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
""सध्या भारतात फक्त 11 हजार गिधाडे उरली आहेत. त्यांची संख्या लवकरच सहा हजारांवर येईल आणि अखेर हे पक्षी नष्ट होतील,'' असे "बीएनएचएस'चे संचालक अर्शद रहेमानी यांनी सांगितले.
आजारी जनावरांवर उपचारांसाठी वापरले जाणारे "डिक्लोफिनॅक' हे औषध गिधाडांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे. या औषधाच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे. या औषधाचा अंश असलेली मृत जनावरे खाल्ल्यामुळे गिधाडे मृत्युपंथाला लागल्याचे रहेमानी म्हणाले.
भारतीय उपखंडात गिधाडांच्या नऊ जाती सापडतात. त्यांतील "ओरिएंटल व्हाईट-रम्प्ड', "लॉंग बिल्ड' आणि "स्लेंडर बिल्ड' या तीन जातींची गिधाडांची संख्या 1990 पासून कमी होत चालली आहे. "बीएनएचएस'च्या पाहणीनुसार, 1992-2007 या काळात "ओरिएंटल व्हाईट-रम्प्ड' गिधाडांची संख्या 99.9 टक्क्यांनी, तर "लॉंग बिल्ड' आणि "स्लेंडर बिल्ड' गिधाडांची संख्या 96.8 टक्क्यांनी घटली आहे.
Showing posts with label bird. Show all posts
Showing posts with label bird. Show all posts
Friday, May 02, 2008
केवळ गिधाडेच काय, पण भारतातल्या वन्य जीव आणि पशुपक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी याची केवळ आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र, प्रत्यक्षात पाऊल काहीच उचलले जात नाही. त्यामुळे आकडेवारी जाहीर करण्याऐवजी धोरणनिश्चित करावी.
Subscribe to:
Posts (Atom)