Saturday, October 27, 2007

लवकरच पुण्यातील 15 रस्त्यांवर "पे अँड पार्क'

कंत्राटदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने रखडलेल्या पुण्यातील 15 रस्त्यांवरील चारचाकीसाठीच्या "पे अँड पार्क' योजनेला तुर्तास तरी हिरवा कंदील मिळाल्याचे दिसते आहे. कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाल्याने ही योजना सुरू होण्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार असून, दिवाळीच्या सुमारास सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील अनेक रस्ते कायमच गर्दीने गजबजलेले असल्याने वाहनतळ ही तेथील गरज बनली आहे. वाहनतळ उपलब्ध करून न देता "नो पार्किंग'चे मोठमोठाले "बोर्ड' लावायचे, आणि कोठेही वाहन लावल्याच्या सबबीवरून वाहनचालकांवर कारवाई करायची..,अशाप्रकारे वाहतूक व्यवस्थेचे काम सुरू आहे. या व्यवस्थेला कंटाळलेल्या वाहनधारकांनी भाडे भरून वाहन "पार्क करण्याची तयारी दर्शविली आहे. अशा अवस्थेत दिवाळीत ही योजना प्रत्यक्षात आल्यास, पुणेकरांना "पे अँड पार्क'च्या रुपाने फराळाचा खरा आस्वाद घेता येईल...तुम्हाला काय वाटते या विषयी??? प्रतितास पाच रुपये भाडे परवडणारे आहे का?? आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा..

8 comments:

Unknown said...

अपरिहार्य परिस्थितीमुळे 'पे अँड पार्क' योजना राबविण्याची काळाची गरज जर खाली लिहिलेल्या अटी मान्य असतील तरच जनतेला मान्य असतील.
१]दर ताशी ५ रुपये मोजायला लावणे पूर्णपणे अयोग्य व अमान्य आहे.
दर ३ तासांना ५ रुपये ठीक वाटतात कारण कुठल्याहि खरेदी वा इतर कामासाठी गेलेली व्यक्ती १ तासात घाईघाईने वाहनापर्यंत येउ शकणार नाहीं किंवा तसे करायला शरीर व मनाची कसरत करावी लागेल.
येवढे करूनहि ३-४ मिनिटांनी १ तास उलटून गेला की आणखी ५ रुपये मोजायला लागणार व त्यावरून हमखास निष्कारण वादविवाद होणार.
२]'पे अँड पार्क' योजना राबवल्यावर ती सरकारी,पोलिस व मंत्र्यांच्या लाल दिव्याच्या गाड्यांनापण सक्तीची करावी!
यांच्या लाल फ़ितीच्या दुर्लक्षी कारभारामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे व आजहि यांच्या गाड्या निर्लज्यपणे no parking च्या लक्ष्मी व इतर रस्त्यांवर मनमानीपणे उभ्या दिसतात!
३]ही योजना राबविल्यावर कमी वाहने पार्क होतील ही अपेक्षा आहे पण तसे १ वर्षाच्या ठराविक काळात न झाल्यास ती रद्द करावी.
४]तसेच या काळात गोळा केलेले पैसे त्या त्या परिसरातील रस्ते,पदपथ,दुभाजक,सुरक्षा कठडे यांच्या सुधारणेसाठीच कारणी लावावे कारण सरकारी/म्युनिसिपालिटीच्या अजस्त्र अजगरांना फ़क्त पैसे गिळायची व कोणी जाब विचारल्यास विनम्रपणे उत्तर देणे सोडाच तर फ़क्त गरळ ओकायची संवय लागली आहे!
५]जमा झालेल्या सर्व पैशांचा व त्यांचा कसा विनीयोग केला याचा हिशोब प्रत्येक भागात दर तीन महिन्यानी लिहावा तसेच वर्तमानपत्रात छापावा!
सुभाष भाटे

Suresh said...

पे अँन्‍ड पाकँ योज्ञना पैसे कमविण्‍यासाठी नसून मोटारीनी रत्‍याची जागा अडवू नये या साठी तयार केलेली आहे. किमान रक्‍कम रुपये पन्‍नास ठेवावी.

Unknown said...

