आता 18 व्या वर्षी "शुभमंगल' शक्य
बालविवाहास बंदीः बलात्काराचा गुन्हा नोंदविणार
विवाहाचे वय 21 वरून 18 करण्याची त्याचप्रमाणे 16 वर्षांखालील आणि 16 ते 18 दरम्यान होणारे विवाह कायदेबाह्य ठरविण्याची शिफारस कायदेतज्ज्ञांनी केंद्रीय कायदे मंत्रालयाला नुकतीच केली. मात्र, 18 वर्षे पूर्ण केलेल्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा आणि विवाहाचे वय मात्र 21 ठेवायचे यामागे कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे मत कायदेतज्ज्ञ कीर्ती सिंह यांनी व्यक्त केले आहे.
16 व्या वर्षाच्या आतील मुलींबरोबर शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा ठरविण्यात यावा. यात तिचा विवाह झाला आहे की नाही हा मुद्दा गौण असल्याचेही या शिफारशींमध्ये म्हटले आहे. सध्याच्या कायद्यानुसार हे वय 15 वर्षे आहे. त्यामुळे आता 16 वर्षांखालील मुलीशी संबंध ठेवणाऱ्यांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे. जरी 16 वर्षाखालील एखाद्या मुलीने प्रियकराशी विवाह केला आणि त्याच्याशी "पती' या नात्याने शरीरसंबंध ठेवले तरी त्याला याच गुन्ह्याखाली शिक्षा होणार आहे. या प्रकरणी 375 कलमात दुरुस्ती करण्याची शिफारस या आयोगाने केली आहे. आतापर्यंत 15 वर्षांवरील मुलीशी विवाह करून तिच्याशी संबंध ठेवणाऱ्याची बलात्काराच्या आरोपातून सुटका होत होती.
बालविवाहाला आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस करण्यापूर्वी आयोगाने बालविवाह प्रतिबंधक कायदा व कलम 375 चा अभ्यास केला.
8 comments:
If this law is included then chances of increasing of population of india will become more as compare now............
आपल्या देशाच्या अतिवेगान्रे वाढणा-या लोकसंख्येला आळा घालण्याचा कुठलाहि प्रयत्न सरकारकडून केला जात नाही.आता लग्नाचे वय आणि मत देण्याचे वय यांची सांगड घालून सरकार काय साध्य करणार आहे?
आपल्या गरीब देशात १८ व्या वर्षाच्या तरूणतरूणींना संसार करायची आर्थिक क्षमता व अक्कल मुळीच नसताना बालविवाह कायद्यात सुधारणा करून काय फ़ायदा होणार? २५-२६ वर्षाच्या शिकलेल्या व नोकरी करणा-या तरूणांनासुद्धा लग्न करून संसार उभा करण्यास अनेक अडचणी येतात तर प्रचंड वाढलेल्या किंमतीमुळे हैराण झालेल्या गरीबांना आणखी बाळे होणार!
डबघाइस आलेल्या शेतक-यांना,साखर कारखान्यांना,सहकारी पतपेढींना सरकार जसे हल्ली जनतेच्या पैशाने 'package' देते तसेच या लहान अर्भकांना पोसायला package देणार कां?
जनहिताच्या नांवाखाली अनेक कायदे केले जातात व लवकरच ते पाळणे बंद होते!
उदाहरणार्थ गुटक्यावरची व प्लास्टिक पिशव्यांवरची बंदी!
इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव असलेले सरकारने अस्तित्वात असलेल्या कुठल्या कायद्याची अंमलबजावणी कधी केली आहे कां?
अडाणी लोकांच्या मुलींचे बालविवाह कुठलाहि कायदा करून थांबणार आहेत कां? तसेच देशाच्या
कोप-याकोप-यात चालू असलेले बलात्कार असा कायदा करून थांबणार आहेत कां? आणि अशा किती खटल्यांचे निकाल लागले? कोर्टाकडून दोषी धरले गेलेच तरी फ़ाशी किंवा जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा किती जणांना होते? अर्थात फ़ाशीशिक्षा फ़क्त कागदावरच अस्तित्वात आहे !
आणि हा सुधारलेला बालविवाह कायदा केल्यावर लहान वयातच शरीर परिपक्व न झालेल्या मातांना व त्यांच्या बाळाना शारिरीक धोका उत्पन्न होउ शकतो हे माहित असतांना सुद्धा अशी शिफ़ारस कायदेतज्ञांकरवी कशी केली जाते?
ज्या लोकांना नुसते काळे कोट व टाय
वर्षेनवर्षे घालून कोर्टात न्यायप्रविष्ट लाखो प्रकरणे सोडवता येत नाहित,किंबहुना सोडवायचीच नसतात कारण त्यात त्यांचा प्रचंड फ़ायदा असतो ते आता टाइमपास करायला असे नवीन विधेयक आणणार?यांच्याकडून काय अपेक्षा करता येणार?
कोलमडत आलेल्या केंद्र सरकारला जनतेचे लक्ष विचलित करायला ही आणखी एक शक्कल सुचलेली दिसते कारण कायदामंत्र्यांनीच हा अहवाल सादर केला आहे!
वारेवा,आपण लोकसंख्येच्या बाबतीत महासत्तेकडे शिघ्रगतीने आगेकुच करण्याचा हा जालीम उपाय काढला आहे 'आमआदमी' च्या सरकारने!
everything written in above comments I am totally agree. Please governmebt, try to concentrate on more useful and needed things than this.......
आपण आतापर्यंत राज ठाकरे यांच्या अटकेची बातमी ऐकली असेल. मी राज ठाकरे ह्यांच्या अटकेचा निषेध करतो.
सुनील यादव
I am sorry for wrong information, Raj Thakre is not arrested yet. His three partee leaders are arrested according to IBNLIVE.COM. I do not want to give wrong roomers.
Sunil Yadav
राज ठाकरे ह्यांची अटक झालेली नाही. माझ्याकडून चुकून चुकीची बाब लिहिली गेली त्याब्द्हल क्षमा मागतो.
सुनील यादव
I am in favor of the change. I agree that there should not be any difference in boy and girl in any respect. This should be a step towards that. A man should not be considered as the head of the family (at least by law).
I request Sakal Publicatioin to publish the article from this blog into sakal news paper.
This article needs to be reached to all puneities.
A humble request to sakal publications.
The article is available on:
http://maharashtramajha.blogspot.com
पुणे तिथे काय उणे..हि घ्या यादि.
Post a Comment