Monday, December 01, 2008

लढाई जिंकली... पुढे?

ही लढाई म्हणजे आधी शरीर पोखरत असलेल्या रोगानं वर काढलेलं डोकं होतं. त्यानं डोकं वर काढल्यानंतर आय.सी.यू.मध्ये तीन दिवस औषधोपचार झाले आणि वर आलेलं डोकं छाटून टाकण्यात आलं. याचा अर्थ रोगी बरा झालेला नाही. मुळात हा रोग का झाला आणि यापुढे किती दिवस काळजी घ्यावी लागणार आहे, हे महत्त्वाचं. आता रोग दिसत नाही, म्हणून जल्लोष करण्यात अर्थ नाही. घरी आलेल्या रोग्याची नीट काळजी घेणं सगळ्यात आवश्‍यक असतं.

अभिजित थिटे

शनिवारी आपण लढाई जिंकली. आधीचे तीन दिवस टांगणीला लागलेला जीव सुखावला. ताज हॉटेलमधला शेवटचा अतिरेकी मारला गेला आणि आपण साऱ्यांनीच सुस्कारा सोडला. शनिवार सकाळपासून तणावलेलं वातावरण निवळलं. आपण सारेच मोकळे झालो... सिनेमाला जायला, गप्पा मारायला, मुक्तपणे फिरायला आणि अर्थातच राज्यकर्त्यांवर टीका करायला.

शनिवारी कशाला, शुक्रवारी रात्री टीव्हीवर नरिमन हाउस, ओबेरॉय हॉटेलची जी दृष्यं दाखवली जात होती, त्यावरून आपण तेव्हापासूनच जल्लोषी झाल्याचं दिसत होतंच की!

मुक्‍तपणे साजऱ्या करायच्या सुटीचे वेध शुक्रवारी लागले. शनिवारी सकाळी टीव्हीला चिकटलेले सगळे शेवटचा अतिरेकी मारला गेल्याच्या बातमीने मोकळे झाले आणि सुरू झाला जल्लोष...
हो जल्लोषच... अगदी रस्त्यावर उतरून गाणं-बजावणं नसेल; पण मनावरचा ताण हलका झालाच ना... आपण नेहमीच्या कार्यक्रमांना, विकएंडचे कार्यक्रम आखायला मोकळे झालो ना...

या दोन दिवसात, म्हणजे शनिवार आणि रविवारमध्ये या प्रकरणात दोषी कोण ही चर्चा अगदी जोमानं सुरू झाली. शिवराज पाटील, आर.आर. आबा, विलासराव, मनमोहनसिंग अगदी सगळ्या राज्यकर्त्यांवर आगपाखड करून झाली. कोणी हाच धागा भाजप सरकार ते थेट नेहरू आणि गांधीजींपर्यंतही नेला. यात सारेजण एक महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा गुन्हेगार विसरून गेले. विसरून गेले म्हणण्यापेक्षा हा गुन्हेगार आहे, हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. तो गुन्हेगार आहे, आपण सारे...
खोटं वाटतंय? पटत नाहीये? या घटनेची जबाबदारी आपल्यावरच कशी? लिहिणाऱ्याला वेड लागलंय... अशा काहीशा भावना उमटतील मनामध्ये; पण नीट विचार केला, आपणच केलेल्या विधानांची संगती लावली, तर सहजपणे लक्षात येईल, की हे खरं आहे. आपण एक एक मुद्दा विचारात घेऊ...

पहिला अगदी महत्त्वाचा मुद्दा राज्यकर्त्यांचा. आपले राज्यकर्ते नेभळट आहेत. ते कडक कारवाई करत नाहीत. त्यांना त्यांची "व्होट बॅंक' सुरक्षित ठेवायची आहे. मुद्दे चुकीचे आहेत का? तसं म्हणता येणार नाही; पण आपले राज्यकर्ते असे कसे, याचा आपण कधी विचार केला आहे का?

पटकन कोणावर तरी कारवाई करावी. चुकीचं वागणाऱ्याला अटकाव करावा, गुन्हेगाराला शासन करावं, एवढं स्वातंत्र्य आपणच दिलंय का त्यांना? आपण येताजाता किती नियम तोडतो, याचा आपणच विचार केलाय का कधी? आपण केलेली बेकायदा बांधकामं आपल्या डोळ्यावर आलीत कधी? ती तोडायला येणाऱ्यांवर दगडफेक आपणच करत असतो ना? आपण जेव्हा घर घेतो, तेव्हा आपला बिल्डर मनपामध्ये इमारतीचा नकाशा "पास' करून घेण्यासाठी पाठवतो. त्यामध्ये इमारतीतील सगळ्या सदनिकांचे नकाशे असतात. कोणती खोली कुठे असेल, भिंती कोठे आहेत, प्रत्येक खोली किती चौरस फुटांची आहे, बाल्कनी आहे का, टेरेस आहे का, या सर्वांची नोंद त्या नकाशावर असते. याचाच अर्थ त्यानंतर आपण घरात जे काही बदल करू, ते मनपाच्या परवानगीने केले पाहिजेत, त्याची नोंद मनपामध्ये असली पाहिजे.

