Thursday, June 21, 2007

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्‍न


सुट्ट्या संपल्या, आता ऑफिसेस भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी वाहनांच्या गर्दीत मोठी भरच पडलीय! शाळेची पहिली घंटा व्हायच्या आत शाळेत पोहोचण्यासाठी दुचाकीवरचे पालक, दप्तरं, वॉटरबॅग आणि विद्यार्थांनी ओथंबलेल्या रिक्षा, बसच्या मागून "बस आली" असं ओरडत धावत जाऊन बस पकडणारे थोडे मोठे विद्यार्थी यांची आधीच असलेल्या गर्दीत भरच पडलीय. लांबचा पल्ला पार करून शाळेत पोचणारे विद्यार्थी पाहिले की त्यांच्या पालकांबरोबरच गर्दीतल्या अनेकजणांना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न भेडसावतो.नाशिकमधेही शाळेत जाण्याऱ्या मुलांच्या वाहतुकीचा प्रश्‍न असा ऐन चव्हाट्यावर आला होता. बस स्टॉपवरच्या गर्दीमुळे बस काहीशी दूर उभी राहते. बस चुकू नये म्हणून मुलं आजूबाजूच्या वाहतुकीची तमा न बाळगता खुशाल बसच्या मागे धावत सुटतात आणि कशीबशी बस पकडतात. . विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची परवड पाहून अखेरीस नाशिक प्रशासनानं उपाययोजना केली.यासंदर्भात नाशिकमधल्या चाळीस माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षण अधिकारी, राज्य परिवहन मंडळाचे नियंत्रक यांची सहविचारसभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले गेले. त्यानुसार, शहरातल्या दहा मार्गावर खास विद्यार्थांसाठी बस सुरू होतील. महिन्याभरात विद्यार्थ्यांसाठी पन्नास नव्या गाड्या शहर परिवहन मंडळ रुजू करेल. पास साठी विद्यार्थांना रांगेत ताटकत लागू नये म्हणून शाळेतच विद्यार्थांना पास उपलब्ध करून दिले जातील. संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ आणि कार्यालय सुटण्याची वेळ एकच असल्यामुळे वाहतुकीवर ताण येतो. हा ताण लक्षात घेऊन शाळा सुटण्याची वेळ अर्धा तास पुढे अथवा मागे करण्यात येईल.शाळा प्रशासन, माध्यमिक शिक्षण विभाग, आणि राज्य परिवहन मंडळाने दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे नाशिकमधल्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्‍न बराचसा मार्गी लागलाय. महाराष्ट्रात इतरत्रही याची पुनरावृत्ती व्हावी का?याविषयी तुम्हाला काय वाटते. मुलांच्या वाहतुकीत, शिक्षण विभाग, शाळेचे प्रशासन, राज्य परिवहन मंडळाच्या नियोजनातून मुलांच्या वाहतुकीची सुरक्षित व्यवस्था निर्माण होऊ शकेल असं खरोखरंच तुम्हाला वाटतं का?

4 comments:

Malhar said...

schools should provide bus or cab facility to each student. Govt should make it compulsry. Any way scools are grabbing mony in all possible ways so we can pay for it also.

MALHAR KARWANDE

Anonymous said...

aplya deshat surakshe la sarvat shevatche pradhanya dile jaate. lahan mulanchya surakhe baddal sarkar kiva shala vichar karat nahi ha nivval murkhapana ahe.eka rikshet 10-15 mula kombli jatat. rikshavale tar ashikshit ahetach pun palak suddha itke bejababdar kase bantat ?? aplya lahan mulanai itkya asurakshit paddhatine pathavlech kase jaate ?
mulansathi school bus hach ek uttam paryay ahe.asa niyam kela pahije ani tyache katekor palan suddha kele pahije.nahitar tya shaleviruddha gunha dakhal kela pahije.

माधव बामणे said...

सर्व प्रथम शाळेत प्रवेश देताना मुख्य निकष घरापासून शाळा कमीत कमी अंतरावर हा असावा. हे करायचे म्हणजे सर्व शाळांचा दर्जा जवळ्पास आसला पाहिजे. हे तर आद्य कर्तव्य म्हणून केलेच पाहिजे. शाळा घराजवळ असेल तर पालक पाल्याला पायी पायी शाळॆत सोडू शकतील. रस्यात मुलाशी संवाद साधता येईल. पाल्यावर चांगले संस्कार घडवता येतील.

जो पर्यंत हे होत नाही तो पर्यंत घरातून मुलाना न्यायची व सुखरुपपणे घरी परत सोडायची जबाब्दारी शाळेने घेतली पाहिजे.

Anonymous said...

Since we have option of choosing a good schools around the area, it becomes all parents responsibilty to come together and ask for transportation from school for their kids .
Good school is not only due to good teachers but also great STUDENTS like our childerns!!!!