Wednesday, May 16, 2007

Where Our Taxes Drain?

लोकसभेने वाया घालवले कामकाजाचे १९ तास

अनावश्‍यक स्थगिती आणि कामकाजात वेळोवेळी येणाऱ्या अडथळ्यांमुळे गेल्या आठवड्यात लोकसभेतील कामकाजाचे १९ तास वाया गेल्याची माहिती लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांनी आज सभागृहात दिली. सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात ९ मे वगळता सदस्यांनी कामकाजात आणलेल्या अडथळ्यांमुळे कोणत्याही दिवशी प्रश्‍नोत्तरांचा तास होऊ शकला नाही; त्यामुळे सदस्यांनी विचारलेल्या १०१ तारांकित प्रश्‍नांपैकी केवळ पाच प्रश्‍नांनाच संबंधित खात्याचे मंत्री तोंडी उत्तर देऊ शकले. केवळ दोनच लक्षवेधी प्रश्‍नांवर चर्चा घेता आली; त्याचबरोबर जागतिक तापमान वाढीवर विशेष चर्चा घेण्यात आली, असे सभापतींच्या निवेदनात म्हटले आहे.

5 comments:

माधव बामणे said...

लोकसभ ही जनतेच्या प्रश्नावर चर्चा करुन उत्तरे शोधण्याचे व्यासपीठ राहिले नाही हेच यावरुन सिद्ध होते. जनतेच्या तथाकथित सेवकानी लोकसभा म्हणजे पक्षाची प्रचारसभा बनवली आहे. प्रत्येकजण स्वत: जनतेचे कैवारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक सदस्यात गुणवत्ता नसल्यने ते हमरी तुमरीवर येतात. आणी मग लोकसभेचा आखाडा बनवतात.

यावर उपाय शोधलाच पाहिजे. एक तर अशा सदस्याना क्ठोर शिक्षा केली पाहिजे अथवा लोकसभा अधिवेशन 'टेलेकॊन्फरंसिंग पद्धतीने' घेतले पाहिजे. सदस्य घर बसल्या अधिवेशनात भाग घेऊ शकतील. काम झाले नाही तर निदान पैसा वाचेल.

Suresh3211 said...

लोकसभेचे कामकाज संभाळताना मा. सभापतीची असायता / अडचण बघवत नाही. खासदारांना हौद्‍यात येण्‍यास प़तिबंध करण्‍यास लेसर किरणे वापरावीत जेणे करून खासदारांना करंट बसावा.

akdon11 said...

all these politicians who remain absent should be heavly charged & if this repeats then his status can be ceased.

manoj said...

hi,i am manoj joshi from pune.mi tar bolto he loksabha-rajyasabha he sagle band karun taka,kahi fayda nahi ya goshtincha,he totaly jantechye problem solve karnyasati aste,pan he politicals khup wrong behave kartat,ek tar yana samzat nahi ki apan ya goshtincha respect kela pahije thodkyat kay tar yanchi layki nahi apalya indiachya sabhela basaychi,ek tar he lok totaly gangster astat,black money,wale.ani shiklele nastat yamule he ghadte,mhanun ata he sagle band zale pahije bcaz jyasathi he tayar kele gele tyana yache benifit bhetat nahi.mag kashala pahije ya sabha,jo paryant aplya country madhe he asli natak chalel to paryant kahi honar nahi.i think ya baddal bolayla ha blog sudha kami padel.mi tar mhanto jya weli aaplya parliment war bombsfot zala tevha he sagle politiciance marun jayla pahije hote.

माधव बामणे said...

मनोज जोशी, तुमचे म्हणणे खरे आहे. परंतु, अंग भाजते म्हणुन चुल पेटवाची थांबवतो काय?, अपघात होतात म्हणुन रस्त्यावरुन जायचे थांबवतो काय? आपण अशा ब~याच गोष्टी करत असतो कारण आपल्याला त्याचा फायदाही होतो. किडका भाग कापून टाकुन चांगला भाग वापरणे हा या वर उपाय आहे.