Wednesday, June 20, 2007

शाळांचा नव्हे; शिक्षकांचा दर्जा घसरतोय - मुख्यमंत्री


राज्यातील शाळांचा नव्हे, तर शिक्षकांचा दर्जा घसरतोय, ही दुर्दैवी बाब आहे,'' अशी खंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज व्यक्त केली. शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही राज्यातील सर्व मुला-मुलींना समान शिक्षण मिळत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

"सरकारकडून अनुदान कसे मिळते, यावरच सध्या सर्वांचे लक्ष आहे; पण विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचविण्याच्या तळमळीकडे दुर्लक्ष झाले आहे,'' असे सांगून, ""अजूनही राज्यातल्या चौथी उत्तीर्ण असलेल्या काही विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही, हा दोष कोणाचा?'' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, ""सरकारतर्फे अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असूनही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत फारशी वाढ झाल्याचे आढळत नाही. जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांपेक्षा अधिक चांगले शिक्षण खासगी शाळांत मिळेल, असा विचार पालकांतर्फे केला जात असल्याने सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्याही घटली आहे. त्यामुळेच या शाळांमधील शिक्षकांचा दर्जा जास्तीत जास्त सुधारावा लागेल.''

11 comments:

Anonymous said...

Why CM Vilasra has taken so much time to admit this? Only chanting and cosmetic admission about not so well being of schools and entire education field will not bring any corrective measures. Political `headmasters`, across the political party, are main culprit. When from MP and MLA to Sarpanch indulge into wholesale transfer of teachers, can we expect corrective measures from `Head` Of this political class?

Unknown said...

The quality of teachers and teaching will not change untill and unless they will be selected strictly for their intellegency ,starting form their
degree education till emplyment.

How could we expect from any teacher a good education, who have had spend lakhs of rupees(as a donation or bribe)for his education to job selection.

Unknown said...

Yes! Its easy to blame politicians or teachers. Does it solve the problem? When we point one fingur to other, 4 fingures are pointing towards us. Who elect the politicians? We can not say oh, I did not vote this party leader. The process has to start from grass root. Everyone should be on same page. Everyone should think that quality education is highest priority need and should work towards it. When teacher is blamed, what is your contribution should be made clear, and when politician is blamed,... Think about it, I wonder how a city like Mumbai can elect a Gunda as an MLA? Gunda is to be blamed or the citizens?

Milind, Texas, USA

Anonymous said...

the quality will not improve unless the atitude towards selection will strictly be the intelligency.

Anonymous said...

rajkaranachi pan ghasarliy tyache kay?

Anonymous said...

हे विश्लेषण रास्त नाही. शाळांची गुणवत्ता चांगली पण शिक्षकांची वाईट. शाळा शासनाच्या व शिक्षक कोणाचे? शिक्षक कोणी त्रयस्त आहेत काय? ज्यांच्या शाळा त्यांचेच शिक्षक हे खरे नाही काय? शिक्षकानाही दोष देता येणार नाही. शिकवायचे काम हा तर फावल्या वेळेतील धंदा. त्यांचे मुख्य काम नोकरी मिळवण्याकरता गुंतावलेले लाख दोन लाख वसूल करणे, निरनिराळी सर्वेक्षणे करणे, मतदार याद्या बनवणे वगैरे.

निदान शिक्षणक्षेत्रात तरी प्रामाणिकपणा जपावा. शिक्षणमंत्र्याला मुख्यमंत्र्याच्या लगेच खालचा दर्जा द्यावा. शिक्षणक्षेत्रातील महर्षीनी कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श जपावा (आता हे भाऊराव कोण हे विचारु नका). शिक्षकाना आपले माना. नोकरी देताना त्यांची गुणवत्ता पहा (पैसे नाही). शाळेची इमारत चांगली करा. पण महत्त्वाचे आहे शिक्षक चांगले असणे.

Anonymous said...

It's not the schools, not the teachers atall, the values and standards of governance is getting worst due to such politicians who blame it on others.

Unknown said...