आपण आपल्या घरात अंतर्गत सजावट केली, बाल्कनी आत घेतली, खिडकी मोठी केली... किंवा इतर काही छोटे मोठे बदल नक्की केले असतील. या प्रत्येक बदलासाठी किती जणांनी मनपाची परवानगी घेतली? किती जणांनी नकाशे सादर केले? ही चूक नाहीये का? हा गुन्हा नाहीये का? परवा त्या अतिरेक्‍यांना ताज हॉटेलची खडान्‌खडा माहिती होती. आपल्या लष्कराला ती नव्हती. त्यांनी हॉटेलचा नकाशा मागितला, तर तो मनपामध्ये नव्हता. समजा असता, तर आतील सारी परिस्थिती नकाशामध्ये दाखविल्यासारखीच असती? आपण अशी खात्री देऊ शकतो?

आपल्या रस्त्यांवर कोट्यवधी गाड्या फिरतात. त्या चालविणारे तुमच्याआमच्यासारखे कोट्यवधी नागरिक आहेत. किती जणांकडे गाड्या चालविण्याचे परवाने, गाड्यांची, गाडी रस्त्यावर आणण्यासाठी आवश्‍यक असणारी आवश्‍यक कागदपत्रे आहेत? मी इथं प्रमाणाविषयी बोलतोय. तुमच्या-माझ्याकडे लायसन्स आहे, इथं मुद्दा प्रमाणाचा आहे. पोलिसांना विचारलं, तर ते प्रमाण सांगतात. गाडी चालविण्याचे नियम आपण पाळतो? पोलिस असल्यानंतर सिग्नल व्यवस्थित का पाळले जातात? पोलिस नसताना सिग्नल चुकविण्यावर का भर असतो? गोष्टी अगदी साध्या आहेत. गाड्या किंवा इमारत, घर या गोष्टी उदाहरणासाठी घेतल्या आहेत. आपण सारे व्यवस्थित नियम पाळणारे असू, तर नियम तोडणारा सहजपणे लक्षात येईल ना?

व्होटबॅंकेचा मुद्दा सगळ्यात जास्त चर्चिला गेला. पण मुद्दा असा आहे, की या व्होट बॅंका तयार का होतात? जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या अस्मितांवर मते का मागितली जातात आणि तशी मागितल्यानंतर तो उमेदवार निवडून का येतो? मतदान किंवा आपली लोकशाही ही अस्मितांवर चालते का? आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असते का? आपल्या देशात सार्वजनिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्‍न आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये या विषयावर एक परिषदही झाली. बहुसंख्य खेड्यांमध्ये आजही संडास नाहीत. या प्रश्‍नावर एकही निवडणूक का लढली गेली नाही? शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक, रस्ते, गाड्यांची संख्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रश्‍नांमुळे आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मग हा महत्त्वाचा मुद्दा सोडून एखाद्या अस्मितेला हात का घातला जातो? आपण मत मागायला येणाऱ्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना जाब का विचारत नाही? त्यांना एखाद्या निवडणुकीत धडा का शिकवत नाही?

याचं कारण आपण मुळी मतदानालाच जात नाही. विचारी समाज मतदानापासून दूर राहणार असेल, तर या गोष्टी घडणारच. आपल्या देशाच्या सुदैवानं आणि मतदानाची आकडेवारी पाहता हा विचारी समाज बहुसंख्य आहेत. (त्यामुळे मतदानाची आकडेवारी नेहमी कमी असते...) या बहुसंख्यांनी असे प्रश्‍न विचारायला सुरवात केली आणि त्यानुसार मत द्यायला सुरवात केली, की राजकीय नेतृत्वाला विचार करावाच लागेल ना...

असे मुद्दे भरपूर आहेत. ताजमधील अतिरेक्‍यांपैकी दोघेजण तिथेच इंटर्नशिप करत होते म्हणे. याचाच अर्थ आधी ते कोणत्यातरी कॉलेजमध्ये शिकत होते. शिकताना कुठेतरी घर भाड्याने घेऊन राहात होते. कॉलेजात ऍडमिशन कशा प्रकारे मिळू शकते, हे आपल्याला नवं नाही. घर भाड्याने घेतल्यानंतर आपण किती चौकशी करतो, हे आपल्यालाच चांगलं माहीत आहे. आपण सुरक्षितता पाहतो की भाडं, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

एक चांगलं उदाहरण देतो. मी काही वर्षं गोव्यात होतो. तिथे ज्यांच्याकडे भाड्यानं राहात होतो, त्यांनी माझ्याकडून सुरवातीलाच एक फॉर्म भरून घेतला. तो फॉर्म पोलिसांनी दिला होता. त्यात माझी संपूर्ण माहिती, मी मुळचा कुठला ही माहिती, मूळच्या घराचा पत्ता, फोन, माझ्या मूळच्या घरात, म्हणजे पुण्यात आणखी कोण कोण राहतात, ते कुठे काम करतात, तिथले क्रमांक कोणते वगैरे साऱ्या गोष्टी त्यांनी नोंदून घेतल्या. नंतर मला पोलिस चौकीमध्ये जाऊन पोलिसांसमोर सह्या कराव्या लागल्या. पोलिसांनी मी नोकरी करत असलेल्या ठिकाणी आणि पुण्यामध्ये फोन करून, त्यांच्या पद्धतीनं चौकशी करून मी लिहून दिलेल्या गोष्टी खऱ्या असल्याची खात्री करून घेतली... हे असं इतर शहरांमध्ये का घडत नाही? मला गोव्याची पद्धत आवडली. मी तसं पोलिसांना सांगितलं, गोवा सोडताना त्यांना तसं पत्रही पाठवलं... आपण किमान एवढी चौकशी केली, पोलिसांना सहकार्य केलं, तर बरेच प्रश्‍न सुटतील, असं वाटत नाही का?