श्री.सुरेश,
आपण ज्येष्ठ आर्किटेक्ट असून ५ रुपयांच्या एवजी ५० रुपये सुचवून कमाल केलीत.अशा सुचना PMC च्या पथ्यावरच पडणार.मग त्यांनी कोठेच पार्किंगला जागा ठेवायला नकोत कारण रस्ते ओस पडणार!
आधीच ते हात झटकून मोकळे झाले होते त्यात आपल्या विधानाने त्यांना हर्षवायुची बाधा होणार.
फ़क्त एवढेच कळले नाही की मग ज्यांना गाड्यांची गरज असते, पण ५० रुपये परवडत नाहीत त्यांनी त्या शेजारच्या पूर्ण भरलेल्या गल्ल्या सोडून कुठे ठेवायच्या?
आपल्या स्थापत्यशास्त्रात आपण लहान इमारतींचे नकाशे तयार करता तेव्हासुद्धा चार व दोन चाकी गाड्यांसाठी जागा दाखवावी लागते,तर town planning मध्ये तर पटांगणाएवढ्या जागा सोडायला हव्या.
थोडक्यात कुणीच वाहने न वापरून रस्ते मोकळे सोडावेत असे आपण संकेत देत आहात.तसेहि झाले तरी छान होइल व एके काळच्या लोपलेल्या जुन्या पुण्याची तीव्र आठवण येइल.पण एवढी फ़ी आकारूनहि जर मोकळे रस्ते दिसले नाहीत तर न परवडणारे लोक कायमचे घरी बसतील!तथास्तु!!!

Suresh said...

मा.captsubh ,
माझ्या लंडन शहरात राहणा-या मित्रास जानेवारी २००७ पासून पार्कीगसाठी तिप्पट पैसे भरावे लागतात. (parking charges up to £750 a year - three times the normal parking fees). रस्ते रहदारीसाठी रिकामे ठेवण्याचा हा हुकमी उपाय उरला आहे. पुण्याचे रस्ते फार अरूंद आहेत. माझ्या सारख्या जेष्ठ नागरिकास तर रस्ता ओलाडताना नाकी नऊ येतात.

Regards.

Unknown said...

श्री.सुरेश,
मी पण आपल्यासारखाच ज्येष्ठ नागरिक असून आपल्याला रस्ते पार करताना कराव्या लागणा-या कसरतीला स्वानुभवावरून समजू शकतो व आपल्या भावनांची कदर करतो.
माझे पण लंडनला मित्र आहेत व तेथील रस्त्यांवरची आपल्यापेक्षा फ़ारच बरी परिस्थिती काही वर्षापूर्वी स्वत: पाहिलेली आहे.सर्व जून्या मोठ्या शहरात वाहनांना पार्किंगला जागा कमीच पडते हे पण सत्य आहे.
परंतु आपल्या त्यामानाने गरीब देशात आपण पार्किंगला सुचवलेले ५० रुपये मला अतिजास्त वाटतात!
PMC चे रेकोर्ड पाहून यांनी फ़क्त ५ रुपयेच ३ तासाकरता लावावे असे माझे ठाम मत आहे व १ वर्षाने त्यावर पुनर्विचार होउ शकतो.
धन्यवाद,

Anonymous said...

पार्किंगकरता ५ रुपये ठेवा अगर ५०० ठेवा. ते वसुल मात्र वाहनधारकापासुन करु नका. ही स्थिती निर्माण करणारापाहुन करा. य़ा स्थितिला जबाबदर कोण? राकारणी, शहर नियोजन कर्ते, बिल्डर, त्याना मंजुरी देणारे पालिकेचे अधिकारी, ठेकेदार, आर्किटेक्ट, बिल्डिंग मालक, व्यापारी. कोणी रहिले असेल तर या यादीत त्यांचाही समावेश करा. यांचेकडुन लागणारे पैसे वसुल करा. सर्व सामान्यावर तो बोजा टाकु नये.

काय हो, लंडन आपला आदर्श आहे काय? आमची काही संस्कृती नाही काय? आम्हाला साहेबापासुनच शिकावे लागणार काय? हे करण्यामुळेच आजची परिस्थिती उद्भवली आहे. महात्मा गांधीनी भारतिय संस्कृतीच्या मार्गाने विचार व आचरण केले. गांधीजी या विचाराने यशस्वी झाले. मग आपण दुसऱ्याकडे बघण्याचे काय कारण?

JAGDISH KALEBERE said...

जो पर्यंत फूकट पार्किंग करणारा कडून दंड वसूल केला जाट नाही, टू पर्यंत ५ रुपयाचे देखील पे एंड पार्क कोणी वापरनार नाहि

Unknown said...

The PMC has already implemented the pay & park scheme of Rs.5/ per hour for cars on many roads & no useful purpose was served by posting this topic here & seeking comments,which to start with,were very paltry in number & if at all read,obviously ignored by the authorities!