Wednesday, September 24, 2008

खैरलांजी हत्याकांड प्रकरणी सहा जणांना फाशी, दोघांना जन्मठेप

संपूर्ण राज्यात खळबळ माजविणाऱ्या खैरलांजी हत्याकांड प्रकरणी बुधवारी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणी प्रथम तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ आरोपींपैकी सहा जणांना फाशीची, तर दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आरोपींपैकी सक्रू महागू बिंजेवार (४९), शत्रुघ्न इशाराम धांडे (३०), विश्‍वनाथ हगरू धांडे (५७), रामू मंगरू धांडे (३४), जगदीश रतन मंडलेकर (४२), प्रभाकर जसवंत मंडलेकर (२५) यांना फाशीची, तर गोपाल सक्रू बिंजेवार (वय २५), , शिशुपाल विश्‍वनाथ धांडे (२२) यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. २९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजीमधील भोतमांगे कुटुंबातील चार जणांची गावकऱ्यांनी निघृण हत्या केली होती.

या हत्याकांड प्रकरणी सुरवातीला ४७ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र, त्यांतील ३६ जणांची "सीबीआय'ने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर उरलेल्या अकरा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. १५ सप्टेंबर २००८ ला ११ आरोपींपैकी तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

महिपाल अंतू धांडे (वय ४०), धनराज इशाराम धांडे (२७) आणि पुरुषोत्तम तितिरमारे (४३) अशी त्यांची नावे आहेत. या खटल्यामध्ये बचाव पक्षातर्फे ऍड. सुबोध जयस्वाल आणि ऍड. नीरज खांदेवाले यांनी तर सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्जवल निकम यांनी कामकाज पाहिले.

खैरलांजी प्रकरणात आरोपींना झालेली शिक्षा आपल्याला योग्य वाटते का? या शिक्षेमुळे दलितांवर होणारा अत्याचार थांबेल, असं आपल्याला वाटतं का? आपलं मत ब्लॉगवर नोंदवायला विसरू नका...

10 comments:

Abhi said...

Peral tase ugawel. Evadhya shikshe mule samzatil dusyra gunhegaraana sandesh jaain.

Anonymous said...

yes,though not stoped,but definitely will decrese.we r same that we live in 21st century.the court decesion is well

Anonymous said...

s,well done by court

Unknown said...

फ़ाशीची शिक्षा योग्यच आहे,फ़क्त तिची अंमलबजावणी होणार कां हा प्रश्न पडतो कारण अफ़झल गुरू धरून अशा अनेकांच्या शिक्षा वर्षांपासून स्थगित आहेत कारण आपले गृहमंत्रालय व विधीमंत्रालय यावर अंतिम निर्णयच घेत नाही!

जन्मठेपेच्या शिक्षा योग्य म्हणाव्यात तर त्यामुळे सरकार अशा गंभीर अपराध्यांना [व फ़ाशीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना] कायमचे पोसत रहाते!

तरीहि गुन्ह्याचे गंभीर स्वरूप बघतांना दिलेल्या शिक्षा योग्य व इतरांना जरब बसविणा-या वाटतात!

केवळ दलितांच्यावरच नव्हे तर इतरांच्यावरचे अत्याचार यामुळे थांबतीलच याची शाश्वती नाही, कारण आपल्या देशात दहशतवाद्यांपासून दरोडेखोरांपर्यंत सर्वानाच रान मोकळे आहे आपल्या कमकुवत केंद्र सरकारच्या घाबरटपणामुळे!!!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

शिक्षा योग्यच आहेत. वरिष्ठ कोर्टात त्या कायम राहतीलच याची शाश्वति नाही. तोपर्यंत किती वेळ जाईल हेहि सांगता येणार नाही. जामिनावर सोडून दिले तर शिक्षा होऊनहि परिणाम शून्यच! इतरांवर वचक बसण्याची मुळीच खात्री नाही. तरीहि कठोर शिक्षा दिली गेली हे योग्यच झाले.

Anonymous said...

अतिशय योग्य शिक्षा आहे...सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हावी आहे. भोतमांगे परिवाराचे नुकसान हे कधीही न भरून निघनारे आहे. तरीही अशा शिक्षेने समाजात जनासमजाला कायद्याचा धाक राहिल जे अतिशय गरजेचे आहे. आरोपींना झालेली शिक्षा अतिशय योग्य आहे फ़क्त तिची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे ही अपेक्षा.

Anonymous said...

The court has taken the right decision,but what about the others who were released as innocent?I think the proper investigation should be done & none of the accused should be released.
But the burning question is still there! Why such cases should happen ? When this is going to end ? Do we always have to go to such extent to get our rights to live as human being? I think first we have to change our mentality. Every minute there are thousands & thousands of such atrocities happen in one way or the other which are unproven or suppressed.What about such cases ? When & When this is going to stop ? It's been 52 years since Dr.Babasaheb Ambedkar has given us such a wonderful Buddha Dhamma which teaches equality,non-violence and peace.I think by following the principles only this land can be truly free.

Unknown said...

Court has taken right decision...
I think the criminals have understood what type of crime they have done.This decision will make others to think hundred times before doing such type of crime.
(Surendra Shewale)

Anonymous said...

HOY NISCHITTACH DALITTANVAR HONARE ATTYACHAR YAPUDE KAMEE HOTIL ,YA PASUN SAWARNA DHAADA GHETIL. KORTACHA NEERNAYA MULE NYAY DEVATA KHAROKHAR JIVANT AHE, ASE WATATE MATRA TYA SATHI KEVAL COARTACHA NIRNAYACH KAY? TABADTOB AMMALBAJAWANI HAVI.ASHYA
NARADHMMANA JAGNYACHA ADHIKAR NAHI

Anonymous said...

hee ghatanaa Dalit viruddha Savarn asaa maanu naye.Nyaayaalayaane suddhaa tase mhatale aahe. Mag media waale tyaalaa tase roop kaa det aahet? Tyaamule Hindu samaajaatil dari waadhat aahe. Dalit baandhavaanni tyaalaa balee padu naye. Aaropinnaa shikshaa hone apekshitach hote aani te jyaa tatparatene zaale te suddhaa abhinandaniya aahe.