राहता राहिला मुद्दा सुरक्षिततेचा. हे अतिरेकी एकदम कसे घुसले हा... तर यात गुप्तहेर यंत्रणांचं अपयश आहे, हे मान्यच करायला हवं. तरीदेखील एक बोट आपल्याकडे वळतंच. साधं उदाहरण घेऊ. आपल्या इमारतीत किंवा कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी कडक पावलं उचलली. आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्यांची तपासणी करणं, नोंदी करणं सुरू केलं तर? माझ्या इमारतीत, घरात जाताना सिक्‍युरिटीनं माझी पिशवी, सॅक तपासायला सुरवात केली, तर मला चालेल? त्यात मी बिल्डिंगचा सेक्रेटरी असेल तर? जे तुम्हाला-मला चालत नाही, ते आपल्या आमदार-खासदारांना, मोठ्या अधिकाऱ्यांना चालेल?
मुद्दा फिरून फिरून तिथंच येतो. आपण अमेरिका, इंग्लंड, इस्राईलचं उदाहरण वारंवार देतो. तिथं कशी कडक सिक्‍युरिटी आहे, याचे गोडवे गातो. फक्त हे गात असताना तिथल्या नागरिकांविषयी विचार करायला विसरतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेनं हे युद्ध आहे, असं घोषित केलं. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी प्रशासनाला प्रचंड सहकार्य केलं. तिथला मीडियाही जबाबदारीनं वागला. तिथल्या हल्ल्यांची, त्यानंतर होणाऱ्या कारवाईची दृष्यं टीव्ही सिरिअलसारखी दाखविली गेली नाहीत. जे दाखविणं आवश्‍यक आहे तेवढंच, आणि जे सुरक्षिततेच्या दृष्टीनं, कारवाईच्या दृष्टीनं घातक आहे, ते दाखविणं कटाक्षानं टाळलं गेलं. मागे गोळीबार होत असताना तिथले नागरिक "मज्जा' बघण्यासाठी गर्दी करत नाहीत. टीव्हीच्या कॅमेरासमोर घुटमळून हात हलवत नाहीत...
आपण तिथल्या स्वच्छतेचं कौतुक करतो, तेव्हा ती स्वच्छता सामान्य नागरिकच राखत असतात, हे का विसरतो?

मुद्दा हाच आहे. आपण नागरिक शास्त्र शिकतो, आचरणात आणत नाही. त्यामुळेच घटना घडून गेली, की राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. निवडणून न येणारी, निवडणुकीत पडणारी मंडळी देशाची महत्त्वाची मंत्रिपदं भूषवू शकतात. एकही निवडणूक सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य अथवा वाहतूक या प्रश्‍नावर लढविली जात नाही. स्वस्त तांदूळ, गहू, टीव्ही अशा भूलथापांना आपण बळी पडतो....

थोडक्‍यात आत्ता रोगानं वर काढलेलं डोकं छाटलं गेलंय. खरी काळजी रुग्ण घरी आल्यानंतर घ्यायची असते. ती आपण घ्यायला हवी. सुजाण नागरिक हे फक्त नागरिक शास्त्रातील पुस्तकात नसतात. ते प्रत्यक्षातही असावे लागतात. आपण आत्तातरी तसे नाही, म्हणून आपली लोकशाही साठ वर्षांची झाली, तरही "मॅच्युअर' होऊ शकलेली नाही. मुंबईची घटना हा आपण वर्षानुवर्षे करत असलेल्या दुर्लक्षाचा परिपाक आहे. आतातरी आपण विचार करूया, पावलं उचलूया... आपल्या पुढच्या पिढीसाठीतरी हे करायलाच हवं...

आपण या लेखाशी सहमत आहात काय? किती विचारपूर्वक आपण मतदान करता. सुजाण नागरिकत्वाबाबत आपल्याला काय वाटते? आम्हाला नक्की लिहा.

12 comments:

Milind Warkhede said...

हा रोग ठीक होण्यासाठी रोगावर from the bottom उपचार करायला हवे यासाठी आपली मानसिकता अगोदर बदलायला हवी

Srkay said...
This comment has been removed by the author.
Srkay said...

rajkarnyanwar ata farsa wishwas thewu naye. apanach apla baghitla pahije. bhartachya peacefull image cha gairfayda ghetla jatoy. Ata akramak whaylach hawa

www.indiagunpoint.blogspot.com

Mrudula Tambe said...

Atishay abhyaspoorna lekh. Muddesud. Sadhya etakech lihit aahe, ek divas savakashine savistar pratisad dein.

Mumbai Kand ghadalyapasun susangat asa ha ekach lekh vatala.

Shrikant Atre said...

You are perhaps partially or fractionally right Abhiteet !

WE are to be blamed for everything you said BUT also for those things you have not said. Let me ponder at and take the readers to those directions !

WE are to be blamed for being ruled by outsiders. (Voting came of late just about 100 years AFTER British told us to elect). But perhaps we were better off under Chhatrapati Shivaji's rule or even under some Great Peshwa leaders of Pune. WE were also perhaps much better under Manu-Sanhita when each individual was told what to do as per his cast and creed. We did not have terrorists and this ROG then, was unheard of. Of late, not so back in 1850s, we were better off in fighting the British, Or in 1940s when the freedom movement was there, despite we had relative freedom to adjust with many new theories of a new industrialized world....!

