Monday, May 21, 2007

चालण्याच्या स्पर्धेतही बुधियावर बंदी


ओरिसाचा "वंडर बॉय' बुधिया सिंह याला भुवनेश्‍वर ते कोलकत्ता हे पाचशे किलोमीटर अंतर चालत पार करण्यास खुद्रातील "बालकल्याण समिती'ने बंदी घातली आहे. भुवनेश्‍वर ते कोलकत्ता हे अंतर चालत पार करण्याच्या विक्रमाला बुधिया येत्या सहा जूनला सुरवात करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. भरउन्हात पाचशे किलोमीटर अंतर चालत जाण्यात बुधियाचा फायदा, तर नाही, उलट त्याचे शारीरिक शोषणच होईल, असे समितीने म्हटले आहे.

2 comments:

Anonymous said...

ha changla nirnay ahe.

Anonymous said...

yogya nirnay ahe.bhar unhat 500km chalun kay milnar ahe hya lahan mulala??