Friday, June 20, 2008

शहरातील एकही परिसर राड्यारोड्याला अपवाद नाही...

शहरातील कोणताही परिसर राड्यारोड्याला अपवाद नसल्याची, प्रतिक्रिया "सकाळ'च्या वाचकांनी दिली आहे. शहरात विविध रस्त्यांवर टाकल्या जाणाऱ्या राड्यारोड्याबाबत "सकाळ'ने विस्तृत वृत्त दिले होते. तसेच, छायाचित्रेही प्रसिद्ध केली होती. या राड्यारोड्यामुळे शहरात दुर्घटनांची माहिती देतानाच ज्या परिसरात राडारोडा टाकण्यात आला आहे, तेथील नागरिकांनी "सकाळ'कडे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला "ई- सकाळ'च्या वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अनेकांनी आपली मते थेट "पुणे प्रतिबिंब' आणि "सकाळच्या ब्लॉग'वर नोंदविली.

बाणेर परिसर राड्यारोड्याला अपवाद नसल्याचे एका वाचकाने सांगितले. ते म्हणाले, ""बाणेर परिसरात सध्या नवीन बांधकामे सुरू आहेत. त्यातील अनेक बांधकामांचा राडारोडा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. मात्र, त्याचे येथील नागरिकांना सोयरेसुतक नाही. याचाच लाभ हे बांधकाम व्यावसायिक घेत आहे.''

तर, एका वाचकाच्या म्हणण्याप्रमाणे केवळ बांधकामांचा राडारोडाच नाही, तर बांधकामांच्या साहित्यांची ने- आण करणारे ट्रक, टेंपोही रस्त्यावरच लावले जातात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्याबाबत पोलिस कोणतीही भूमिका घेत नाही.

पीएमसीच्या कारभाराबाबत पडताळणी करण्याची गरज एका वाचकाने व्यक्त केली. ते म्हणाले, ""की संबंधित क्षेत्र अधिकारी नेमून दिलेल्या परिसरात पाहणीसाठी जातात का, याची तपासणी एका पथकाद्वारे केली पाहिजे.'' या मताला दुजोरा देताना एक वाचक म्हणाले, की महापालिकेच्या शिथिल वर्तनामुळे बांधकाम व्यावसायिक राज्य करत आहेत.

या व्यतिरिक्त आपली मते तुम्हाला व्यक्त करायची असतील, तर पुणे प्रतिबिंब आणि ब्लॉगवर जरुर कळवा...

5 comments:

Anonymous said...

After complition or in progress of road lots of the garbage is there the contracter not cleaning the place than who is resposible to clear the garbage? why PMC not take any action againest the contracter or why they not clean the road and deduct the amount from there contract price?

Anonymous said...

PMC should take care of it, they are always on there toes to fine you if you throw any garbage on the road, but they will never take any precautionary action to refrain people from throwing garbage on the road, PMC should create area-wise garbage collector bins, so that people will not throw garbage anywhere in the public places.

Unknown said...

PMC has to designate available accessible spaces/plots for disposal/removal/dumping of rubble & once they are declared & notices put up on boards,they should be open to the contractors or the public.
2]In Pune,there are many old buildings being demolished besides many old flats/societies undertaking major renovations,which generate considerable amount of rubble,but in absence of allocated spaces,it is a problem where to throw the राडारोडा!कोन्ट्रक्टर हा डबर किंवा राडारोडा टाकायची जबाबदारी टाळू बघतात व तसे शक्य नसेल तर अव्वाच्या सव्वा आकार लावून तो राडारोडा कुठेतरी नजरेआड फ़ेकून देतात.एरवी कुठल्याहि सामानाची ने-आण करायला तयार असलेले टेंपोहि राडारोडा न्यायला तयार नसतात!

3]On the other hand,many low lying plots/areas need to be levelled/reclaimed before they can be developed for construction.Such contractors need to purchase राडारोडा at Rs.1000/ or more per 100 cubic feet.

If both such needy parties can come together through the PMC,this problem can be easily solved.

४]सध्याची राडारोडा कुठेहि टाकून द्यायची पद्धत अत्यंत हानिकारक आहे हे रोजच्या बातम्यांवरून स्पष्ट झालेलेच आहे.आता तर नदी नाले,तळी,सर्व पब्लिक व कांही प्रायव्हेट प्लोटससुद्धा याला अपवाद राहिलेले नाहीत!

५]याला आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यायलाच हवा.कमिशनर यात लक्ष घालणार अशी बातमी आलेली आहे!त्यानी ताबडतोब अशा जागा ठरवून द्याव्या व इतरत्र नियमांचे उल्लंघन होणार नाही अशी कायमची काळजी घ्यावी!पण हा प्रश्न कायमचा निकालात काढावा!!!

Amit Devale said...

Instead of playing the blame games, why doesnt the print media file a public litigation against them ?

Phakta Chau Chau karun kai honar ahe. File a Case against them and then see whether it works or else.

And We are equally responsible. The PMC is run by people who are elected by us. Tyanna Jaab Vichara.

Anonymous said...

It's a very open secret, local politicians favor builders in return of some money and allow them to dump garbage in public land or elsewhere in un-attended private plots. Gangsters paradise...!!! A common man can't really fight against this and the legal system have no will power. Great shame...!!!
Thanks to Sakal for opening a discussion on this serious issue.