Friday, August 08, 2008

प्रश्‍न भूमिकेचा...!

नारायण राणे यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे, व्हिडिओकॉनला एवढ्या कमी दरात जमीन देण्याचा अट्टाहास विलासराव का करत आहेत? आज राणे यांनी आवाज उठविला म्हणून, राज्य सरकारचे बिंग फुटले अन्यथा ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत आलीही नसती, अशा प्रतिक्रियांबरोबरच नारायण राणे सतत प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात, व्हिडिओकॉलला विरोध करणे म्हणजे..ही सर्वसामान्यांच्या प्रती कळकळ नाही, तर स्वत:ची जनतेसमोरची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा त्याचा हा व्यर्थ प्रयत्न आहे. ते किती भ्रष्टाचारी आहेत, हे अख्ख देश जाणतो. त्यांना या जमीन व्यवहारात सहभागी करून घेतले असते, तर तेरी भी चूप मेरी भी चूप असे चित्र निर्माण झाले असते, अशी मतेही "ई- सकाळ'च्या वाचकांनी सकाळ ब्लॉगवर नोंदविली.

नवी मुंबईतील सिडकोची 250 एकर जमीन व्हिडीओकॉन उद्योग समूहाला केवळ 910 कोटी रुपयांना देण्याचा निर्णय विलासराव देशमुख यांच्या मत्रिमंडळाने घेतला. त्यास नारायण राणे तीव्र विरोध करतानाच राजीनाम देण्याचा इशाराही दिला. त्यावर संताप व्यक्त करताना देशमुखांनी राज्यात उद्योग यायला हवे की नकोत, असा खडा सवालही केला. त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही "ई- सकाळ'च्या वाचकांना मते नोंदविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, अनेक वाचकांनी थेट प्रतिक्रिया नोंदविल्या.

जर्मनीत स्थायिक असलेले संतोष म्हस्के म्हणाले, ""राजकारणी म्हणून नारायण राणे आवडतात की नाही, हा मुद्दा नाही. तर, त्यांनी सध्या जी भूमिका घेतली ती अत्यंत महत्त्वाची आहे. मला खात्री आहे, की मध्यमवर्ग राणे यांच्या भूमिकेचे स्वागत करतील. सिडकोच्या या जागेवर घरकुलांची योजना राबविल्यास त्यामुळे मध्यमर्गीयांची निश्‍चितच सोय होणार आहे. देशमुख आणि जयंत पाटील यांनी जमिनीचा व्यवहार कोणत्या आधारे केला, हा प्रश्‍नच आहे.

'' कॅप्सतुभ याबाबत म्हणाले, ""इंद्रायणी नदीच्या कार्ल्याच्या पात्रात 30 हजार ट्रक राडारोडा टाकून त्यावर रिसॉर्ट बांधणाऱ्या बिल्डर्सना राणे यांनीच अभय दिले आहे. तसेच इतर कित्येक गोष्टीत पैसा खाण्यात त्यांचा वाटा आहे. निवडणूका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आपली पोळी भाजून घेतला, सर्वसामान्य खड्ड्यात गेले, तरी चालेल, पण अल्पसंख्यांकाची त्यांना मते हवी आहेत.

''कॅप्स्तूभ यांना दुजोरा देताना शीतल म्हणाल्या, ""आज राणे यांनी आवाज उठविला म्हणून देशमुखांनी केलेला व्यवहार जनतेसमोर आला. खरे तर कोणीच देशासाठी आणि जनतेसाठी काही करत नाही. पण, या व्यवहारातून आपण आपल्या जनतेचे पर्यायाने देशाचे भले करू शकलो, तरी देशाची बरीच प्रगती होईल.''

दीपक लालिंगकर म्हणाले, ""जमीन विकासासाठी टीआयएआर ला आंध्र प्रदेशने त्यांच्याकडील जमीन विनामूल्य दिली आहे. काही व्यवहार वगळले, तर सेझसारख्या अनेक विषयांत ते सक्रीय सहभागी राहिले आहेत, असे मत अशाच एका वाचकाने व्यक्त केले.''

या व्यतिरिक्त आपल्या आणखी काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा.

10 comments:

atul said...

also this is the after-effect of mahabhart of nuclear reaction in loaksabha! These are the kind of deals that were done. So it was 3000 Crs not 100 Cr !! what a profit making business-man cum dealer VD is!

Zimba said...

Although, Mr. Rane has taken good decision to resign but he has chosen the wrong reason. We white collar maharashtrian's always have been averse to have positive feeling towards any industralist. When discussing this issue we have to keep our emotions out and think objectively.

In this day and age it has to be acknowledged that we need to have more private industry participation in increasing our industrial base. The current project is set to create 10000 jobs
directly and may be 50000 jobs indirectly in the industry. This will have good impact on the economy for sure.
Now that we have to analyse why videocon is asking for same location. Simple reason for that is its close to JNPT and mumbai.If they move to any other place they will have to bear with irratic power conditions as well as insepid road conditions.
So, if you look at it giving land for cheap is the subsidy we are paying for having incompetant government which can provide good roads and uniterrupted power supplies to our own industralist to create jobs.
Finally, if the land really costs 4000Crore then I will rather have videocon making use of it than maharashtra government. At least they will use it efficiently.

Anonymous said...

Heavens will not fall if Mr.Rane's resignation is accepted![this is the second one lying in cold storage of the supremos in New Delhi as per Sakal!]

The videocon deal is perhaps only the tip of the iceberg with many publicly unknown shady deals quietly pushed under the carpet!
When live & let live [meaning indulge in corrupt practices & let all comrades too indulge!]policy is adopted,none raises objections!