Post the freedom and being a democratic republic with voting rights, we probably changed 'just because' of THIS voting system and slowly but surely we learned how to be corrupt and 'Chalata Hai' raj started. Who taught us that is immaterial now. But WE should not forget that stopping the wheel of corruption & lawlessness at grass-route level, is not only an impossible task but it is often suppressed by media and remains silent in books and blogs alike.

According to me, we will only change, when there is a THOUGHT Revolution. A thought process which revolutionizes and brings in effective overhaul or a complete system change ! Is this possible ? Yes, it is possible ! Anyone bench-marks today with others, other states, other countries and in future, perhaps other worlds.

Friends will agree that by taking resignations of political leaders and electing (due credits to you, voting by US included here) another few new men would simply not be able change the basics of corruption and lawlessness. I am (and most people are) deeply concerned that no matter how good a person you elect, he will have to either succumb to evil practices or be a part and parcel of those bad practices else he will have no option to perish. Or perhaps, there are not any more people left amongst us who can stand for election claiming we are right. People simply wont believe you and me alike if you or me stand for election with hard earned money.

So what could be done for a Great Overhaul as I said ?

Since this blog itself is a thought process sharing tool, let me state that we can at least start thinking (hope Sakal Media takes due cognizance and makes in public in print too) in a radically un-thought-of-manner.

I think, 'Change' in the way things run here can be described by following examples.
1. Change the Electoral System such that referendums are taken by people irrespective of whether s/he has a voting or ration card. People of India should have right to call back non-performing elected representatives.
2. Lets also think of Presidential Method over Prime Ministerial method for India.
3. Let us also think of only TWO political parties like USA.
4. Let us also think of Strict punishment for law offenders ! The crimes you mentioned included ! We can make a huge such list.
5. Let us also think of making anyone refusing to co-operate on socially just issues, accountable for social losses. RTI is one step and its a tall hill with hundred of steps YET to be taken.
6. Let us also eliminate state governments and think of India as a whole. Creation of States on language as religion was a big big mistake and a lot of creative energy is wasted in simply defending these states.
7. At the least the States can be there for some more years but there should not be any elected people, ministers, CMs etc. Removing that machinery and adding it under One Central Rule will eliminate Border issues amongst states.
8. Let us also eliminate Language issues, Religious issues, Cast Issues and declare All India is one only. Let us ensure that there is only one official religion of this country and that is HUMANITY and no other religion be recongnised here.

So, I think voting right and finding a JagoRe type root cause (though its right to some extent) is not sufficient call at the moment, for the simple reasons (like above) that your+our+mine 'voting' alone would again elect similar corrupt culprits (or if not corrupt and culprits now, lets say 'would-be-culprits') and thus this idea / this analysis of yours falls short of a deeper thought.

The thought to change, A CHANGE like what was never considered 'Possible in India' shall have to be discussed in forums like these and the media. Let there be thoughts flowing freely which may be TABOO, but I am sure, these very ideas, if supported by media properly and if it cherishes as a movement called 'wish-to-change-my-country', we will not be able to eliminate the ROG !

Sachin V said...

Hazaaro dekhate hai.......
Laakho sunate hai..
Lekin karta yanha koi kuch bhi nahi....

Shahido ko malaal hai ki,
unke khoon se ess jamin par kabhi kuch ugata kyu nai...??

captsubh said...

या लेखातले कांही परखड विचार जरी पटण्यासारखे असले तरी देशात होणा-या ब-याचशा वाईट घटनांसाठी फ़क्त सामान्य माणुस जबाबदार नसतो.भारतीय म्हणून आपल्यात कित्येक सुधारण्यासारखे दुर्गुण असतात हे मान्य आहे,पण आपल्या देशात दिसणा-या/अनुभवणा-या सर्व वाईट घटनांना सामान्य माणुस जबाबदार धरता येणार नाही! आपण लढाई जिंकलो हे पूर्णतः सत्य नाही! आपल्याला फ़क्त लुटुपुटुच्या लढाया लढण्याची संवय लागली आहे.१९७१ च्या युद्धात आपण विजयी झालो व त्यामुळे बांगला देश या स्वतंत्र देशाची पूर्व पाकिस्तानच्या जागी निर्मिती झाली.

