Saturday, June 21, 2008

दिशाहीन पक्षबांधणीमुळेच कॉंग्रेसमध्ये हुल्लडबाजांचे धाडस

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यातील हुल्लडबाजीचे तीव्र पडसाद उमटत असून, या गटबाजीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.विलासराव देशमुख आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय संघर्षातून हा प्रकार घडल्याचा आरोप होत असला, तरी राज्यातील दिशाहीन पक्षबांधणी हेच त्याचे मूळ असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.

गोरेगावच्या एनएसई संकुलातील हा कार्यक्रम जाहीर सभा नव्हे, तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या हजेरीतच घोषणाबाजी होऊन गटबाजीचे जाहीर प्रदर्शन झाल्यामुळे कॉंग्रेसच्या शिस्त आणि संस्कृतीलाच धक्का पोचला, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने व्यथित होऊन सांगितले.

देशमुख-राणे यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या विरोधातील नाराजीलादेखील तोंड फुटण्याचे सूचित होऊ लागले आहे.

कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली नाराजी अशाप्रकारे हुल्लडबाजी करून बाहेर काढणे योग्य आहे का? लिहा सकाळ ब्लॉगवर..

2 comments:

Anonymous said...

सध्याच्या भिकारचूट कोंग्रेस पक्षाच्या मुंबईतील अंतर्गत सभेत कांही सभासदांनी जे वर्तन केले ते पाहून "सकाळ" ला किंवा इतर कुणाला एकहि अश्रू ढाळायची गरज नाही!
ज्या पक्षात अंतर्गत वाद सतत जोपासला जातो,जेथे महाराष्ट्रातल्या निवडून आलेल्या आमदारांना सतत टांगणीवर ठेवले जाते,जेथल्या मुख्यमंत्र्याला आपली खुर्ची कधी जाईल या सततच्या विवंचनेत कारभार करावा लागतो,जेथे पक्षाच्या सर्वोच्च नेत्या किंवा त्यांचा राजपुत्र सोडून इतर सर्वाना कस्पटासमान वागवले जाते,जेथे मर्द[?] मराठे स्वतःचे शेपूट कायम पायात घालून दिल्ली वा-या करत असतात,जेथे प्रदेक्षाध्यक्ष प्रभा राव यांच्यापेक्षा परप्रांतीय निरिक्षक मार्गारेट अल्वा यांना भाव दिला जातो,१२ राज्यात सत्ता गेल्यावरसुद्धा सर्वकांही अलबेल आहे असा देखावा करून ’हाय कमांड’चे पोवाडे गायले जातात,ज्या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची स्वतःच्या सत्तेत भागीदार असलेल्या NCP धरून सर्वांशी भांडणेच चालू असतात त्या पक्षाचा सकाळला एवढा कैवार का येतो?
सत्यपरिस्थितीचे भान राखा,कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत मेळाव्यात जे कांही झाले त्याला प्रसिद्धी देणे सोडा व हल्लीच्या कोंग्रेससंस्कृतीमध्ये शिस्त ही कधीच नव्हती हे मान्य करा!
ज्या पक्षाच्या येथिल महसुलमंत्र्याकडे भ्रष्टाचार सोडून दुसरे कांहीहि गुण नाहीत त्याची कारस्थाने हाय कमांडच्या आशिर्वादाने सतत चालू आहेत त्याला सबुरीचा सल्ला देवून मुख्यमंत्र्याचे स्थान डळमळीत ठेवले जाते या पक्षाबद्दल सकाळ वृत्तपत्राला पुळका कां?
या पक्षाच्या व्यथित नेत्यांच्या सुसरीच्या अश्रूंकडे लक्ष देवू नका कारण त्यांची कातडीपण सुसरीचीच आहे हे विसरू नका!!!
यातील बहुतेक नेते व कार्यकर्ते पांढरा कोट घालून खोटा दिखावा करणारे गुंड आहेत याचे भान विसरू नका!!!

Sandeep Dalvi said...

Rashtravadi la Congress chi sanskruti shikayala lavnarya Pradeshadhakshya Prabha Rao yana vicharave hich ka Congress chi Sanskruti.
Sarv Congress netyani Kujkat Bhasha sodun, Sharad Pawar'ancha swabhimani aadarha gyava.
--- Sandeep Dalvi, Baramati