In any case,when the term of present govt will be expiring soon,change of guard at this stage will be meaningless & there is just no better & honest contender including Mr.Rane!

It is time Mr.Rane rests on his dubious past laurels & vast ill gotten wealth,which can take care of few more Rane generations!

Time to change not the CM,but the whole state & central govt!!!!!

Anonymous said...

The Congress Government alway supported to on Busyness Men only. They dont worry about general public and it had big histories. From:- Shashikant Pawar, Lagadwadi. Wai, Satara

Anonymous said...

he sagale nete lok chor aahet...

shevati matdaar sahana hone mahtvach...

jayant jadhav said...

hi. this is jayant trimbak jadhav, According to me mr. Narayan rane is hungry for the post of C.M. this is veruy foolishness. because he himself is a ex. C.M. how can he claim for C.M. he is not understand the congress culture. because he joined congress only 3 years back. he always use bad words about shivsena. i dont know why cant he remeber because of shivsena he become superpower n strong. i m scared about the mla who follow with mr. narayan rane.

captsubh said...

आजच्या सकाळमध्ये पुरामुळे फ़ुगलेल्या व राडारोडा टाकून अतिशय अरूंद केलेल्या इंद्रायणी नदीचे पाणी श्री.बालाजी तांबे यांच्या कार्ल्याच्या आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये व आसपासच्या भागातल्या घरात शिरून हाहाकार झाल्याची बातमी व फ़ोटो प्रसिद्ध झाले आहेत!!!
गेले वर्षभर या विषयावर चर्चा चालू आहे ती निष्फ़ळ ठरली आहे!दोन बिल्डरांनी अनधिकृतपणे ३०००० ट्रक राडारोडा नदीच्या पात्रामध्ये टाकण्याचा सरकारच्या महसुलमंत्र्यांशी थेट संबंध येतो काय,त्याबद्दल हे सर्वज्ञानी 'काळजी करू नका' असे विधान करतात काय,ते ऐकून जिल्हाधिका-यांपासून इतर सरकारी अधिकारी गप्प बसतात काय हे सर्वच गौडबंगाल आहे!
कोट्यावधी रुपयांची मायापण तितक्याच अनधिकृतपणे व निर्लज्जपणे या व इतर प्रकरणात गिळंकृत करणारे हे महाभाग पुरामुळे त्यांचे पितळ उघडे पडूनसुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी दावा पेश करतात काय सर्वच आश्चर्याची गोष्ट आहे!
श्री.बालाजी तांबे यांच्या ख्यातीमुळे निदान या प्रकरणाला वाचा फ़ुटत असते,नाहीतर "आम लोकांच्या" घरात व शेतात कितीहि पाणी शिरून नुकसान झाले असते तरी कुणीच दखल घेतली नसती!
थोडेफ़ार विकत घेतलेले चमचे सोडून कुणाचाहि पाठींबा नसलेला हा तथाकथित नेता स्वतःला "जनतेचा मुख्यमंत्री" म्हणवून हसे करून घेतो व त्याची दुष्कृत्ये जनतेला माहिती असूनहि मुख्यमंत्रीपदासाठी गळ घालतो हे सध्याच्या राजवटीतच चालू शकते!
दम असेल तर तू या दोन्ही बिल्डरांना तुरूंगात टाक,त्यांच्याकडून राडारोडा काढून दाखव,स्वतःसकट इतरहि संबधित अधिका-यांना प्रचंड दंड करून नेमलेल्या जागांवरून खाली खेच व महाराष्ट्राचे आणखी नुकसान थांबव स्वार्थासाठी व मगच असले फ़ुकटे दावे कर!
वाचकांनीच कल्पना करावी की महाराष्ट्रात काय प्रकार चालले आहेत व हाच महाभाग विडिओकोनच्या डिलमध्ये श्री.विलासरावांना खाली खेचू पहात आहे!
People living in glass houses should not throw stones at others & if they wish to do so,should live in cellars!

Sandeep Pawar said...

राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे. नारायण राणे व विलासराव याना महाराष्ट्राची कालाजी नाही. सत्तेची त्यांना पडली आहे.

milind said...

NARAYAN RANE IS A CM IN HURRY. HE DOESNT BOTHER ABOUT LAND GIVEN TO VIDEOCON OR NOT . HE WANT SOME ISSUE TO LEAVE CABINET OR REMOVE DESHMUKH. HE HAS CHOSEN ISSUE VERY RIGHTLY, BUT KNOWING CONGRESS IT IS VERY DIFFICULT TO BECOME CM. EVEN IF BY GRACE OF GOD , IT WILL BE ONLY UPTO ELECTION AND THEY HE WILL BECOME VETERAN LEADER WHO CAN ONLY BECOME GOVERNER.

Anonymous said...

घाईत असलेला नामर्द मराठा अखेर तोंडघाशी पडला!
त्याला वाटले होते की मधूनमधून थोड्या बेडकासारख्या आरोळ्या दिल्या की महाराष्ट्राची धुरा त्याच्याकडे सोपविली जाणार!
साम,दाम,दंड,भेद वगैरेची निती कुचकामी ठरली!
"Divide & rule" ची कोंग्रेसची निती या शिवसेनेतेतील बाहेर पडलेल्या गद्दाराला महागात पडत आहे! त्याला वाटते की त्याच्यापेक्षा कार्यक्षम CM अजुन झाला नाही!
"वृथा वल्गना मनाच्या अजाण,
व्यथा भावना समजते जनता सुजाण"
भ्रमात रहा,महसुलमंत्री म्हणून महसुल स्वतःच्या खिशात घालत रहा,पण काळ संपत आलेला आहे!