पण पारंपारिक युद्धात यश मिळण्याची शक्यता कमी आहे हे ओळखून पाकिस्तानने त्यापुढे दहशतवाद्यांना प्रशिक्षण व सामुग्री देवून आपल्याच जमिनीवर छुपी युद्धे सुरू केली ती आजपर्यंत नियमितपणे चालत आहेत व त्यांची व्याप्ती फ़क्त जम्मु काश्मिरपर्यंत मर्यादित न रहाता ती आपल्या सर्व दूरदूरच्या ठिकाणांपर्यंत पोचली आहे.२०-२५ वर्षाची मुठभर मुले अधुनिक युद्धसामग्री घेवून येतात काय व सबंध मुंबई शहराला तब्बल ६९ तास वेठीस धरतात काय,त्यांचा नायनाट करायला सबंध मुंबईचे पोलिस खाते अपुरे पडल्यामुळे तब्बल ४५० NSG कमांडोना पाचारण करायला लागते काय,असे करतांना परदेशी नागरिकांसकट आपले नावाजलेले पोलिस आधिकारी व कर्मचारी व इतर अनेक नागरिक बळी पडतात काय,मिडियावाल्यांना उत येतो काय व अतिरेक्यांवर चढाई चालू असताना ते सर्व चित्रीकरण करतात काय,तसेच आपले नागरिक बघ्यांची भुमिका इतक्या उत्साहाने बजावतात काय व गरज असते तेव्हा मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत घटनेचे गांभीर्य विसरून उथळ विधाने करतात काय, देशाचे गृहमंत्री ही नेहेमीचीच घटना असल्यासारखे वागतात काय एकुण लाज वाटून शिसारी येण्याचाच प्रकार आहे!
सर्वात महत्वाचे म्हणजे मतांसाठीचे राजकरण ज्यात सकाळने लिहिल्यासारखे "राष्ट्रीयीकरण" पार विसरले आहे. आता या घटनांना सामान्य जनता कुठल्याहि शस्त्रांविना कशी प्रतिकार करू शकणार? सर्व वाईट गोष्टींचे खापर जनतेच्या डोक्यावरच कां फ़ुटते? या लेखात जरी खुपच अभ्यासपूर्वक मुद्दे लिहिले असले तरी त्यात राजकीय नेत्यांच्यावरचे आरोप/दोष थोडेफ़ार आपल्यावर ओढून घेण्याचा प्रयत्न दिसतो! मान्य आहे की सामान्य भारतीयाचे वर्तन बरेचदा चूकते,पण त्याच्या हातात सुधारणा करणे कितपत शक्य असते?

सुजाण नागरिक म्हणून माझ्यासारखे कित्येक आयुष्यभर व्यतीत करत आहेत,तसेच कित्येक वर्षे प्रत्येक मतदानाला आम्हीसुद्धा आवर्जून जात आहोत,पण सध्याच्या लोकशाहीत ठराविक लोक साम,दाम,दंड,भेद अशा निती वापरून तरीहि निवडून येतांना दिसतात, कारण शिकलेल्या अनुभवी व्यक्तींच्या मताला तेवढीच किंमत जेवढी अशिक्षित अडाणी व्यक्तींच्या मताला असते.मग एकगठठा मते मिळवण्यास अनेक गैर मार्ग अवलंबिले जातात गरीबांना प्रलोभने देवून,समाजात जातीजमातींच्या आधारे फ़ूट पाडून!

मुठभर हिंदू लोक देशासाठी प्रेरित होउन थोडा आक्रमक मार्ग स्विकारतात तर आकाश फ़ाटल्यासारखे राज्यकर्ते वागू लागतात व त्यांच्या वागण्या/बोलण्याद्वारे संदेश देतात की देशाच्या ८० कोटी हिंदूंचेच चूकत आहे,त्यांनी आयुष्यभर "षंढ"च राहून सर्व आघात सहन केले पाहिजेत! दहशतवादाचे मूळ कुठे आहे? इतक्या वर्षांचा अनुभव कुणाकडे बोट दाखवतो? मतपेटीसाठी ठराविक जातीचे सतत लांगुलचालन करून त्यांच्यापैकी मार्ग चूकलेल्या थोड्याफ़ार ख-या दहशतवाद्यांवर कारवाई सोडाच,तर सखोल चौकशीसुद्धा केली जात नाही जी गेल्या दोन महिन्यात १०-१२ हिंदूंची केली गेली! आता सरकार अनेक घोषणा करत आहे,पण संसदहल्ल्याकरता फ़ाशीशिक्षा झालेल्याला सुळावर कां चढवत नाही? ३ वर्षे यावर नुसता विचार चालू आहे? "षंढ" आहेत हे नेते! कृती शून्य व फ़क्त निवडणुकांकडे लक्ष ठेवून प्रत्येक हालचाल! गांधी परिवाराला हा देश आंदण दिला आहे कां? एकाहि कॉंग्रेस पुढा-याला जाब विचारायची हिंमत नाही? सबंध वर्षात फ़क्त ३५ दिवस संसदेचे अधिवेशन चालविल्यामुळे कृषीमंत्री व इतर मंत्री/आमदार सतत महाराष्ट्रात व इतर राज्यात पुष्कळ मार्गदर्शन करतात ते कशासाठी? दिल्लीला गेल्यावर यांची वाचा कशी बंद होते? हाय कमांड सतत राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सर्व छोट्यामोठ्यांना सतत पाचारण करते हे सर्व जनतेच्याच पैशाने ना? विलासराव,नारायणराव सतत दिल्लीच्या वा-या कां करतात? येथिल मुख्यमंत्री विधानसभेच्या सभासदांच्या मतदानातून निवडण्याच्या ऐवजी दिल्लीत कसा निवडला जातो? युद्ध,लढाया जिंकायला कणखरपणा लागतो,हिम्मत लागते,पण सर्व लक्ष फ़क्त मतपेट्यांकडे असल्यामुळे कुणाला आहे देशाचा विचार करायला? मग आहेच आम आदमी ठोकायला!

