Saturday, June 14, 2008

पोलादावरील निर्यात शुल्क मागे; मोठ्या मोटारी महाग

शुल्करचनेत बदल ः 15 ते 20 हजारांनी वाढ

चलनवाढीचा दर साडेआठ टक्‍क्‍यांच्या वर पोचला असताना, सरकारने पोलादावरील शुल्क कमी केले, तर मोठ्या मोटारी, बहुउपयोगी वाहने आणि स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल यांच्यावर अतिरिक्त 15 ते 20 हजारांचे अतिरिक्त उत्पादन शुल्क लादले. सध्या मोटारींवरील अतिरिक्त शुल्क 24 टक्के आहे. याखेरीज 15 ते 20 हजार रुपये शुल्क आता द्यावे लागणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे "मारुती एसएक्‍स 4', ह्युंदाई व्हर्ना, होंडा ऍकॉर्ड, आणि रेनॉल्ट-लोगान या गाड्यांच्या किमती 15 हजारांनी महागतील, तर होंडा सिव्हिक, टाटा सफारी, टाटा सुमो, महिंद्रा स्कॉर्पिओ, बोलेरो, टोयाटा इनोव्हा, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि स्कोडा या मोठ्या गाड्यांच्या किमती 20 हजार रुपयांनी वाढतील. मात्र, नव्या उत्पादन शुल्क रचनेचा "मारुती 800', अल्टो, "वॅगन आर', ह्युंदाई सॅंट्रो, "आय 10' आणि "टाटा इंडिका' या मोटारींच्या किमतीवर काहीही परिणाम होणार नाही.

1 comment:

Anonymous said...

IT WAS QUITE SHOCKING TO KNOW THAT
THE PMPCM HAS ABOUT 200 BUSES WHICH
HAVE NOT UNDERGONE RTO PASSING.
THE CONDITION OF THE BUSES IS VERY
BAD AND MANY ARE NOT SELF STARTING
AND ENGINES ARE KEPT ON WITH BUSES
IN STATIONARY CONDITION FOR HOURS TOGETHER BURNING PRECIOUS DIESEL.
RTO SHOULD IMPOUND THE BUSES AND IMPOSE HEAVY PENALTY ON THE PMC
FOT THIS ACT OF VIOLATION OF GOVT.
RULE ENACTED FOR SAFETY OF BUS
COMMUTERS AND PUBLIC OF PUNE AND
PIMPRI CHINCHWAD CITIES.


A L MAHAJAN,569 SHIVAJI NAGAR
PUNE-5