Sunday, July 06, 2008

90 दिवस कारावास : कारवाई करणाऱ्या पोलिसांना बक्षीस

90 दिवस कारावास : कारवाई करणाऱ्या पोलिसांना बक्षीस

मद्यपान करून मुंबईत गाडी चालविणाऱ्या चंद्रकांत पंडित शिंदे (23) याला न्यायालयाने 90 दिवसांची कारावासाची शिक्षा आणि 2500 रुपये रोख असा दंड ठोठावला. याप्रकरणी कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 5 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांनो आता सावधान...

मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे चंद्रकांत याला यापूर्वी 27 जानेवारी रोजी देखील पकडण्यात आले होते. त्या वेळी त्याचा चालक परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आला होता. मात्र, काल (ता. 4) दुसऱ्यांदा तो पुन्हा याच गुन्ह्यासाठी पकडला गेला. त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर 90 दिवस कारावास आणि दंडात्मक कारवाई केली.

आजवर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत एवढी मोठी शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे निश्‍चितच वाहतूक गुन्ह्यांना आळा बसणार आहे. 20 जूनपासून आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी एकूण 19 हजार 805 जणांना मद्यपान करून वाहन चालविताना पकडले.

3 comments:

ketan said...

This is gr8 news for Mumbai Police. The law and order condition will become strong if we use such steps. Congratulations Mumbai Police. Use some more strict actions like canceling driving license to restict this. People should never think of drink and drive.

Rajshekhar Karlekr said...

आतापर्यंत १९८०५ लोकांना पकडले आहे यातील प्रत्येकाला ही शिक्षा होणार का? कारण यातील प्रत्येकजण हा स्वत: बरोबरच रस्त्यावरील ईतर निरपराध्यांनाही तेवढाच जीवघेणा असतो. माझी आपणा सर्वांना विनंती आहे जीवनात दारूला स्पर्श करू नका. केलाच तर किमान नंतर गाडी चालवू नका.
Personality development

Anonymous said...

1 in 1,00,000.
Good