ज्या देशात पोलिस खाते धरून सर्व खात्यात "खाणे" सतत चालू आहे,जेथे पंतप्रधानांपासून कुठल्याहि मंत्र्याची "झेड सिक्युरिटी"च्या कवचाबाहेर रहायची तयारी नाही,ज्या देशात कित्येक गुंडच मंत्री,खासदार,आमदार कित्येक गुन्हे करतात,जेथे केरळचा मुख्यमंत्री वीरमरण आलेल्या कै.मेजर उन्नीकृष्णनच्या घरी उशिरा व तेसुद्धा पब्लिक प्रेशरमुळे जातो व त्याला भेटण्यास नकार दिल्यामुळे चिडून अतिशय मुर्ख विधान करतो तेथे आम आदमी काय करणार? दैनंदिनीच्या हजार कटकटींनी मेटाकुटीस आलेला हा कशा तर्हेने सरकारला मदत करणार? छीथू व्हायची परिस्थिती आली असून थोड्या प्याद्यांना हटविले व तात्पुरती मलमपट्टी व शूरतेच्या घोषणा केल्या म्हणजे झाले सर्व स्थिरस्थावर?

आपल्या गरीब देशात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे व सततच्या भितीमुळे किती हजारो कोटी रुपये वाया जातात याचा कांही हिशोब आहे कां? "झेड सिक्युरिटी"वर किती खर्च येतो? मुंबईवरच्या हल्ल्यात पूर्ण अर्थाने किती नुकसान झाले याच कांही हिशोब आहे कां? राष्ट्रपती परदेश दौरा अर्धवट सोडून मुंबईस भेट द्यायला आल्या त्यामुळे किती लाख रुपये व मुंबईच्या वाहतुकीचा किती बोजवारा झाला याचा कांही हिशोब आहे कां? राज्यकर्ते या ना त्या रूपाने कोट्यावधी रुपयांची उधळण सतत करत आहेत,पण पाकिस्तानला आक्रमणाद्वारा खंबीर उत्तर मात्र देवू शकत नाहीत! तो दे्श आपल्या कुठल्याच शाब्दिक धमक्यांकडे लक्षसुद्धा देत नाही तरी आपण भ्याडपणा सोडायचा नाही! ईस्रायलकडे बघा हा लहानसा तीन बाजूंनी कट्टर शत्रुंचा वेढा असलेला देश स्वतःचे संरक्षण किती धडाडीने व आत्मविश्वासाने करतो! त्यावर जराहि हल्ला झाला तर ताबडतोब त्याच भाषेत प्रत्युत्तर,मग भले त्यासाठी स्वतःची सरहद्द पार करावी लागली तरी!

काय उपयोग इतकी मिसाइलस वगैरे आपल्याकडे असून? लढाई जिंकली या विषयावर जरी श्री.अभिजित थिटेंनी सखोल लिखाण केले असले तरी त्यांनी केलेल्या ब-याच सुचना बिलकुल Practical वाटत नाहीत! घरात थोडे तुरळक फ़ेरफ़ार करण्यासाठी प्रत्येक वेळी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागली तर फ़ेरफ़ारांची किंमत व वेळ प्रचंड वाढेल! त्यांनी हेच प्रश्न राज्यकर्त्यांना का नाही विचारले? कोण मंत्री,खासदार वगैरे कोट्यावधी रुपयांच्या प्रोपर्टीस इतक्या सहजतेने घेतात काय,मोठाल्या वास्तु उभारतात काय,लगेच त्यांच्या परिसरात NO PARKING चे बोर्ड लागतात काय,पण त्यांना टार्गेट करायची कुणाला हिंमत आहे? त्यांच्यावर कशा कधी आयकर खात्याच्या धाडी पडत नाहीत?

उगाच सरहद्दीच्या संरक्षणाची तुलना सोसायटीमधल्या सुरक्षाव्यवस्थेशी करू नका! सर्वात मुर्दाड आहेत आपल्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते हे मान्य करा व त्यांच्यावर शरसंधान करा कारण त्याची गरज आहे! आम्ही सर्व वाहतुक नियम पाळतो तरी इतरांच्या चूकांचे खापर आम्ही स्विकारू शकत नाही!

Charity begins at home आणि पुढा-यांनीच आपले वर्तन बदलायला पाहिजे नाहीतर तो कितीहि मोठा असला तर त्याला फ़ेकून दिले पाहिजे मतपेटीद्वारा! सकाळनेसुद्धा आता यांच्या जाहिराती,यांचे लांगुलचालन थांबविले पाहिजे! माननीय,आदरणीय अशी संबोधने देणे थांबविले पाहिजे व वेळप्रसंगी कै.मेजर उन्नीकृष्णनच्या वडिलांनी जे धैर्य दाखविले ते सामान्य जनतेने दाखविले पाहिजे तरच हे राजकारणी गब्बरसिंग पृथ्वीतळावर उतरतील! देशाची पूर्ण वाट लावली आहे या लोभी,लबाड,मतलबी बोक्यांनी!
श्री.श्रीकांत अत्रे यांनी बराच विचार करून कांहे सुचना दिल्या आहेत त्यातील कांहींशी मीपण सहमत आहे!

Anonymous said...

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे

आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते. संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा घराघरातून तलवार उठली. औरंग्याला इथेच गाडेपर्यंत शांतता नव्हती. लालाजींच्या अंगावर यमदूतांच्या लाठया बरसल्या, तेव्हा इंग्रज साम्राज्याच्या शवपेटीवर खिळे ठोकणारे कैक मर्द निपजले... मग आत्ताच का सगळं शांत शांत? आमच्या श्रध्दास्थानांवर आघात होतात, आणि आम्हालाच सगळे म्हणतात 'शांत रहा, शांत रहा'. जाहीरपणे आम्हाला बांगडयाच भरायला सांगितले जाते. का?

