Saturday, April 14, 2007

Mockery Of Justice?

निष्काळजीपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या सात जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ऍलिस्टर परेराला आज न्या. अजित मिश्रा यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
याव्यतिरिक्त मृतांच्या नातेवाईक आणि जखमींना भरपाई म्हणून साडेचार लाख रुपये आणि दंडाचे ५० हजार रुपये भरण्याचा आदेशही देण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अतिशय निष्काळजीपणे केल्याचा शेरा न्या. मिश्रा यांनी मारला. ऍलिस्टरवर निष्काळजीपणामुळे मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याचा आणि इजा केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

ऍलिस्टर परेरा हा वांद्रे येथील कार्टर रोडवरून भरधाव वेगाने गाडी चालवीत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे पदपथावर झोपलेल्या सात बांधकाम मजुरांची हत्या झाली होती. १२ नोव्हेंबर २००६ ला घडलेल्या या घटनेने बरीच खळबळ माजविली होती. गेले कित्येक महिने चर्चेत असलेल्या या खटल्याची सुनावणी मात्र अवघ्या पाच दिवसांत संपली. या खटल्यात एकूण १८ जणांची साक्ष घेण्यात आली. मात्र, बांधकाम सुरू असलेल्या जागेचे रखवालदार निंबाजी इंगळे यांच्याव्यतिरिक्त एकही साक्षीदार ऍलिस्टरला ओळखू शकला नाही. त्यातही इंगळे यांची जबानी घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी घेण्यात आलेली असल्यामुळे ती ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी मागणी बचाव पक्षाच्या वकील मंजुळा राव यांनी केली. ऍलिस्टर मद्यपान करून गाडी चालवीत होता, हे सिद्ध करण्यासाठी त्याचा वैद्यकीय तपासणी अहवालही सरकार पक्ष सादर करू शकला नाही. रक्त आणि मूत्र चाचणीचा अहवाल नसल्यामुळे ऍलिस्टरने वाहन चालविताना मद्यपान केले होते, हे सिद्ध होऊ शकले नाही. ज्या छायाचित्रकाराने घटनास्थळाची छायाचित्रे काढली होती, त्याने प्रत्यक्षात न्यायालयात सादर करण्यात आलेली छायाचित्रे आणि आपण काढलेली छायाचित्रे यात फरक अ सल्याची साक्ष दिली.

3 comments:

Suresh3211 said...

पोलीस गरीबासाठी मदत करत नाहीत. श्रीमताव्‍या बेफान मुलांना वाचविण्‍याचा प़यत्‍न ते सतत करीत असतात हे अनेक वेळा सिध्‍द झाले आहे.

Anonymous said...

ज्या राज्याचा पोलिस महासंचालकच स्वत:च्या फ़ायद्यासाठी आपल्या अतिउच्च पदाचा दुरुपयोग करू शकतो त्या राज्याच्या पोलिसांकडून थोड्यासुद्धा अपेक्षा करणे मुर्खपणाच ठरणार!य़ाआधी पण श्री.शर्मा,श्री.वगळ हे उच्च पोलिस अधिकारी स्वतःच तुरुंगाची हवा खाउ शकतात तर खालच्या अधिका-यांकडून अपेक्षा न केलेलीच बरी!
या देशाचे तीनतेरा वाजवायला काही राजकीय पक्षच कारणीभूत आहेत.रस्त्यांवरच्या अपघातांत दारू पिउन गाड्या चालविणा-यांकडून निरपराध जीव वेळोवेळी घेतले गेलेले आहेतच,पण त्यास कारणीभूत असणारे महाभाग actors किंवा celebrity असले तर अतिशय कमी शिक्षेवर सुटलेले आहेत!
तर परेराला कमी शिक्षा झाली म्हणून फ़ार अश्रू गाळायची गरज नाही.एक actor शिक्षा टाळायचा किती प्रयत्न करत आहे व सर्व देवळांत फ़े-या मारत आहे हे माहित आहेच सर्वांना!
तर सद्यपरिस्थितीत श्री.परेरा यांना खुप पस्चात्ताप होवो व तुरुंगात सक्तमजूरी करून बाहेर आल्यावर अपराधाचे दुखः विसरण्यासाठी पुन्हा 'बाटलीचा' आश्रय त्यांनी न घे्वो अशी प्रार्थना करूया!

Anonymous said...

It is very very unfortunate!!!!!!!!!
One more new i had gone through moths back:

A very poor lady caught while stealing a sarry from a house, still she is in jail from 7-10years ( I dont know exact....)
because the case has not come in court so far....

Where is law ???????

Unfortunate!!!!!!

What will happen with india if samething going on.......