नम्र आदरपूर्वक विनंती!!! नमस्कार
नमस्कार !!!!!!!!!!!!!
माराष्ट्राच्या पवित्र भूमीत जन्म घेतलेल्या सुजाण,अभिमानी आणि स्वत:च्या अस्तित्वाची जान असण्याचा आत्मविश्वास आणि माय भूमीवर खरे मनापासून प्रेम असणार्‍या या काळ्या मातीच्या सुपुत्रांना एक हृदय पूर्वक आवाहन. हे आवाहन नसून प्रत्येकाला आपले हक्क आणि या लोकशाही प्रशासना मध्ये आपले अस्तित्व दाखवून देण्याचा एक मार्गच होय . आज आपल्या 1,10,00,00,000 सुजाण आणि अत्यंत नम्र ईश्वर प्रिय असणार्‍या नागरिका मध्ये जवळजवळ सार्वजानांना आपल्या भारतीय धार्मिक,सहिष्णू आणि परोपकारी तसेच विश्वातील सर्वात प्रसिद्ध संस्कृती असणार्‍या सांस्कृतिक परंपरेचा सार्थ अभिमान आहे. पण या देशाचा प्राण ज्याच्या नावात च महान ??? महाराष्ट्र तोचि माझ एक देश!!! संतांची पवित्र भुमी, सहकाराची राजधानी , कष्टकार्या जननी, उद्योगाची मातृभूमी , देशाचा आत्मा तो ची एक महाराष्ट्र स्वातंत्र्‍या मिळाल्या पासून महाराष्ट्रासारख्या भूमिमधून एक ही राजकीय नेता या देशचे माय भूमीचे नेतृत्व करण्यास समर्थ तरू शकला नाही ही आपल्या महाराष्ट्रा सारख्या पवित्र भूमिसठी खरोखरच एक आत्मसंताप जनक , विचार करण्या इतपत गंभीर बाब आहे . आज कित्येक वर्षानंतर महाराष्ट्राला संत परंपरेचा आणि मानवतेचा आशीर्वाद लाभला आणि देशाचे सर्वात मानाचे आणि जबाबदारीचे सर्वांना सामावून प्रगती करण्यास योग्य आणि खरोखरच या पदासाठी सर्वोत्तम, पात्र आणि महाराष्ट्राची कन्या आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्या सारख्या अभ्यासू, प्रामाणिक आणि मात्ऋतूल्य व्यक्तिमत्वास हे पद सार्थ ठरविण्याचा मान मिळत आहे त्यास सर्व परोपकारी,निस्वारथी परोपकारी मानवांनी समर्थन केले पण प्रगतीच्या आड येणार्‍या आणि समाजात कोणतेही स्थान नसणार्‍या स्वार्थी प्रवृत्ती आपले नालायक आणि निर्ल ज्ज अस्तित्व दाखवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न म्हणून त्यांना पळ पुटा विरोध करत आहे त्यांच्या कडे लक्ष्य ना देता प्रगती कडे आणि मानवते कडे बघून आपण आदरणीय प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा निरधोक आणि विश्वासाने द्यावा आपल्या सारख्या सुजाण आणि सदसद्विवेकबुद्धी असणार्‍या माय लेकरांनी यास साहाय्य करावे ही नम्र आदरपूर्वक विनंती!!! नमस्कार

Anonymous said...

विनायक यांचे आवाहन बरोबर आहे. ज्याना शक्य आहे त्यानी मते देणा-या लोक्प्रतिनिधी पर्यंत पोहचवावे.

भाजप मधील सभासदांचे मूळ रा. स्व. सं असल्याने माझी कल्पना होती की, त्यानी सुधरणा केल्या नाहीत तरी निदान भ्रष्टाचार निपटून काढतील. परंतु, भ्रष्टाचारामध्ये भाजपने आपले श्रेष्ठत्त्व निरविवाद्पणे सिद्ध केले. कॊंग्रेसला जे ५० वर्षात जमले नाभाजपला वाटते की पूर्वज श्रेष्ठ म्हणून आम्ही श्रेष्ठ. जगात हे कोणीही मान्य करत नाही व करणार नाही. सर्व लोकप्रतिनिधिना आवाहन आहे की, प्रतिभाताईना मत देऊन निदान ७०% मतनी निवडुन द्यावे.ही ते त्यानी ६ वर्षात करुन दाखवले.

Anonymous said...

I am not at all complying with the remarks of the honourable Chief Minister of Maharashtra. First of all it is the Govt. who is responsible for the degradation of the entire system since Govt. is choosing any body for the teachers job regardless of his capacity ( not financial / cast base ). Political people and their parties are only interested in vote banks and as result non capable persons are getting appointed at any post. I hope, hence forth such paltry remarks will not be delivered.

Anonymous said...

It is surprising that a person who is supposed to give good governace is complaining against his subordinates. This is the worst condition and does need immediate attention. People should keep this in mind while voting in the next election as a long term measure.

As a short term measure people should protest against the weekness of the Government.