आम्ही काय नेभळट आहोत का? की आम्ही दूधखुळे आहोत - उगी उगी हं बाळा, तुला नाय कोनी माल्लं, गप गप... असं म्हटलं की आम्ही गप्प! हाताची घडी तोंडावर बोट?

आम्ही जवान आहोत, मर्द आहोत... रक्तात शिवाजी सळसळतो आमच्या, 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' म्हणणारा भीम सळसळतो! आमच्या हातात भवानी आहे, पण डोळयावर पट्टी आहे. आम्हाला शत्रू कोण, हेच कळत नाही. गनिम कावा साधून जातो, आणि मग आम्ही मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे काढतो. असल्या भेदरट मेणबत्त्यांच्या उजेडात दुष्मन दिसत नाही. त्यासाठी डोक्यात उजेड पडावा लागतो आणि छाती निधडी असावी लागते. आमच्यात आणखी एक प्रकार आहे. राग आला की, आम्ही शेजार पाजारच्यांना ठोकून काढतो, दंगे करतो. खूप भुई थोपटतो पण साप मरत नाही.

मीडिया काहीही सांगतो, आणि आपण ऐकतो? कोणी म्हणतं इस्लामी अतिरेकी, तर कोणी म्हणतं दहशतवाद्याला धर्म नसतो... सुटका झालेल्या दोन तुर्की नागरिकांनी सांगितलं, की आम्हाला अतिरेक्यांनी आमचा धर्म विचारला, आम्ही मुसलमान म्हणून आम्हाला सोडले, सोबतच्या तीन आर्मेनियन ख्रिस्ती महिलांना ठार मारले. पकडलेला अतिरेकी सांगतो की, मी मदरशात शिकलो. आमचे गृहमंत्रालय म्हणते, की उत्तर सीमेवर मदरसे वेगाने वाढतायत... हे सगळं काय आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत. माझे मुसलमान मित्र-मैत्रिणी आहेत, ते अतिरेकी नाहीत. आमचे लाडके माजी राष्ट्रपती, आमचे गायक, संगीतकार, खेळाडू, परमवीरचक्र मिळवलेले शहीद सैनिक - हेही मुसलमान आहेत. पण ते जिहादी नाहीत... मग हा जिहाद काय आहे, मदरसे काय आहेत, या विषवल्लीचं मूळ कुठे आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत.

उत्तरं मागण्याचा अधिकार हे लोकशाहीतले पहिले हत्यार आहे. आहे ना खुमखुमी? मग उचला हे हत्यार!

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी इस्राएलच्या खेळाडूंची ऑलिंपिक मध्ये हत्या झाली होती. पुढच्या दोन वर्षात ही हत्या करणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढून इस्राएलच्या कमांडोंनी ठार मारले. दुसऱ्या महायुध्दात हजारो ज्यूंची हत्या करणाऱ्या ऍडोल्फ आइकमनला इस्राएलच्या हेरांनी परदेशातून शोधून उचलून आपल्या देशात आणला, त्याच्यावर खटला चालवला, आणि त्याला देहदंड दिला. टीचभर देश आहे इस्राएल. पण त्यांचा राष्ट्रीय स्वाभिमान जागा आहे. कोण आहेत त्यांचे नेते? आणि मग आमचेच असे कसे?

आम्ही मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो, किंवा आमची मतं विकतो, किंवा १८ पूर्ण झाली तर नावच नोंदवत नाही... मत देताना रस्ते आणि पाणी एवढेच मुद्दे दिसतात आम्हाला, मग निवडणूक पंचायतीची असो नाही तर लोकसभेची! लोकशाहीत प्रजेच्या लायकीवर किंवा नालायकीवर राजा ठरतो. आम्हाला स्वाभिमानी निडर नेतृत्त्व हवे असेल, तर जागरूक राहिले पाहिजे. आत्ताच्या नेत्यांमध्ये सगळेच बुणगे दिसत असतील, तर स्वत:च राजकारणात उतरले पाहिजे.

शांत रहा, शांत रहा... असं कोणीही सांगितलं तरी गप्प बसण्याची वेळ नाही आता. लोकशाहीतली हत्यारं उचलून लढलं पाहिजे. सूडाच्या अग्निकुंडात आपल्या अभिमानाची आहुती पडली आहे. संसदेवर हल्ला झाला आहे, ताजची राख झाली आहे... इतक्या आहुती देऊनही जर स्वाभिमानाची भवानी जागी होणार नसेल, तर आमचे राष्ट्र नष्टच होणार असेल.

शंभर शिशुपालांचे हजार अपराध भरलेत, जनतेतल्या जनार्दना - उठ!

Anonymous said...

उठ म्हणजे काय कर? निवडणुकीत मत देण्याशिवाय मला दुसरा काय अधिकार आहे? आपल्यातल्या काही देशप्रेमी बांधवांनी अभिनव भारत संघटना काढून देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोणत्याही धर्माविरूद्ध नाही तर देश वाचविण्यासाठी देशद्रोह्यांविरूद्ध अपरिहार्य पाऊल टाकले. पण आता त्यांनाच देशद्रोही ठरवले जात आहे. आपण सामान्य माणूस काही करू शकत नाही. संताप व्यक्त करतानापण सांभाळून व्यक्त करावा लागतो. नाहीतर पोलीस कोणते कलम लावतील याचा नेम नाही.

