Friday, April 20, 2007

Does a Democratic India Need Strikes?

"बेस्ट' संप चिघळणार?३५ हजार कामगारांना बडतर्फीची नोटीस
"बेस्ट' बसच्या काल रात्रीपासून सुरू झालेल्या संपाने आज मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, कामावर गैरहजर राहिलेल्या ३५ हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावली आहे. ........
तसेच तातडीने एक हजार नवीन कामगारांची भरती करण्याची तयारी उपक्रमाने सुरू केली आहे. मात्र, तरीही कामगार संघटना आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

कर्मचारी संघटनेचे नेते शरद राव आणि "बेस्ट'चे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांच्यातील वाद पेटल्याने संप चिघळण्याचीच चिन्हे आहेत.

दरम्यान, उद्या (ता. २०) सकाळी १० वाजता संपाबाबत बेस्ट समिती अध्यक्षांच्या दालनात चर्चा होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे कृती समितीने म्हटले आहे; मात्र कर्मचारी संघटनांनी उद्याही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

"बेस्ट' संपामुळे सुमारे ४२ लाख प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रेल्वेस्थानक, रिक्षा व टॅक्‍सी स्टॅण्डवर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. खासगी प्रवासी वाहतुकीचाही आसरा लोकांनी घेतला. तसेच रिक्षा-टॅक्‍सीवाल्यांनी संपाचा गैरफायदा घेऊन जादा भाडे उकळल्यामुळे प्रवासी मेटाकुटीस आल्याचे चित्र अनेक भागांत दिसत होते. बस बंद असल्याने त्याचा ताण लोकल वाहतुकीवर पडला. त्यामुळे आज दिवसभर लोकलमध्ये गर्दी होती.

दिवसभरात फक्त "बेस्ट'च्या सहाच गाड्या धावल्या. शहर व उपनगरातील "बेस्ट'च्या सर्व आगारांत केवळ १५ वाहक, २२ चालक, ३५ निरीक्षक व २६ स्टार्टर्स कामावर उपस्थित राहिले. संपकाळात रस्त्यांवर धावलेल्या तीन गाड्यांवर गोरेगाव येथे रत्ना हॉटेल, सासमिरा रोड, मालाड येथील कस्तुरबा रोड येथे दगडफेक करण्यात आली.

बेस्ट प्रशासनाने काल कर्मचाऱ्यांना संप करू नये, असे आवाहन केले होते. तसेच संपात सामील झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता; मात्र कर्मचाऱ्यांनी "बेस्ट'च्या आवाहनास हरताळ फासला.

मात्र प्रशासनाने त्यावर कडक भूमिका घेतली असून, आज गैरहजर राहिलेल्या ३५ हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर "बेस्ट'ने कमी केलेल्या ७०० कामगारांना, तसेच प्रतीक्षा यादीतील ३०० कर्मचाऱ्यांना उद्यापासून कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. शिवाय एक हजार नव्या पदांवर कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचे आदेशही महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांकडे बसवाहकाचा परवाना व बॅच, तसेच चालक पदासाठी वाहन चालविण्याचा सहा महिन्यांचा अनुभव असणे आवश्‍यक असल्याची अट घालण्यात आली आहे. बेस्ट प्रशासनाने या पार्श्‍वभूमीवर उद्या संध्याकाळपर्यंत कामावर हजर राहणाऱ्या कामगारांना सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

5 comments:

Sandeep Padhye said...

Democracy has nothing to do with strikes. If you see in UK one of the suppose to be promotor of democracy , one sees strikes during every bankholiday either by train operators or by other service industry

captsubh said...

A strike is the last resort weapon in the hands of trade union leaders,when prolonged discussions & negotiations to improve wages,other benefits & terms & conditions, have not yielded satisfactory results.From management's point of view,economic viability of the undertaking,productivity & performance linked compensation packages determine the issue,whereas, from the employees' point of view,fair & adequate compensation for desired services rendered & able to take care of inflation are of paramount importance.Unions/employees of an efficiently run best BEST undertaking do not go on strike often, except when they notice inordinate delays in meeting their demands.Any strike by such a big undertaking causes immense inconvenience to the public,but in a democracy,it is the last weapon to bring the govt or management to the negotiating table with a time bound programme to arrive at a solution.
Of late,the supreme court has not supported strikes in essential industries, especially, when they have continued for long & caused untold suffering to the public & big losses.In this instance,fortunately better sense has prevailed,so the strike has been called off quickly!
Mumbai's public generally worships the BEST bus as well as local train services & accepts a democratic strike in their stride!Mere pre-strike tough posturing by the management is meaningless as during negotiations,among others,an important point thrashed out first is not to victimise/penalise the striking employess!
Proactive & progressive managements would nip the strike in the bud by taking timely note & negotiating in advance in stead of waiting till the die is cast!
Subhash Bhate

Suresh3211 said...

संपाची ज्ञरूरी आहे. संप 'गांधीगिरी' पध्‍दतीने करावा. जाळपोळ, दंगा, गोंगाट, रस्‍ते बंदी टाळून संप करावेत.

Anonymous said...

they can do the strike in Japaneese way. BEST Conductors instead of not working , they should come to work and not give tickets. so its no income for best management and no problems for public as well.
They will infact get support from public

Prathamesh said...

being Indian, the Democrat, everybody has the freedom to stand for their demands. But this freedom should not result into the inconvinience of others, as it was experienced at the time of strike of BEST employees'.The employees' demands abot their salary, many a times , are rejected by saying that the economic condition of BEST (or equivalent authirities at other places) is not in favour of their demand. These comments can be accpted if the authorities are coming with solutions to come out of the current problems. If they are not then they must be taken out of the office.Also the plans of authiritiesshould be actively supported by the employees so that their demands can be completed.
At the same time the employees should also express their demands in the ways other than going on strike such as sticking black-strips to the half of the glass of the bus alongwith their demands so that their demands will also reach to common public who may also support them in proper way such as taking polls for the support.