Friday, May 23, 2008

पेट्रोल दरवाढीबरोबर टंचाईचाही फटका

केंद्रापुढे पेच ः दोन ते पाच रुपये दरवाढ अपरिहार्य

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव आज 135 डॉलरवर पोचले असले, तरी केंद्र सरकारने मात्र दरवाढीपेक्षा तेलाची टंचाई ही बाब गंभीर असल्याची भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या विषयाचा उल्लेखही झालेला नसला, तरी त्यावर उद्या खास बैठकीत देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. दोन ते पाच रुपयांपर्यंत पेट्रोलची दरवाढ सुचविण्यात आली आहे.

इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांचा पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या विक्रीतील दैनंदिन तोटा 600 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे आणि येत्या काही महिन्यांत कच्चे तेल आणि अनुषंगिक उत्पादने आयात करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाही उरणार नाही, अशी अवस्था येऊ शकते.

केंद्र शासनाची ही ग्राहकविरोधी भूमिका आहे. आधीच अन्नधान्य टंचाईचे भूत सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसले असताना, पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून त्यांचे जिणे नकोसे करत आहे.

4 comments:

Anonymous said...

This is good news! All car owners will start using BIKES! Pune will get some clean air.

The price of petol is about to rise to Rs 100.00 a liter in the coming 5 years. New Car buyers should think on this issue.

Unknown said...

If the govt wishes,petrol & diesel could still be much cheaper,but the FM will NEVER allow this as he needs money to cover the extraordinary largesse announced for the farmers!

The recent Karnataka election results [Surprisingly or expectedly no mention on the sakal blog!!!]however proved that these sops for the farmers by the govt have not yielded any electoral benefits for the congress/NCP,who allowed the prices of all essential commodities to rise beyond all proportions in last 3-4 years & are belatedly trying to douse the fire in a miserable manner!

But the situation is grim indeed & the OPEC countries too need to be reined in by the world superpowers!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

क्रूड तेलाची किंमत $२५ वरून $130 वर गेल्यावर पेट्रोल-डिझेलच्या किंमती तशाच ठेवल्या तर होणारे नुकसान कोणी सोसायचे? काहीच न करणे हा पर्याय शिल्लक उरला आहे असे म्हणता येत नाही. नफ्यात असणार्‍या सरकारी तेल कंपन्या पूर्ण बुडेपर्यंत स्वस्थ बसता येईल काय याचाही विचार वृत्तपत्रांनीहि केला पाहिजे. नुसतीच भाववाढीवर टीका करून काय उपयोग?

Unknown said...

bhav wad zali ani ekch sagli kade bombabom news ,paper madhe bhav wadla ka wadla yacha kon vichar nahi karnar? ka aplyala kay swastat petrol milale mhanje bas!srkari petrol companyala ya mule kiti tota hoto he kon bagnar nahi.ani mala asa wata ki tumala jar petrol pawadat nasel tar gadi kashala vapraych bus ne java mhanje ekunach petrol ch bhav ka wadto ahe ?yacha sarva ni vichar kela pahije sarkari kijori tar kiti divas bhar sosnar ?think
Sanjay Nakate
sanjaynakate@gmail.com