Friday, September 19, 2008

"पाट्यां'पलीकडील अस्मिता

"मनसे'चे नेते राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्‌द्‌यावरून छेडलेले आंदोलन अमिताभ बच्चन यांच्या माफीनाम्यानंतर मागे घेतले. दरम्यानच्या काळात पुणे- मुंबईतील दुकानदार आणि आस्थापना यांनी आपल्या पाट्यांचे मराठीकरण केले. त्यामुळे किंवा जया बच्चन यांनी मागितलेल्या माफीमुळे "मराठीची अस्मिता' कदाचित जागी होईल; परंतु मराठीचे जतन आणि संवर्धन मात्र होणार नाही. भाषेचे राजकारण करणे तसे सोपे असते.

एकीकडे भाषिक अज्ञान आणि दुसरीकडे भाषिक दुरभिमान यांच्या कोंडीत सापडलेल्यांनी थोडा गांभीर्याने विचार करण्याची म्हणूनच आज गरज वाटते. भाषा हे समाजाच्या विविध घटकांना, वेगवेगळ्या स्तरांना जोडणारे साधन असले पाहिजे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील समाजाचे संघटन भाषेच्या आधारेच घडत असते. भाषिक संस्कृतीच हे कार्य करीत असते. त्यासाठी समाजजीवनाची व लोकव्यवहाराची जी विविध अंगे आहेत, तेथे कटाक्षाने स्वभाषेचा वापर व्हावयास हवा.

लोकमान्य म्हणतात त्याप्रमाणे सामाजिक विचार आणि व्यवहार यात मराठीचा आग्रहपूर्वक वापर केला तर मराठी भाषाही टिकेल आणि त्यायोगे मराठीभाषकांची संस्कृतीही! इंग्रजी माध्यमाच्या सर्व स्तरांतून होत असलेला जाणीवपूर्वक स्वीकार हा अपरिहार्य असला तरी त्यामुळे निजभाषेचे महत्त्व कमी होत नाही. शिक्षण, रोजगार, अर्थार्जन, व्यापार, उद्योग या निमित्ताने परप्रांतातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आणि त्यातून मराठी-अमराठीचे वाद अधूनमधून डोके वर काढत राहणार आणि भाषिक संस्कृतींचे संघर्षाचे प्रसंगही निर्माण होणार! तूर्त इंग्रजीच्या आक्रमणापेक्षा मराठीपण टिकविण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

आपल्या काय वाटते? मराठीची अस्तिता टिकविण्यासाठी काय केले पाहिजे. त्यात शासनाने कोणती भूमिका पार पाडली पाहिजे.

2 comments:

Unknown said...

थोड्याफ़ार ब्लोगवाचकांना काय वाटते हे त्यांच्या प्रतिक्रिया येथे मागवून कांहीहि साध्य होणार नाही!

महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्यकर्त्या नेत्यांनी त्यांचा conscience केव्हाच विकून टाकल्यामुळे व परप्रांतीयांचे प्रचंड आक्रमण सहन केल्यामुळे मुंबईपुण्यात मराठी लोक अल्पसंख्येत आले आहेत व सगळ्या परप्रांतीयांची अरेरावी,आडमुठेपणा,फ़क्त इंग्रजीच नव्हे तर हिंदी भाषेचे आक्रमण हे रोजच अनुभवताहेत!

कांही अपवाद वगळता सरकारी मोठ्या पोस्टच्या खुर्च्यांवर फ़क्त परप्रांतीयच बसले आहेत!
कोंग्रेस/NCP चे मराठी नेते मात्र पायात शेपुट घालून असहाय्यतेने हा सर्व प्रकार सदा सहन करत आहेत!

महाराष्ट्राच्या हिताचे स्वतःचे निर्णय घ्यायची क्षमता गमावून बसल्यामुळे यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व निर्णयांसाठी दिल्लीकडे लाचारीने बघावे लागत किंवा धावावे लागत आहे!
इथले नपुसकलिंगी शासन डोसक्याचे काय करणार?

फ़ारतर राजच्या प्रत्येक शब्दावर बंदीची केविलवाणी मागणी करत रहाणार!
तो कोणी फ़ार मोठा नेता नसूनहि त्याच्या प्रत्येक कृतीची दखल घेत आहेत, कारण दिल्ली दरबारात स्वतःची प्रतिमा परदेशी मडमेच्या/परप्रांतीयांच्या डोळ्यात आवडावी अशी ठेवायची आहे!

वारे वा,हाच का छत्रपती शिवाजी महाराजांचा देश???
सत्ता व पैसा यासाठी मराठी भाषेचा आत्मसन्मान विकून हे आत्मसमर्पणच करत आहेत!!!

देशभक्त RSS व VHP वर बंदी घालायच्या मागणीलासुद्धा हे सर्व अतिशय खोटे धर्मनिरपेक्ष व संधीसाधु नेते उचलून धरायला तयार आहेत!!!

Anonymous said...

It appears that for last > 2 weeks,"SAKAL" & PUNE PRATIBIMB are stuck only on Marathi अस्मिता and few insignificant issues, when there are many other important issues like unilateral,unjustified & ridiculous 300% increase in the President,Vice President & governors' salaries by the government,when these persons occupying high offices enjoy everything FREE,live in colonial mansions having hundreds of rooms & have a retinue of several servants at their beck & call & enjoy EVERYTHING FREE.

When it comes to salaries of the armed forces & other services,they are given a pittance in comparison after so much haggling!

And the most vital issue of terrorists' continued attacks,such subject does NOT figure on the blog so inconvenient reactions are avoided!

Of course,this recent announcement of retrospectively filling the coffers of these VIPs with so much moolla[money] is obviously going to be seeing in its wake soon the astronomical increase in salaries of the PM,FM,all ministers,MPs,MLAs as they must be able to maintain the high standard all along, though they too get mostly everything free!

Who says India is a poor country?With the elections around the corner,more such largesses will be seen like the ridiculous 6 months maternity leave+free paid leave for 2 years from the time every child is born, till it attains age of 18! Just imagine the joy of those,who produce many kids or enjoy more than 1 wife!But this is if you are privileged to be a Govt servant+belong to a privileged minority community! Pvt sector female emloyees can go to hell!

But then this is a touchy subject and the leaders must make hay, while they still enjoy power & the lucky in the janata must be doled out sops to encourage them to vote for the incumbent Govt/parties!

Of course,our clever politicians get a hefty PENSION, even if they sit in the chairs for few months!
For all others from Aam Janata,it is minimum 20 yrs of service and for the Pvt sector,NO PENSION!

कुंपणच शेत कसे खाते ते पहा! आणी मराठी अस्मितेवर चर्चा व परप्रांतीयांचा उदो उदो चालू ठेवा!

Hide important MACRO issues,while diverting attention of Janata towards MICRO ones.

See the unnecessary very large footage given to the Bachhan family,whereas best would have been to ignore them!