Tuesday, November 25, 2008

भारत मंदीच्या जवळपासही नाही - अर्थमंत्र्यांचे स्पष्टिकरण

जागतिक आर्थिक संकटामुळे देशाच्या विकासाचा दर काही प्रमाणात खालावला असला, तरी भारतात मंदी आलेली नाही; भारत मंदीच्या जवळपासही नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज येथे स्पष्ट केले.
योग्य नियंत्रणासह खुले आर्थिक धोरण राबविल्यानेच भारताची आर्थिक स्थिती अन्य देशांपेक्षा भक्कम असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ""जर्मनी, जपान, ब्रिटन आदी देशांनी अधिकृतरित्या मंदी जाहीर केली आहे. अमेरिका आणि फ्रान्स ह देशही त्याच मार्गावर आहेत. सलग दोन आर्थिक तिमाहींत विकासदर नकारात्मक असेल, तर मंदी आली असे म्हटले जाते. भारतात नेमकी उलटी स्थिती आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर ७.९ टक्के होता. नंतरच्या तिमाहीतही तो याच घरात असेल. त्यामुळे भारतात मंदी नाही. यामुळे भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाने विकसित होत असलेली आर्थिक शक्ती आहे.''

भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना माध्यमांनीही "मंदी' हा शब्दप्रयोग करू नये, असे आवाहनही श्री. चिदंबरम यांनी केले. मात्र, बाह्य परिस्थिती बदलल्याने विकासदर कमी होत असल्याचे त्यांनी कबूल केले.

उत्पादन उद्योग, संदेश दळणवळण आदी क्षेत्राची वाढ मंदावल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. औद्योगिक उत्पादनाचा दर ४.९ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याबाबत ते म्हणाले, ""रुपया अधिक स्पर्धात्मक कसा होईल हे आम्ही पाहत आहोत. निर्यातदार आणि आयातदार या दोघांचेही समाधान होईल अशा प्रकारे रुपयाचे मूल्य असायला हवे. मात्र, सद्यःस्थितीत काही करू शकत नाही. परकी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यास परिणाम होईल.''

कृषी उत्पादनाच्या क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख श्री. चिदंबरम यांनी केला. ते म्हणाले, ""शेतीच्या बाबतीत २००५-०६ आणि २००६-०७ ही दोन वर्षे कठीण होती. आपल्याला गहू आयात करावा लागला. मात्र, गेल्या वर्षापासून चित्र बदलले आहे. गहू आणि तांदळाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत. ज्वारी, मका, डाळी, तेलबिया या सर्वांच्या बाबतीत उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किंमतीतही चांगली वाढ केली आहे.''

----------------------------

"श्रेय आम्हालाच!'
सध्याच्या आर्थिक अरिष्टातही भारताची स्थिती भक्कम असल्याचे श्रेयही "यूपीए' सरकारलाच द्यायला हवे, असे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत कमी होत असताना भारतात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर का कमी झालेले नाहीत. या प्रश्‍नाला, हा पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारितील प्रश्‍न असल्याचे सांगून त्यांनी बगल दिली.

आपल्यालाही असेच वाटते का, आर्थिक आरिष्ट्यातही भारताची स्थिती उत्तम असण्याचे श्रेय यूपीए सरकारला जाते? तुम्हाला सरकारला अभिनंदन करावेसे वाटते का?

4 comments:

Anonymous said...

I wonder if PC is a real Economist or is he speaking under a politician's disguise. When he met Assocham members and industry leaders like Auto Industry / Promoters / Builders, he asked them to reduce rates of Automobiles and houses. The fact is it has not reduced. Now he must have been pinched by higher ups not to talk facts of life as it will spoil is party's 4 years image in upcoming elections (some ongoing as well).

Murali Deora spoke last month that Fuel prices will be brought down if Oil hits below 65 $ a barrel. Now its 51 $ and he is mum like a mummy. May be Sonia Mummy did not allow him to do that and kept it as a 'reserve policy' for election.

Sonia Gandhi herself said a week ago that it was Indira's vision that saved our banks as they were nationalized in 1969. What a joke ? It was her vision and this very Manmohan Singh who had to go with a Katora to IMF and WB in 1991 and then came in existence the jargens (which are taught in MBA / Economy courses these days) like MeP, LPG etc. India did not even have 17 days of food grain stock with it. As regards Indian National Banks, its a horrific experience to bank with most of them. They need to act fast and serve better if they want to stay competitive as one day this very government will have to kill Indira's Vision.

So we will hear more jokes from all jokers who are in power now. Fact of life is cost-once-raised things will remain costly-for-ever and no one in power can change it.

Matter of fact is, if anyone contradicts like PC/Deora/Sonia, we must alarm our friends and all that elections are close. Thorny issues will be hidden under roses.

God save this country from such politicians !

- SA

sachuindia said...

Sachin.

I really don't know why people blaming for both side. Nearly 2 month age when Rupee price is increasing against the dollar, people blaming government that Govt. should do something for the IT sector and all the peoples directly/indirectly related with the same. Now rupee prices are down against the dollar and now people again blames Govt that they are do’g nothing. Itz really a joke. It's all because of Dirty politics.
The other thing is that media should be positive in this situation. I remember an article in the newspaper showing how newspapers are involved in the growing of a nation. In Iraq, bomb blast is not news. People are used to it. But one thing author has noticed, newspaper had printed that news in 4-5th page and the front page was showing the snap of spring. People should get something inspiration to live.

yogesh ....Maze Satyache Prayog said...

It is sings just nonsense and completely Political statement! I do respect manmohan but he is bound by dirty politics. he knows he is lying. UPA Govt with old style ministers is the most inefficient Govt of the world

captsubh said...

सध्याचे केंद्रातील राज्यकर्ते सर्वांच्या डोळ्यात सातत्याने धूळफ़ेक करत आहेत.
ज्या अर्थमंत्र्याने आम जनतेवरचे कर प्रचंड वाढविले आहेत तोच आता निर्लज्जपणे भावी निवडणुकांवर लक्ष ठेवून देशाच्या आर्थिक स्थितीचे गोडवे गात आहे!
याच मंत्र्याचे भविष्य निर्वाह निधीवर मिळणा-या व्याजालापण आयकराच्या जाळ्यात आणण्याचा बेत होता,पण अनेक राज्यात एकामागून एक निवडणुका हरल्यामुळे तो बारगळला!
या मंत्र्याला आम आदमीच्या बाजारापेक्षा शेअरबाजारातील चढउताराची मात्र फ़ार काळजी असते !
याच्या कुठल्याहि वक्तव्यात "अर्थ" नसल्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची बिलकुल गरज नाही ! पेट्रोलडिझेलच्या किंमती कमी करू असे म्हणून कित्येक आठवडे गेले तरी किंमती स्थगित त्या उच्च पातळ्यांवरच! अमेरिकेत प्रती गलन ४ डॉलरपर्यंत गेलेल्या किंमती त्वरित दिड [१ १/२]
डॉलरवर खाली आल्या,अपण आम आदमीचे सरकार मात्र निवडणुका जवळ आल्यावरच थोडीशी किंमत कमी करणार!
यांना फ़क्त सर्व गोष्टीत श्रेय हवे आहे ज्यायोगे हे पुन्हा निवडून यावेत व त्यानंतर जनतेची लूटमार चालूच ठेवू शकतील! लाजा सोडल्या आहेत यांनी!