Anonymous said...

कुराण आनि हदीस/सुन्नाह (पैगंबर मोहम्मद यांचे चरित्र) यांची जाहिर चर्चा झाली पाहिजे, जशी भारतामध्ये मनुस्मृतीची चर्चा झाली आणि होते किंवा युरोप अमेरिकेमध्ये बायबल/येशू यांची झाली तशी. तेव्हाच हा इस्लामी जिहाद थोपवता येऊ शकेल.

Mihir said...

I read this blog, and comments from Mr. Shrikant Atre and Castubh
I rather agree with what the points mentioned in the blog itself. I personally feel its us whom we should blame for. Because no matter what the incident is ..... somehow or the other we are responsible for it. Though the points mentioned by Mr. Atre and Capstubh are also valid, they are practically either impossible or needs unity within ourselves. What points mentioned in your posts are obviously fall under 'HAS TO DO' category, but they are time consuming tasks.
When we say, we can not do anything when the CM or Dy.CM (or any ministry candidate for that metter) candidate is decided by one person ... so-called high-command, we forget to ask 'why' to these politicians. Its our responsibility. We forget our responsibility. Thats why WE need to change ourselves first.
When we say, we should also have only two political parties, we forget that WE have created these number pf parties. When one of us enters the politics hoping to get some 'seat', some 'position', no assurance about getting the one immediately. Its us, who allowed them to found new parties every other day. We did not ask why we need another party to these so-called leaders. Thats why WE need to change ourselves, our mindset first.
When we say about strict punishments for law-offenders, we forget we ourselves break the rules, offend the law many times. (I guess this is the base of this blog topic). Whom we should punish for. When we individual start to follow rules and law, then we dont have to punish anyone.
When we say eliminating state governments, there are so many issues. Tamilians are not even agreeing to have one common language. Forget about politicians and government. The common man, a lay-man also shows anti-hindi behaviour. So again it comes to us .... every individual to think this as one country. Declaring 'ONE-INDIA' is practically impossible task. Rather that is the essence of India. While back in freedom movement times also, there were states, there were religions, there were language differences. But still they all considered INDIA as one country. They faught for a nation. Bengalis, Gujjus, Marathis, Punjabis .. the list is huge ... but they faught as one. So I strongly oppose this idea of eliminating regional boundaries. That is the essence of India as country. But yes, there should be one religion - HUMANITY. And this can be done by individual improving his/her thoughts about a Religion. So again it comes to us ... each individual.
When we say Media has gone mad while telecasting live operation, we forget we have made them do that. Its not a one day process. It has came to this level gradually. They identified that if they show something 'San-sanati' people will stick to the Idiot Box for hours. Obviously they are there for business, making money. Nobody is doing it for charity. SO TRP is a vital factor for them. Now while doing it they forget about the ethics. Now they means whom? Again someone from us who works with the Media. They DO it because we LIKE it. When shooting live a major operation ... or capturing any important movement live, we people try to be in the camera. When any natural calamity strikes to india like earthquakes or floods or Tsunami, and the media reporter is having a live session with the local leader or something, the victims themselves try to be shown in the camera, wave hands, call friends, point fingers. When ..... when their relatives, friends are lying dead there. However, this time while the attacks on Mumbai, its us who complained against media. So we people are getting awake.
When these politicians have travel to different places, within or outside country, we dont ask them what are they going to do there ? What do they know about the seminar or the topic of discussion that is going to happen ? Whom is going to pay for their travel expenses ? Thats why we need to change ourselves to ask questions.
When any damn minister makes foolish statements, why did we not ask him to take their statements back ?
When any damn minister carries film director to see the massive distruction, why did we not ask him not to ?
When any damn minister refuses to take responsibility of such attacks why we did not ask him to ?
When any damn minister says such attacks are common for us, why did we not show him his level ?
When any damn minister uses ZED security fir himself, why did we not ask him who pays for it ?
We are not giving clean-chit to these so-called leaders, but we should change ourselves to ask questions to these LEADERS and not just satisfy by discussing issues within ourselves. We might change the leader ... but we can not change the leadership. It has to come from ourselves. We need more people like father of Unnikrishnan. He dared .... we dont. thats the difference. and thats why we need to change ourselves. Why should we have fear for Police and Leaders. If we are unite, nobody can do anything. But our mentality is that 'Shivaji dusarya gharat janmala pahije ... apalya nahi'. We are followers, why cant we be leaders for ourselves. THATS WHY WE NEED TO CHANGE OURSELVES.
These leaders behave this way, because we let them do that. Thats why we need to change ourselves first.
These leaders have not came from nowhere. They are one of us only. Thats why we need to change first. Thats why we need to have a group of this changed mind-set who thinks INDIA as a nation and not INDIA as a group of different states or regions. That why we need to change ourselves first, so that the nest time we can elect someone from this 'group' and will support him/her to be our leader. S/he will have a goal of better INDIA, and not better individual state, or ward or area or home or self. S/he will have a broader vision for INDIA and not for individual.
(I am sincerely sorry for I wanted to type this in Marathi ... but did not find how to.)

Anonymous said...

There are many illegal slum residents staying in baner PMC/pune police, take action soon. check building construction sites also.