Tuesday, February 19, 2008

ओरिसाचा समुद्र किनारा कासवांचे "मृत्युघर'

ऑलिव्ह रिडले या कासवांच्या दुर्मिळ प्रजातीचे अंडी घालण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला ओरिसाचा समुद्र किनारा आता याच कासवांचे "मृत्युघर' बनला आहे.

जगात फक्त पाचच ठिकाणी कासवांची ही दुर्मिळ प्रजाती अंडी घालते. त्यातील तीन ठिकाणे गहिरमाता (केंद्रपाडा), देवी नदीचे मुख असलेला पुरी आणि ऋषिकुल (गंजम) ओरिसात आहेत. या वर्षी तेथे मोठ्या प्रमाणात कासवे मृतावस्थेत सापडली आहेत.नोव्हेंबर 2007 ते 15 जानेवारी 2008 या कालावधीत एक हजार 208 ऑलिव्ह रिडले मृतावस्थेत सापडल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

देवी नदीच्या मुखाशी असलेल्या प्रदेशात सर्वांत जास्त कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. जगात ऑलिव्ह रिडलेच्या फक्त आठ लाख माद्या आता अस्तित्वात आहेत, असे एका अहवालाच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे हा प्राणी जगात अतिशय दुर्मिळ मानला जातो. त्यामुळेच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार ऑलिव्ह रिडलेचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

या कासवांच्या मृत्यूची जी आकडेवारी शासनाने दिली आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात कासवांचा मृत्यू झाला आहे. यांत्रिक मासेमारी हे या कासवांच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण आहे, असे पर्यावरण अभ्यासक विश्‍वजित मोहंती यांनी सांगितले. मासेमारी कायदा 82 मुळे या भागात मासेमारी पूर्णपणे रोखता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडलेंचा मृत्यू होत आहे.

-स्मृती सागरिका कानुनगो

2 comments:

ashish badwe said...

कासवांना वाचविण्याकरीता शासनाने उपाय योजना आखाव्यात - आशीष बडवे www.dainikyavatmalnews.com
Email- ashish_badwe@yahoo.co.in

captsubh said...

In India,due to man's unbridled greed & total apathy of most of the central & state governements,not just olive ridley turtles,but bears,leopards,tigers,rhinos,elephants & so many other species have been killed mercilessly in recent years.
Late Virappan became a millionaire by killing elephants,felling sandalwood trees & selling ivory & sandal & yet he not only thrived,but also lived for many years.
Even crocodile tears are rarely shed by the govt concerned & all the laws of conservation of the land & marine habitat are thoroughly useless.
काय आपण वाचवणार या बिचा-या कासवांना व इतर प्राण्यांना? ज्यांच्यावर यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहेत ते ती सदा टाळतात,जरी कधी कोणाला हस्तीदंतासाठी हत्तींना वा कातड्यांसाठी वाघ वा सिंहांना मारताना पकडले तरी त्यांना जबर शिक्षा होणे सोडाच तर लवकरच सोडून देण्यात येते,त्यामुळे आणखी लोक अशा हत्या करण्यास प्रवृत्त होतात!
त्याउलट त्यांचे हातपाय तोडून टाकले असते तर इतरजण धजावले नसते!
आत्ताच सकाळमध्ये सुंदरबनमध्ये लोकांनी दगड मारून जखमी केलेल्या वाघाला पस्चिम बंगालच्या वन्यरक्षण खात्याने वाचवून औषधौपचार करून सोडून दिल्याची फ़ोटो व बातमी आली होती ती वाचून आनंद झाला!
इतर राज्येहि अशी भुतदया दाखवतील कां?