Sunday, September 07, 2008

एकट्या भारतासाठी का? अन्य देशांना सवलत द्या

जागतिक आण्विक व्यापारामध्ये सहभागी होण्यासाठी भारताला मिळालेली "विनाअट' परवानगी चीनला खुपली असल्याचे दिसत आहे. आतून असलेला विरोध उघडपणे दाखविणे शक्‍य नसल्याने त्यांनी आता अशीच परवानगी "अन्य देशांना'ही दिली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. स्वाभाविकपणे पाकिस्तानला डोळ्यांसमोर ठेवूनच चीनने ही मेख मारली आहे.

""एकट्या भारतासाठी जो न्याय लावला आहे, तोच न्याय अन्य देशांसाठीही लावला पाहिजे,'' अशी खोचक मागणी "एनएसजी'मधील चीनच्या शिष्टमंडळाचे प्रमुख चेंग जिंग्ये यांनी केली. चीनची ही मागणी पाकिस्तान या आपल्या मित्रासाठीच असल्याचे स्पष्ट आहे. भारताप्रमाणे आमच्याशीही अणुकरार करावा यासाठी पाकिस्तान अमेरिकेच्या मागे लागला आहे. तूर्त तरी अमेरिकेने त्यास नकार दिला आहे; मात्र जर भविष्यात तसे झाले, तर पाकिस्तानला "एनएसजी'ने अशीच सवलत द्यावी, असे चीनला सुचवायचे असेल. दुसरीकडे चीनने बैठकीत घेतलेल्या भूमिकेने भारत नाराज झाल्याचे नारायणन यांनी स्पष्टपणे सांगितले.

प्रतिस्पर्धी म्हणून चीन भारताकडे पाहात असला, तरी अशाप्रकारची भूमिका घेणे चुकीचे आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्याकडे भारताने स्पष्ट शब्दात नाराजी पोहोचवली पाहिजे.

4 comments:

captsubh said...

कितीहि स्पष्ट शब्दात भारताने नाराजी व्यक्त केली तरी चीन त्याची दखलसुद्धा घेणार नाही, कारण भारत देश सध्याच्या सरकारच्या गुळमुळीत धोरणामुळे एक दुर्बळ देश म्हणून बघितला जातो, जे आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या जानेवारी,२००८ च्या चीनभेटीवेळी स्पष्ट झाले होते.

भारताच्या चीनमधील उच्चायुक्तांनापण चीनने वाईट वागणुक दिली गेली होती.

तसेच अरुणाचल प्रदेशाच्या कित्येक हजारो चौरस भुमीत अतिक्रमणे चालू ठेवून तेथे आपले पंतप्रधान गेले त्यालापण चीनने आक्षेप घेतला होता!

भारत सरकार मुत्सद्दी आहे म्हणून कौतुक करवून घेतांना चीनसारखी कठोर धोरणे राबविली न शकल्यामुळेच ही परिस्थिती उद्भभवली आहे!
चीन हा एक अतिशय निष्ठूर व स्वतःच्या ध्येयांची सातत्याने व कठोरपणे पूर्तता करणारा देश आहे!

त्याचा परराष्ट्रमंत्री भारताच्या दौ-यावर यायच्या आधी त्या देशाची अरुणाचल प्रदेशमधील अतिक्रमणे उलथवून लावली व तो आल्यावर पाघळून न जाता त्याचा पाणउतारा करून त्याची जागा दाखविली तरच थोडाफ़ार उपयोग होउ शकेल!

Anonymous said...

There is a limit to congress stalwarts self praise over the proposed nuclear deal,which has not yet been agreed to by USA!
PM congratulating congress president & vice versa & all taking credit over possible deal which may see India generating 40000 MW of electricity[ONLY 10% OF PROJECTED NEED THEN!] AFTER 22 YEARS???

Compared to THE RAPID STRIDES TAKEN BY CHINA TO BECOME A GLOBAL SUPER POWER,we pale in comparison.Though our population is almost equal,we won just 3 olympic medals against their tally of 100[Also compare with the 2 medals won by Bahama with a population of just >3 lakhs,10% of say Pune's].

But in India,taking credit even for insignificant victories has become the NORM,that is why you see Pune city's MP blowing his trumpet so much!

China's message is clear "DON'T MESS WITH US".Only TIT FOR TAT starting with repelling aggression in Arunachal Pradesh can convey a message!!!

Anonymous said...

hindi - chini bhai bhai...
samething happends this time also. China have supported the deal but at the last movement opposes the deal.
They are our number one enemy and should be treated like enemies not like friends.

Anonymous said...

deun bagha sawlat ani tyabarobar anvik material. mag bagha kay hota te