Sunday, November 02, 2008

राणे, भुजबळांच्या भूमिकेमुळे मराठी "राज'कारणाला दिलासा

बिहारची आजची अवस्था अशी का झाली, याबद्दल रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार आणि केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मगच महाराष्ट्राविषयी बोलावे,'' असा टोला महसूलमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी लगावला.
राणे म्हणाले, ""राज ठाकरे यांचे आंदोलन हिंसक दिशेने गेले, ही बाब अयोग्यच आहे. मात्र, त्या आंदोलनाचा विषय महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या आंदोलनाच्या काळात काही जणांचे बळी गेले, ही बाब अयोग्यच आहे. मात्र, हा मुद्दा घेऊन उत्तरेतील नेत्यांनी ज्या पद्धतीने उठाव केला, ते योग्य नाही. त्यांनी आधी आपल्या राज्यातील परिस्थितीबद्दल आत्मपरीक्षण करावे आणि मगच महाराष्ट्राविषयी बोलावे. रेल्वेमध्ये ५४ हजार जागा असतील आणि त्यापैकी फक्त ५४ जागा महाराष्ट्रातील मुलांच्या वाट्यास येत असतील, तर काय होईल. अशी परिस्थिती बिहारमध्ये आली, तर बिहारवाले ती सहन करतील का? मराठी माणूस फक्त त्याचा हक्क मागत आहे.''महाराष्ट्रीय माणसाला मंत्री करून दाखवा!
महाराष्ट्राने आजवर सर्व राज्यांमधील नागरिकांना प्रेमाने सामावून घेतले आहे. अन्य राज्यांमधील समाजाचे नेते महाराष्ट्रात मंत्री आहेत. असे अन्य राज्यांत होऊ शकेल काय, असा प्रश्‍न राणे यांनी विचारला. नीतिशकुमार यांनी एकातरी महाराष्ट्रीय माणसाला मंत्री करून दाखवावे आणि मगच राष्ट्रीय एकात्मतेबद्दल बोलावे, असा टोला राणे यांनी लगावला.

""राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा हिंसक मार्ग अयोग्यच आहे. मात्र, अशा प्रकारच्या आंदोलनाच्या मुळाशी जाऊन त्याची कारणे तपासणे आवश्‍यक आहे.
मराठी मुलांवर अन्याय होतो आहे, असे कुणी म्हणत असेल, तर तेही सरकारने तपासून पाहिले पाहिजे,'' असे मत राज्याचे बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

ते म्हणाले, " परीक्षेसाठी आलेल्या मुलांना मारहाण करण्याऐवजी त्यांना परीक्षेसाठी बोलाविणारे रेल्वे बोर्ड किंवा रेल्वे मंत्रालयावर दबाव आणण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. पूर्वी शिवसेनेच्या लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अशी आंदोलने करून प्रश्‍न सोडविण्यात आले आहेत.''


""महाराष्ट्रातील एस. एम. जोशी, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस या नेत्यांनी बिहारमध्ये राजकारण-समाजकारण केले आहे. लालूप्रसाद यादव, नीतिशकुमार हे त्यांचेच चेले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र आणि बिहार म्हणजे जणू हिंदुस्तान-पाकिस्तान असे चित्र निर्माण करण्यात येत आहे, ते ताबडतोब थांबले पाहिजे.''

आता कुठे आपले मराठी नेते बोलू लागले आहेत. राज ठाकरेंच्या आंदोलनाची पद्धत चुकीची असली, तरी मराठी माणसावर अन्याय होतो आहे, हे त्यांच्या लक्षात येतेय, हेही नसे थोडके. अशाप्रकारे सर्वच मराठी नेत्यांनी राजभिमूक भूमिका घ्यावी असे वाटते का?

6 comments:

captsubh said...

राणे व भुजबळ या दोन्ही बिलकुल विश्वास ठेवू नयेत अशा व्यक्ती आहेत.शिवसेनेचे बाळकडू पिउन मोठ्या झालेल्या या दोघांनी गद्दारपणे संधी मिळताच शिवसेनेचा त्याग केला व अनुक्रमे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गाजावाजाने प्रवेश केला!
सध्या या दोन्ही ठिकाणी कुचंबणा होत असल्यामुळे त्यांची "इकडे आड,तिकडे विहिर" अशी परिस्थिती झालेली आहे व यामुळेच, तसेच एका निनावी व्यक्तीने याआधीच्या रामविलास पासवानवर पुणे प्रतिबिंबमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करतांना "कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे" याची सत्यता ओळखून एकदम मराठी माणसांची कड घेणारी भुमिका जाहिर केली आहे! कदाचित पुन्हा पक्षबदल करण्याच्या मानसिकतेची ही नांदीपण असू शकेल!

बाकीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लाचार व भ्याड नेते[आबा सोडून!] (काय करणार ते बिचारे पक्षाध्यक्षेच्या संमतीशिवाय "ब्र" सुद्धा काढू शकत नाहीत)सध्याची मौनव्रताची आपली भुमिका निवडणुका जाहिर झाल्यावर परिस्थितीप्रमाणे व गरजेप्रमाणे हाय कमांडच्या संमतीने बदलतीलच हे सुर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे!

सकाळ मात्र याच विषयावर बरेच दिवस अडकून रहाणार हे आणखी स्पष्ट होत चालले आहे!
Miss Vaishali Bhute,
आपण सकाळ व्यवस्थापनाच्या वतीने हाच मुळ मुद्दा निरनिराळ्या "हेडिंग" खाली विषय देवून पुन्हापुन्हा वाचकांच्याकडून प्रतिक्रिया मागवत आहात यात आपली कांहीच चूक नाही,पण आधीच्या विषयावरच्या प्रतिक्रिया नीट समजून घेवून थोडे परिवर्तन करून Burning topics of the DAY मध्ये इतर विषय द्याल अशी आशा करत आहे!

Ajit said...

All of here read everybodys thoughts. Please spare some time and read what Pu.La.Deshpande, had written in an article संकुचित प्रांतीयतेचे धोके!

http://www.puladeshpande.net/spd.php

संकुचित प्रांतीयतेचे धोके !

... जिथं एक देश म्हणून मानला तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणीही कुणालाही परका नाही. शेवटी परका म्हणजे तरी कोण? माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो! इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका! कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्मांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नाेकरीधंदा ह्मांत प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील? माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते. लोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं आहे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय? कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं! माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आहे.

या जगात सगळयांना नीट जगायला मिळावं, यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य! स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात! सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की! हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा! तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता, प्रांतीयता ह्मांचे धोके कुठले कुठले आहेत, याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे!


जय हिंद... जय महाराष्ट्र...

Shrikant Atre said...

Our Maharashtrian Political leaders will slowly but surely understand the main issues behind the sudden rise of RAJ and MNS and try to say what they want. Just today TOI published the news that Laloo Yadav has given a call to all his party MPs and MLAs to resign. So he wants to raise the pressure on Marathi people in general. So probably that is the reason that ruling INC and NCP leaders will take side of Marathi Manoos to show some unity on the just cause. Let their reasons be with them (best known to them only).

What media like Sakal has to do and what Aam Admi like us has to do is following.
1. For Media - Laloo and all UP-Biharis are very proud of their officers (IAS, IPS, MPSC, etc) and their so called talent. WE should have a sting operation tirade against ALL of them to find out how many have GROWN after coming to Maharashtra and if they are found corrupt, we should send them BACK to where they belong. Like someone suggested earlier, I wonder why cant Sakal and its SAAM TV guys run these sting operations one by one. Come on guys, we all know (though we cant say 100% here) that anyone who comes here, earns a lot through corruption only. Go to IT Office, Go to Railways Office, Go to any State Govt and Central Govt office, but guys please start doing something. The fight against corruption is not only Mr. Anna Hazare's fight. I want to ask Sakal, what has it done in last 10 years to expose these people ? Let there be one expose every day and people will be convinced about you.

2. For Aam Aadami (Us) - Why only the so called intellectuals. I will tell you what I have started to do myself. For example only, I have started to talk with my Paanwala Bhaiya in Marathi now. He initially protested and said "Saab Hindi me boliye..." I said "Hamko Hindi Nahi aati. Tu Marathi shikun ghe lavakar..." He smiled and there are always bystander Marathis who see this almost daily interesting dialogue. In just less than 1 week, this Bhayya has started talking broken Marathi with me. I like him. I dont want him to go back to UP or Bihar as he has learnt what it takes to be close to a Marathi person.

3. If you see any news on any media and any blog which is hurting the sentiments of WE the Marathi people, dont think of any single political party here, be the first to raise your voice. Use civilian methods is what I say here.

Anonymous said...

KEEP IN MIND, THE ENGLISH MEDIA AND NORTH - HINDI MEDIA IS ANTI-MAHARASHTRIAN, ANTI MARATHI.

NDTV, CNN-IBN and FREE CHANNELS WITH WESTERN MONEY AND WESTERN IDIOLOGY IS ALL SET TO RUIN MARATHI AND MAHARASHTRA.

Anonymous said...

All OBC's whether from North or south should understand this politics & vote accordingly.

Arjun Singh (A Massiah of OBC),Mayawati, Bhujbal, Shushilkumar shinde,shri Mungekar are our real wellwishers.

Anonymous said...

I read Sakal today and when its said that the RTI act does not apply to IAS IPS people's personally (amassed) immense wealth (obviously through corrupt practices) I agree to one commenter above that Sakal must do some-sting-thing now, to find out who are corrupt and who are not ! Mera Bharat Mahan !!